वारली चित्र

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

vivah_0.jpg
वारली विवाहाचे चित्रण
वारली समाजात लग्नाच्या वेळी वारली स्त्रिया ह्या चित्रांनी आपल्या घराच्या भिंती सजवतात.
मध्यभागी देव चौक आहे आणि त्यात 'पालघट' देवी आहे जी लग्नात उपस्थित आहे असे ते मानतात. ती मातृदेवता तसेच प्रजोत्पत्तीची देवता म्हणून पण ओळखली जाते. धार्मिक विधीच्या पूर्तीसाठी याचे चित्रण करतात. चित्र काढताना वारली स्त्रिया या देवीची स्तुती करणारी गाणी म्हणतात. हिचे चित्र काढल्याशिवाय वारली लोकांचा लग्नविधी पुर्ण होऊ शकत नाही.
आणि डाव्या बाजूस लग्न चौक आहे आणि त्यात 'पाच शिर्‍या' या देवतेचे चित्र.
खाली घोड्यावर नवरा नवरी आणि आजुबाजुला बेधुंद नाचणारे वाजंत्री आणि वरात.
तसेच आजू बाजूला झाडे आणि मोर नृत्य, कर्‍हा घेऊन जाणार्‍या स्त्रिया ईत्यादी.

प्रकार: 

छान आहे चित्र आणि तु लिहिलेली माहिती देखिल Happy
मला काहीच माहिती नव्हती आधी.

सुंदर चित्र. माहितीही छान.
मी या चित्राना अशी बॉर्डर कधी बघितली नव्हती. त्याने चित्राला छान उठाव आलाय.

सुरेख आलय चित्र.

मस्तच आहे चित्र. तू काढलेयस ना.
वारली पेंटींग्स त्यांच्या साध्या पण निरागस सौंदर्यानं नेहमीच भुरळ पाडतात.
यातले डीटेलिंग खूपच बारीक आणि उठावदार झालेय. इतके मी पाहिले नव्हते कधी.
(विशेषत: देव चौक)
हे तू एखादे ग्राफिक टूल वापरून केलेयस का? कारण रेषांची मोजमापं परफेक्ट दिसतायत.
(मला फारसं कळत नाही चित्रातलं तरी, कसलाही आगाऊपणा मायबोलीवर (च फक्त) खपवून घेतला जातो म्हणून इतकं सगळं. Happy )

छानच आहे चित्र... रंगसंगती छान... माहितीही उद्बोधक Happy अशीच माहितीपूर्ण चित्रं काढत जा..

मस्तच ग Happy आणि माहितीपण छान दिली आहेस.

अगदी सुबक, रेखीव आणि सुरेख चित्र नीलू! आणि माहिती सांगितलीस ते फारच चांगले केलेस.. कारण असले बारकावे सांगितल्याशिवाय कळत नाहीत..
मोर फार सुरेख आलाय आणि वरातीतली लोकंही Happy

सकाळपासून मला मायबोलीवरची कुठलीच चित्र दिसत नव्हती. इथल्या नुसत्याच कॉमेंट्स वाचून मी वारली चित्र बघायला अगदी अधीर झाले होते. किती वेळा मी इथे येऊन गेले शेवटी आत्ता दिसलं चित्रं. खासच आलंय चित्र आणि माहीतीही सुंदर दिली आहेस. किती परंपरा आणि संस्कृती चित्रातून जगासमोर नेता येतात ना....

सुरेख. माझ्या आवडता प्रकार वारली. इथे तर इतकी मागणी आहे ना या चित्रांना. खुप famous झाली आहे हि art इकडे. याच श्रेय हे एका वारली artist ला जात. त्याच नाव आठवेना आत्ता. पण त्याने पहिले मोठे exhibition कॅनडाला भरवले होते.
सध्या मी एक african painting करतेय. very similar to वारली आर्ट. फक्त figures sketches freehand मधे काढल्यासारखे असतात. रंगांचा भर्पुर वापर. खुप सहिइ दिसतात हि paintings पण.

सर्वांचे प्रतिसादासाठी धन्यवाद!!:)
वारली चित्र काढणे आणि त्यातही आपण काय काढतोय हे समजावून घेऊन मग काढणे हे जास्त आनंददायी आहे. मला स्वत:ला वारली चित्र काढणे खूप आवडते. त्यांच्या चित्रातील बारकाव्यात आपणही काही ऍड केले तर ते अजून छान दिसते ना:)
दिव्या.. जीवा सोमा म्हशे हे आहे का त्या वारली चित्रकाराचे नाव?? त्यांची लंडन, पॅरीसला बरीच प्रदर्शन भरली होती ना?
संघमित्रा.. अगं आगाऊपणा कसला..माहिती हवी तर बिंधास्त विचारावं की Happy मी हे कोरलड्रॉ मध्ये बनवलय.
दिनेशदा.. मूळ वारली चित्रांमध्ये अश्या चौकटी नसतात.. ही माझी भरः) पण मुळात त्यांचे आकार आणि मांड्णीच सुरेख असतात.

नीलु,
अतिशय सुंदर चित्र आहे....
माका माहीत नव्हते तु एवढी मोठी artist आहेस ते!
Happy
बहोत खुब!!!
Happy Happy Happy

बरोबर नीलु, जीवा सोमाच. अप्रतिम काढलीत त्याने चित्र. आणि खुप गरीब माणुस आहे.

