शिकरण..

Submitted by निवडुंग on 12 July, 2011 - 14:42

प्रेरणा:
http://www.maayboli.com/node/27195
http://www.maayboli.com/node/27262
http://www.maayboli.com/node/27270
http://www.maayboli.com/node/27277
--------------------------------------------------

मी कच्च्या केळ्यासारखा द्वाड,
अन् तू धारोष्ण दुधासारखी,
फेसाळणारी,
शुभ्र, नितळ, उबदार..

तुझ्या मखमली कायेच्या विरहात,
खुंटीला टांगलेला जीव,
पिकून पडला चित्री पिवळाजर्द..
तू मात्र शेकोटीचे असह्य चटके सोसत,
माझ्यावरचं सर्व प्रेम एकवटून,
दाट सायेत मूक कबुली देत..

तुझं उतू जाणारं प्रेम पाहिलं,
अन् माझी कितीही सालवटं निघत,
काळजाचे तुकडे पडले,
तरी हसत राहिलो मी,
शेवटच्या घटकेपर्यंत..

नशिबी होतंच ना शेवटी आपल्या मीलन..

तुझ्या दाट प्रेमाच्या सायेत,
आकंठ बुडून,
त्याने वरून पांघरलेल्या,
गोड साखरेच्या दुलईत,
तू जेव्हा घट्ट बिलगलीस मला,
मधुर तरंगांची शिरशिरी,
रोमरोम भर उजळत,
जीव पुरता विरघळून गेला,
तुझ्यात एकजीव होण्या..

खरंच सांगतो तुला,
त्या एका क्षणासाठी,
कितीही "शिखरं" आणि "रणं" जिंकायची
तयारी आहे माझी,
हे शिक(तू)राणी..

शब्दखुणा: 

लाजो, बेफिकिर, वर्षा, मुक्तेश्वर, आर्या, किरण,
खूप खूप आभार.. Happy

बागे,
मन लाऊनच बनवतो मी जे काही असेल ते.. Wink

शिकरण अगदी चवदार जमलंय हं निवडुंगा..... झक्कास!!!! Happy

खरंच सांगतो तुला,
त्या एका क्षणासाठी,
कितीही "शिखरं" आणि "रणं" जिंकायची
तयारी आहे माझी,
हे शिक(तू)राणी.. >>> हे तर फारच आवडलं Happy

पनू खूप आभार.. Happy

सानी,
Proud
ते कालचं वैतागाचं शिकरण वरून सुचलंय.. लक्षात आलं की पुरणपोळ्या आपल्याला झेपायच्या नाहीत.. Proud