मुकी अंगडी बालपणाची......जीर्ण शाल वार्धक्याची

Submitted by जिप्सी on 13 July, 2011 - 00:21

मुकी अंगडी बालपणाची रंगीत वस्त्रे तारुण्याची
जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचे

असं म्हणतात वार्धक्य म्हणजे दुसरे बालपणच. अर्थात हे दुसरं बालपण सगळ्यांना नकोसंच असतं. बालपण आणि वार्ध्यक्य अशा दोन थीमवर आधारीत हे फोटो फिचर.

=================================================
=================================================
प्रचि १
बालपणी आयुष्याच्या चौकटीतुन, तारूण्याच्या उंबरठ्याआडुन दिसणारे जग किती सुंदर असते ना?

प्रचि २
त्याच आयुष्याच्या चौकटीतुन, तारूण्याचा उंबरठा ओलांडुन, वार्धक्य कधी आले ते समजलेच नाही. आता फक्त आठवणींचा भूतकाळ आणि दु:खाचा वर्तमानकाळच सोबतीला.

=================================================
=================================================
प्रचि ३
भविष्यात येणार्‍या सुखदु:खाना पेलण्यासाठी मी आणि माझी हि काठीच समर्थ आहे हेच तर याला सुचवायचे नाही ना?

प्रचि ४
बालपणीची ती काठी दूर फेकली गेली, हाती आलेल्या ह्या काठ्या आता उपजिविकेचे साधन बनल्या, पुढे यातलीच एखादी काठी माझा आधार होणार आहे आणि शेवटही तिच्यातच असणार.

=================================================
=================================================
प्रचि ५
उद्याची पर्वा मला आज कशाला?. आजचा दिवस माझा आहे तो मी निखळ हसण्यातच घालवणार.

प्रचि ६
आजचा दिवसतर कसाबसा गेला. उद्याच्या भाकरीचे काय? पण, आलेल्या परीस्थितीला खोटंच का होईना पण हसतच सामोरं गेल पाहिजे ना?

=================================================
=================================================
प्रचि ७
आम्हाला ऊन, वारा, पावसाची भीती नाही. या सर्वांपासुन आमचा बचाव करण्यासाठी आमच्या पालकांची मायेची छत्रीच पुरेशी आहे.

प्रचि ८
ऊन, वारा, पाऊस याची भीती मला आजही नाही. अशा कित्येक संकटांना आयुष्यात सामोरा गेलो आहे. एकच इच्छा - लोभरूपी ऊन, भाऊबंदकीचा वारा, मत्सराचा पाऊस या संकटापासुन माझ्या कुटुंबाला दूर ठेव. या संकटांचा सामना करण्यास माझी पालकत्वाची छत्री कदाचित कमकुवत ठरेल.

=================================================
=================================================
प्रचि ९
लहानपणी आईबाबांबरोबर देवळात जाण्याची एक वेगळीच मज्जा ना. खरंतर पूजेनंतर मिळणार्‍या प्रसादावरच माझं जास्त लक्ष. Happy

प्रचि १०
लहानपणी प्रसादाच्या लोभाने देवपूजेला जायचो खरा पण उतारवयात तेच उपजिविकेचे साधन होईल हे मात्र कधी वाटले नाही.

=================================================
=================================================
प्रचि ११
जे काही समोर येईल त्यातच सुख मानायचे, कुणाकडे हात पसरायचे नाही हेच परिस्थितीने लहानपणापासुनच शिकवले.

प्रचि १२
आजही परिस्थिती तशीच राहिली आहे. फरक एव्हढाच कि आता मात्र दुसर्‍यांपुढे हात पसरण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

=================================================
=================================================
प्रचि १३
आज मी तुला खांद्यावर घेतलं आहे, कदाचित उद्या तुझ्या खांद्याची गरज मला लागेल.

=================================================
=================================================

गुलमोहर: 

व्वा !

<< लोभरूपी ऊन, भाऊबंदकीचा वारा, मत्सराचा पाऊस या संकटापासुन माझ्या कुटुंबाला दूर ठेव. या संकटांचा सामना करण्यास माझी पालकत्वाची छत्री कदाचित कमकुवत ठरेल. >>
योगेश....... नि:शब्द केलस... मनाला भिडणारं लिहिलस न त्यात ते समर्पक फोटो.. खुप छान!! Happy

प्रतिसादाबद्दल धन्यवाद Happy

शेवट चा फोटो राहुन गेला.........................
फक्त बालपण दाखवले आपण..............>>>>>उदयवन, शेवटच्या प्रचीत "बालपण आणि वार्धक्य" दोन्ही एकत्र दाखवले आहे. Happy

तुझ्यातल्या फोटोग्राफिक लेखकाला सलाम. >> अगदी..

जिप्सी.. मित्रा.. भावा... खूपच छान !! जे काही सादर केले आहेस.. त्याबद्दल _/\_ Happy

काय बोलु? कित्ती वेळ तर काय लिहाव सुचतच नव्हत. एकतर असच काय सुचत नाही आणि त्यात असकाही बघितल आणि वाचल की मग काय............!
तुझ्याया थीमला,प्रचिंना व लिखाणाला साष्टांग नमन.

Pages