छानच आलंय गं चित्र.
मला वारली शिकायची खूप इच्छा आहे.मधे पुण्यात होते तेव्हा "सकाळ्"मधे छोटया जाहिरातींमधून शोधले होते क्लासेस्,पण वेळेअभावी नाही जमलं.मला प्रामाणिकपणे वाटतं की लोककला स्थानिक कलाकारांकडून शिकाव्यात,त्यामागचे विचार कळतात,पण ते कितपत शक्य होईल माहिती नाही.
तुला एक विनंती,तू काही बेसिक शिकवू शकशील का जमेल तसं इथे किंवा ब्लॉग वर वगैरे,मिनोतिनी जसा शिवणकामाचा सुरेख ब्लॉग केलाय तसा?अशी विनंती हक्कानी मायबोलीवरच करता येते फक्तः-),म्हणून धाडस करतेयः-).अर्थात,तुला शक्य असेल तरच..

माहितीदेखिल देता आली तर उत्तमच,खरा आनंद लुटता येतो.
अशीच सुरेख चित्रं काढत रहा..

अर्रे वृषाली ही तर बेस आयडीया आहे.:) मागे मला अजय यांनी पण हयुमन फिगर् चे प्रपोर्शन विषयी माहिती टाकायला सांगितलेली तेही डोक्यात होते. मला जेव्हढे माहित आहे तेव्हढे मी नक्कीच तुम्हाला सांगुन शकेन. आणि वारली चित्रकला शिकणे तर खूपच सोपे आहे. काही बेसिक आकार आहे त्यात.. त्याचाच वापर सर्व मांड्णी मधून बहुतेककरून केला जातो.
मी नक्कीच असं काही लवकर चालू करीन... :))
दिव्या तुझे आफ्रिकन पेंटीग्ज दाखव लवकर...पहायची उत्सुकता आहे.

व्वा.. मस्तच असा गो.. माहिति देउन माझे अज्ञान कमी केलस ता बरा झाला..
नाहितर माका वारलि चित्रे तशि समजत नाय.. Happy

मस्तच काढलय चित्र. झोपडीचे कुड गेरुने रंगवुन त्यावर काढलेली हि चित्रं प्रत्यक्षात पाहिली आहेत पण त्यांचा मतितार्थ समजला नव्हता. माहितीबद्दल खुप आभार.

छान

सुंदर. डिटेलिंग खूप छान केलंय.

मी पूर्वी बर्‍याच गाडग्या-मडक्यांवर वारली फिगर्स रंगवल्या होत्या. आता तुझं चित्र बघून मोठ्ठं वारली पेंटींग करावं असं वाटायला लागलंय.

अरेच्चा माझी जुनी चित्रं चक्क पहिल्या पानावर बघून चकितच झाले.
धन्स लोक्स. Happy
रुपल्या आज काय वेळ मिळाला का? Happy
अल्पना चला मग कामाला लागा.. लवकर चित्र काढून ईथे दाखवा Happy
@निल्या.. त्या लग्नचौकात चंद्र, सूर्य, मुंडावळ्या, मुकुट, फणी, शिडी आहेत.
लग्नसमयी पालघट देवीसोबत चंद्र-सूर्य यांना आवाहन केले जाते किंवा वरवधूंना आशीर्वाद देण्यासाठी त्यांचे असणे आवश्यक मानले जाते म्हणून त्यांचे प्रतीक. फणी हे साखरपुडा किंवा विवाह नक्की झाल्याचे प्रतीक. मुंडावळ्या वधूचे प्रतीक, मुकुट वराचे प्रतीक आणि शिडी म्हणजे घराच्या माळ्यावर ठेवलेल्या धान्यसाठ्यापर्यंत पोचण्याचा मार्ग ह्याचे प्रतीक.

सुंदर आहे चित्र. पण फक्त एकच?
वरती म्हटल्याप्रमाणे वारली चित्रांत वापरले जाणारे बेसिक आकार आणि पध्दती यावर एक लेख लिही ना.

फारच छान!!

ह्या चित्रा वरुन एक आठवण झाली. माझी मावशी टेक्सटाईल डीझायनर आहे. तीला वारलीचा नाद आहे. तिने खुप चित्र काढली आहेत. अनेक चादरी, फ्रेमस, अभ्रे, कुशन कव्हर्स्,तयार केले आहेत. गेली २०-२२ वर्षे ती हे काम करत आहे. वरील चित्र पाहुन मला माझा एक जुना कुडता आठवला. मी कॉलेज ला असताना एक खादी सिल्क च्या कुडत्यावर तिच्या कडुन अशीच लग्नाची वरात पेंट करुन घेतली होती ( कॉलेज संपुन २० वर्षे झाली) कित्येक वर्ष तो कुडता मी वापरला ( जो पर्यंत साईझ तीच होती तो पर्यंत!!!!)

तसेच ती स्केचिंग पण छान करते. पुर्वी पटोला डीझाईन पण करत असे एका मील साठी.

माझ्या कडे जर काही फोटो असतील तर पहाते.

Pages