Submitted by विदेश on 1 August, 2011 - 23:44
मंत्री तुपाशी
बळीराजा उपाशी
घोडे कागदी -
पाऊस धारा
वर्दळ सैरावैरा
छत्र्या उत्साही !
घास हातात
बाळ परदेशात
पाणी डोळ्यात ..
रात्र काळोखी
अंधार अनोळखी
दिवे चोरांचे !
अबोल पती
भांडकुदळ पत्नी
हैराण भांडी ..
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
घास हातात बाळ परदेशात पाणी
घास हातात
बाळ परदेशात
पाणी डोळ्यात ..>>>>> मस्त...
अबोल पती
भांडकुदळ पत्नी
हैराण भांडी ..>>>>>>>>
मस्त !
मस्त !
अबोल पती भांडकुदळ पत्नी हैराण
अबोल पती
भांडकुदळ पत्नी
हैराण भांडी ..
>>