नमस्कार मंडळी!!
वाटलं छान खाद्यपदार्थ तयार झालेत आता, पान घ्यावं वाढायला....
भुंगा, वर्षा, आर्या सगळ्यांच्या मदतीने, सजलेलं, हे पान!!
प्रेरणा:
http://www.maayboli.com/node/27195
http://www.maayboli.com/node/27262
http://www.maayboli.com/node/27270
http://www.maayboli.com/node/27277
[निवडुंगा, सर्दी असताना, शिकरण (http://www.maayboli.com/node/27282) खाऊ नये, म्हणून ते मी माझ्यासाठीच ठेवतेय राखून ]
------------------------------------------------------------------------------
पान वाढलंय म्हणताच,
पानावर येऊन बसणारा तू....
पानातले पदार्थ, डावीकडून
उजवीकडे न्याहाळण्याची,
तूझी पद्धतच जुनी,
अन्
तेव्हा तुला न्याहाळण्याचा,
मला छंद..... तितकाच जुना!
चमचमीत लोणच्याला पाहून
तुझे चमकलेले डोळे अन्
पापड, कोशिंबीर, मुरांब्याला पाहून
आलेलं चेहर्यावरचं गोड हसू...
"व्वा, आज कढी पण का?"
....सर्दी झालीये ना रे तुला, मग अद्रक घालून,
थंडग्गार मठ्ठयाची गरमागरम कढी केलीच आज....
पण;
मग,
उजवीकडचं अळुचं फदफदं पाहून,
आठ्या पडल्याच ना??
हेच तर सांगायचं असतं
मला नेहमी,
जीवनात सगळंच 'मनासारखं'
नसतं रे....
जरा, अळुला लोणच्याची साथ तर देऊन बघ,
जिभेवर रेंगाळणारी चव,
आवडू लागेल,
तुलाही....!!
किती चमचमीत होती तुझी कविता
किती चमचमीत होती तुझी कविता पण ! पोट भरलं सकाळी स़काळीच.
<<<हेच तर सांगायचं असतं
मला नेहमी,
जीवनात सगळंच 'मनासारखं'
नसतं रे.... >>>
हेच आवडतं मला नेहमी, कि तुझ्या कवितेत एक असा ट्विस्ट असतो ना. मजेमजेत एकदम उंचीवर जाते तुझी कविता.
छान
चला आजचा मेनु मिळाला...
चला आजचा मेनु मिळाला...:D
छान...
छान...
(No subject)
अहो पान वाढलंय?>>>>>>>>> कातर
अहो पान वाढलंय?>>>>>>>>> कातर घ्या आणि छाटुन टाका झाडाचा भार थोडा कमी होईल ....हा.का.ना.का

अहो पान वाढलंय?>>>>>>>>> कातर
अहो पान वाढलंय?>>>>>>>>> कातर घ्या आणि छाटुन टाका झाडाचा भार थोडा कमी होईल ....हा.का.ना.का

बागे एकट्याचंच पान वाढलंस
बागे
एकट्याचंच पान वाढलंस ना........ "पंगत" असती तर आम्ही पण आलो असतो ना संगतीला
शेवटी "फुकट ते पौष्टिकच"
बागे छाने पान बघ ना
बागे छाने पान

बघ ना भुंग्या.. आम्ही डाय(फॉर्)ईटींग वाले.. अगदी "फुकट तिथे फॅमिली सकट" हजर रहणारे
(No subject)
मस्त कविता. वाचूनच भूक लागली
मस्त कविता.
वाचूनच भूक लागली कडकडून.
छानच
बागे भारीच आहे की.. शिकरण
बागे भारीच आहे की..

