Submitted by जुई on 15 July, 2011 - 05:16
राहून राहून आठवण पुन्हा
वास्तव असह्य तू नसण्याचे..
रमते अशी गुजगोष्टित पुन्हा
भास पुन्हा तुझ्या असण्याचे..
बंधने जाचक, नियम जगाचे
हो, होतेच मला ते पाळायचे..
हळुवार वाहिलेस मैत्र असे की
ना, नव्हतेच तुला ही टाळायचे..
भाव जागले मनी अनेक पण
नव्हते तुला मज सांगायचे..
भावले क्षणभर नाते मला पण
नव्हते खेळ मज मांडायचे..
नको रे मना चक्रे अशी ही
उगाच काहून अडकायचे?
सुगंधी शृंखला, काटेरी जरी ही
व्यर्थ प्रयत्न हे सुटायचे..
गुलमोहर:
शेअर करा
"नको रे मना चक्रे
"नको रे मना चक्रे .......
...... व्यर्थ प्रयत्न हे सुटायचे.."
छान ....
छान
छान
आभार उकाका Thanks
आभार उकाका
Thanks Yo.Rocks!!!!!
व्यर्थ प्रयत्न हे सुटायचे.>>>
व्यर्थ प्रयत्न हे सुटायचे.>>> सर्वार्थाने खरे!
भाव जागले मनी अनेक पण नव्हते
भाव जागले मनी अनेक पण
नव्हते तुला मज सांगायचे..
भावले क्षणभर नाते मला पण
नव्हते खेळ मज मांडायचे..
>>>
एकदम भारी!!
आवडली..
जुई,
तुझी कविता एकदम बहरत आहे!!
अजून खूप खूप लिही..
शुभेच्छा..
आभार बेफ़िकीरजी निवडुंग
आभार बेफ़िकीरजी
निवडुंग मनापासुन धन्यवाद...
खुप छान वाटल प्रतिसाद वाचुन....
पुनःश्च धन्यवाद
खूप छान..
खूप छान..
खूप छान..
खूप छान..
धन्स अखिला
धन्स अखिला
छान? काहून सुटायचे जी?
छान? काहून सुटायचे जी? आपल्यासाठी नियम; नियमांसाठी आपण नाही. हृदय तर मुळीच नाही.
हम्म उमेश तुमच पण बरोबर
हम्म उमेश तुमच पण बरोबर आहे...
पण सोन्याचा असला तरी पिंजरा तो पिंजराच...
सुटकेचा प्रयत्न ही करू नए म्हणता की काय?
नको रे मना चक्रे अशी ही उगाच
नको रे मना चक्रे अशी ही
उगाच काहून अडकायचे?
सुगंधी शृंखला, काटेरी जरी ही
व्यर्थ प्रयत्न हे सुटायचे..
मस्त्...भेदक
आभार मनिषा_माऊ
आभार मनिषा_माऊ
जुई पुन्हा एकदा लक्ष वेधलेस..
जुई पुन्हा एकदा लक्ष वेधलेस..
पुन्हा एकदा आभार !!
पुन्हा एकदा आभार !!