तुमची ईच्छा - तुमची मुलगी

Submitted by Saee_Sathe on 26 April, 2011 - 03:04

(आई-बाबा यांपैकी बाबांना आपण खुप घाबरतो. हो ना ? मला माहितीये. तुमचं उत्तर नक्की "हो" च असेल ! कारण बाबा खुप स्ट्रिक्ट असतात. तर या ठिकाणी मी बाबा आणि मुलगी यांच्यातले संभाषण दाखवले आहे !)

काय हो बाबा ?
सारखे अभ्यास करायला लावता
कंटाळून जाते मी
तरीही रागावता

सकाळी सकाळी रोज
ऑफीसला का जाता ?
घरी आल्यावर नुसते
टि.व्ही. च का पहाता ?

प्रगती-पुस्तक मिळाले
की कधी पापे घेत नाही
पापे राहीले लांबचे
साधी मिठीही मारत नाही

रोज रात्री झोपताना
गमती-जमती सांगत नाही
मी सांगते तर
मला सांगु ही देत नाही

का हो बाबा आता
नावडती झाले का मी ?
पहीले होते लहान
आता मोठी झाले का मी ?

सतत एक काळजी
मनात माझ्या आढळते
विसरून जाल का मला ?
भीती अशी वाटते

मोठी होतेय मी
असे रोजच मला जाणवते
स्वप्न आहे हे अशी
मनाची समजूत मी घालते

- मृण्मयी शैलेंद्र साठे

गुलमोहर: 

Thanks to all !
I am still slow in Marathi typing ! Will take 2-3 days to respond in Marathi !
Tya post kelelya kavita pan Baba ne type karun dilya hotya ! Pan mi ata practice karate ahe !

सई तुझे माबोवर स्वागत Happy

आवडली कविता... तुझ्या लिखाणातला हुरुप वाखाणण्याजोगा आहे.

पुढच्या लिखाणाला शुभेच्छा!

एका ओळखीच्या सद्-गृहस्थांनी सईला विचारलं की तुला बाबांवर लिहीणं कसं जमलं ? तर तिने उत्तर दिलं की "आधी मी एक कविता (ईंग्लीश मधे) दगडावर करुन बघीतली. मग मला बाबा वर लिहीणं सोपं गेलं" Proud

आधीचा अनुभव उपयोगी पडला म्हणाली Proud

छान आहे...............
आवडली............................

सई , खूप छान . मला तर माझी छोटीच आठवली खूप वाट पाहत असते . कारण तीला दिवस् भरात काय काय झाले ते सर्व सांगायचे असते.