शिकरण बरं राखून ठेवलंस स्वतःसाठी..
हायला, मायबोलीचा एकदम भटारखाना झाल्यासारखं वाटायला लागलंय आता..
मस्त बागे... भुक लागली
मस्त बागे...
भुक लागली एकदम.
वैभव पेशल ताट येवुदे, या मेनुचे, ते पण धतड ततड धतड वाजवित
इथे, प्रत्येकाने हे "पान"
इथे, प्रत्येकाने हे "पान" तुमच्या बायकोने तुमच्यासाठी वाढलंय, असं गृहीत धरा (सर्दी झालीये असं पण वाटून घ्या
) रंगत वाढेल जेवणाची..
)
(ज्यांचं शुभमंगल झालेलं नाही, त्यांच्या जीवनाच्या पुस्तकात लवकरच हे पान येवो अशी शुभेच्छा
निवडुंगा,
फक्त कैच्याकै वरच खाद्यपदार्थ पाऊस आहे रे...
बागु, मी तर बाई नवर्याने हे
बागु, मी तर बाई नवर्याने हे पान वाढले आहे माझ्यासाठी आसे गृहीत धरले... (सर्दीसकट).. तो वाढतो पण मला बरे नसले, दमले आसले की..(स्त्री-स्वातंत्र्याचा विजय असो, असे म्हणत पण काही जण येतील बघ.)
वा वा वा!!!! बागे..... सहीच
वा वा वा!!!! बागे.....
सहीच आहे पान...
आता बसुयातच जेवायला 
(No subject)
मुग्धे चालू देत, मार ताव
मुग्धे
चालू देत, मार ताव
मनसोक्त जेवा! पोटभर जेवा!
मनसोक्त जेवा! पोटभर जेवा!
इथे, प्रत्येकाने हे "पान"
इथे, प्रत्येकाने हे "पान" तुमच्या बायकोने तुमच्यासाठी वाढलंय, असं गृहीत धरा >> बागे, अविवाहीत बायांनी काय इमॅजिन करायचं?
"हेच तर सांगायचं असतं मला
"हेच तर सांगायचं असतं
मला नेहमी,
जीवनात सगळंच 'मनासारखं'
नसतं रे...."
अगदी पटण्यासारखं....... रसपूर्ण
एक रुपक घ्यायचं, ते गद्यात
एक रुपक घ्यायचं, ते गद्यात लडबडून काढायचं, मधे मधे चिरून उभं आडवं मांडायचं आणि वर चार जणांनि हाच गुन्हा केल्याचे दाखले म्हणून लिंक्स द्यायच्या. :रागः
चुभुद्याघ्या असे आपले म्हणत आहे.
चांगल्या चांगल्या कविता करता आपण, असे का मधूनच????
बेफिजी ही आणि वरिल लिंक्स
बेफिजी
ही आणि वरिल लिंक्स दिलेल्या कविता, निव्वळ एक मौजेचा भाग, नि गगो वरच्या गप्पांत ओघाने आलेल्या आहेत, सिरिअस न च घेणे, मुद्दाम सर्वांनी आम्ही कैच्याकै मध्येच त्या पोस्ट्ल्यात!
कैच्याकै कविताही- असं काहीसं झालं खरं!
प्रांजळ अभिप्रायाबद्दल आभार!
हेच तर सांगायचं असतं मला
हेच तर सांगायचं असतं

मला नेहमी,
जीवनात सगळंच 'मनासारखं'
नसतं रे....
मानवी स्वभावच तो ...ऐकत नाही कधी कधी !
पण; मग, उजवीकडचं अळुचं फदफदं
पण;
मग,
उजवीकडचं अळुचं फदफदं पाहून,
आठ्या पडल्याच ना??
हेच तर सांगायचं असतं
मला नेहमी,
जीवनात सगळंच 'मनासारखं'
नसतं रे....
जरा, अळुला लोणच्याची साथ तर देऊन बघ,
जिभेवर रेंगाळणारी चव,
आवडू लागेल,
तुलाही....!!
सुरेख!
काहिच्या काही वाटली नाही. नवर्याला समजून घेण्याचा आणि सत्य पटवून देण्याचा प्रयत्न करणार्या नायिकेच्या भावना, नित्याच्या, साध्याश्या प्रसंगातून मांडणारी एक सुंदर कविता आहे.
वा! कविता आवडेश, तरी पण
वा! कविता आवडेश,
तरी पण "अळुचं फदफदं" म्हणजे जरा अतिच नाही का?
(No subject)
तरी पण "अळुचं फदफदं" म्हणजे
तरी पण "अळुचं फदफदं" म्हणजे जरा अतिच नाही का?
>>>>>>
आता फदफदं "पालकाचं" नसतं त्याला कवयित्री तरी काय करणार
अनिल, दीपक, चाऊ आभार
अनिल, दीपक, चाऊ आभार सर्वांचे..
ह.बा. वेगळ्या दृष्टीकोनातून कविता पाहिल्याबद्दल आपले विशेष आभार!
भुंग्या
Pages