बी एम एम २०११ शिकागो :उभ्या उभ्या विनोद

Submitted by webmaster on 8 August, 2011 - 23:26

बी एम एम २०११ शिकागो :उभ्या उभ्या विनोद या कार्यक्रमाबद्दलचं तुमचं मत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गेल्या काही अधिवेशनांपासून होणार हा कार्यक्रम अतिशय यशस्वी आणि लोकप्रिय होतो आहे. इतका की बघायला जागा मिळत नाही.

या वेळच्या उ. उ. विनोदात सगळे कलाकार मस्त होते.

एका बाईंनी मला विनय देसाई किंवा संदीप चित्रे समजून " वा, काय छान कार्यक्रम झाला तुमचा", असे मला सांगितले. Happy

या कार्यक्रमाचे स्वरुप काय होते? नाटक? गप्पा? कुणीतरी सविस्तर लिहीणार का?
या कार्यक्रमाविषयी अधिवेशनाच्या धाग्यावर पण वाचले होते. त्यामुळे उत्सुकता निर्माण झाली आहे.

अजय,
सिअ‍ॅट्ल आणि अ‍ॅट्लांटा ला आलेला अनुभव.
साधारण ८ ते १० जण मला उत्साहाने म्हणाले अहो, तुमची बहिण काय हिलेरियस आहे.. नंतर कळल की ते लोक शुभदा कामेरकरला माझी बहिण समजतात.

कल्पना ,
तुम्हा दोघांमधे काहीतरी साम्य नक्की आहे (बहिणी वाटाव्या इतकं) पण त्याहून एक गंमत तुला सांगायला विसरलो. अधिवेशनात फिनिक्सवरून आलेल्या एका व्यक्तिशी माझी ओळख झाली (पण नाव विसरलो) आणि त्या तुम्हा दोघींची बहिण असाव्या असं मला वाटलं :). इथे मायबोलीवर त्या येतात म्हणाल्या.

अटलांटा चा कर्यक्रम थोडा वेळ बघितला होता. शिकागो त्या मानाने बरे वाटले. पण वाइट वाटते कि एका मर्यादे पलिकडे फारसे काही घडत नाही आपल्या हातून.