हॅप्पी गटारी....थर्रा देशी आला बाबा...

Submitted by सत्यजित on 30 July, 2011 - 15:41

सलिल आणि संदिपची माफी मागुन.. दुर देशी गेला बाबा....

यू ट्युब मधील ह्या गाण्याच्या विडीओ मध्ये सलिल म्हणतो...
"अशीच एक गोष्ट आहे जी आपल्याला कळत नाही पण लहान मुलांना जाणवते."
अशीच बापाची व्यथा कळलेल्या मुलाचे मनोदय सांगणारं, मन पिळवटुन टकणार हे विडंबन आहे. Lol हॅप्पी गटारी...."

थर्रा देशी, आला बाबा, घेई फैलावर आई
अख्खी बाटली पोटात, तरी घरी आला बाई

असा चकणा बेचव कसाबसा पचवला
बार भिंतीत बसुन अख्खा खंबा रिचवला
"आता पुरे रे बेवड्या" कुणी म्हणतच नाही

कशासाठी कोण जाणे देती ड्राय डेला सुट्टी ?
कोणी ढोसायाला नाही…कशी व्हावी कट्टी-बट्टी ?
ग्लास ठेवले मांडून … परि बाटलीच नाही !! २ !!

दिसे खिडकीमधुन बार सारे, दिशा दाही
बार उघडले तरी तिथे धावायचे नाही
फार वाटे जावे परी – मुठीमध्ये नोट नाही !! ३ !!

अख्खी बाटली पोटात, तरी घरी आला बाई.... Lol

आज घरोघरी गटारी झाली.. घरोघरी श्रावणाचे आगमन जोरात झाले.. आता एक महिना मन मारुन श्रावण पाळणार्‍यांना समर्पित.

-सत्यजित.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सत्या ! Rofl
जय हो गटारी ! सगळ्यांना गटारीच्या हार्दिक शुभेच्छा ! मनोसोक्त गटारीत लोळा ! Proud

सत्य आहे.
अवांतर: आजकाल गटारी आमावस्येचा जो उदो उदो होतो आहे तो मनाला पटत नाही. एक सण झालाय जणू तो. याचदिवसाची दीप आमावस्येबद्दल कोणी मनावर घेतच नाही.