अहो, पान वाढलंय.....!!

Submitted by बागेश्री on 13 July, 2011 - 01:50

नमस्कार मंडळी!!
वाटलं छान खाद्यपदार्थ तयार झालेत आता, पान घ्यावं वाढायला....
भुंगा, वर्षा, आर्या सगळ्यांच्या मदतीने, सजलेलं, हे पान!!

प्रेरणा:
http://www.maayboli.com/node/27195
http://www.maayboli.com/node/27262
http://www.maayboli.com/node/27270
http://www.maayboli.com/node/27277

[निवडुंगा, सर्दी असताना, शिकरण (http://www.maayboli.com/node/27282) खाऊ नये, म्हणून ते मी माझ्यासाठीच ठेवतेय राखून Happy ]
------------------------------------------------------------------------------

पान वाढलंय म्हणताच,
पानावर येऊन बसणारा तू....

पानातले पदार्थ, डावीकडून
उजवीकडे न्याहाळण्याची,
तूझी पद्धतच जुनी,
अन्
तेव्हा तुला न्याहाळण्याचा,
मला छंद..... तितकाच जुना!

चमचमीत लोणच्याला पाहून
तुझे चमकलेले डोळे अन्
पापड, कोशिंबीर, मुरांब्याला पाहून
आलेलं चेहर्‍यावरचं गोड हसू...

"व्वा, आज कढी पण का?"
....सर्दी झालीये ना रे तुला, मग अद्रक घालून,
थंडग्गार मठ्ठयाची गरमागरम कढी केलीच आज....

पण;
मग,
उजवीकडचं अळुचं फदफदं पाहून,
आठ्या पडल्याच ना??

हेच तर सांगायचं असतं
मला नेहमी,
जीवनात सगळंच 'मनासारखं'
नसतं रे....

जरा, अळुला लोणच्याची साथ तर देऊन बघ,
जिभेवर रेंगाळणारी चव,
आवडू लागेल,

तुलाही....!!

अहो, पान वाढलंय.....!!....................>>>>>>>>>> हे बागेश्री चे पान ........
.

.
.
.
हे पान पहायची परवानगी नाही.
webmaster | 19 July, 2010 - 05:45
तुम्हाला या पानावरती जायची मुभा नाही. हे पान सार्वजनिक वाचनासाठी नाही.>>>>>>>>>>>> हे अ‍ॅडमिन चे पान

Pages