मन्ही अहिराणी...

Submitted by ज्ञानु on 18 October, 2010 - 02:25

महाराष्ट्र आपला सर्वास्न म्हणजे सर्वांचं राज्य आणि आपण सर्व मायबोलीकर कुणी मराठवाडा ,कुणी विदर्भ ,कुणी प.महाराष्ट्राचे ,तर कुणी कोकणाचे आणि कुणी "खानदेशातले " या राज्यात आपल्याला बोली भाषेत प्रचंड बदल दिसून येतो .म्हणजे साधं १ की. मी . वर देखील भाषेतील बदल जाणवतो . अश्याच आमच्या खानदेशात देखील अहिराणी भाषा असली तरी तिच्या छटा दर किमी ला बदलतात आणि एक वेगळाच रंग आणि गोडवा तिच्यात दिसून येतो .चला मग सफर करूया याच प्रमाण मराठीतल्या अहिराणी रूपांची]

अहिराणी उच्चार - मराठी अर्थ
१ .बोयले १. च्यायला (बय-बाई)
२. बोगणं २. पातेलं
३.उरतीन ३. भांड्यांची उतरंड
४. भांशीन ४. चुल्ह्याचा ओत
५. कुश्ताय ५. कुलूप
६. बुंग्र ६. छिद्र
७. बख्खार ७. उनाड
८. बट्तोड ८. उनाड, खोडकर
९. तीर्सिंग्राव ९.चिडखोर
१०. घुमी १०. न बोलणारी ,अबोल
११.देड शाना ११. दीड शहाणा
१२.पोलकं १२. ब्लाउज
१३. झंपर १३.ब्लाउज
१४. बोख्लं १४.भिंतीतलं मोकळ कपाट
१५. कुटाणा १५. त्रास
१६. उप्पाद १६. उपद्व्याप
१७.सानं १७. भिंतीवरचा किंवा धाब्याचा झरोका
१८.उखल्ला १८. उकिरडा
१९.भू १९. पुष्कळ
२०.तुळशी बिन्द्रावन २०.तुळशी वृंदावन

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मध्य प्रदेश, गुजरात अन महाराष्ट्राच्या सीमेवरचा हा खानदेश. तापीकाठी वसलेला. सहाजिकच, हिन्दी, मराठी अन गुजराती भाषांचं मिश्रण असावं असं वाटणारी ही अहिराणी भाषा आहे.