पोळी

Submitted by सानी on 12 July, 2011 - 10:34

प्रेरणा:
लोणचं
मुरांबा, पापड, चटणी, कोशिंबीर
भाकरी, भाजी, वरण-भात
कढी
शिकरण
अहो, पान वाढलंय.....!!

पोळी
--------------------------
गव्हाच्या पीठासारखा तू
आणि पाण्यासारखी मी
तुला आकार देण्यासाठी
तुझ्यात मिसळलेली

... आणि तुला आकार देता देता
तुझ्यातच सामावलेली
स्वत:चे अस्तित्व विसरुन
तुझ्यात एकजीव झालेली...

चवीपुरत्या मीठासारखं
चवीपुरतं भांडण
नात्यातल्या मऊपणासाठी
मायेचं मोहन

तुझ्यात जिरेन इतकंच
माझं अस्तित्व दाखवून
कधी कमी कधी जास्त
अशी तडजोड करुन

नात्याची कणीक कशी
व्यवस्थित मळून
सामंजस्याच्या क्षणांमध्ये
जरा भीजत ठेवून

जीवनाच्या पोळपाटावर
हळूवार लाटलेली
तव्यावरच्या चटक्यांसारखी
उन्हा-तान्हात भाजलेली

खरपूस पोळी वाढू
संस्कारांच्या ताटात
समाधानाला देऊया
निमंत्रण थाटात

Happy Happy Happy

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मस्तच झालीये पोळी.. Happy
पण साधी पोळी दिसतेय, पुरण नाही घातलं काय? Wink

भाज्या येवू द्यात आता - मेथी, शेपू, चुका, पालक, अंबाडा, आणि काय काय.. Proud

हो निवडुंग.... मुरलेल्या लोणच्यासारखी अनुभवाची म्हणूनच साधी पोळी आहे.... पुरण घातलेल्या गोग्गोड पोळीचे कॉन्ट्रॅक्ट नुकतेच लग्न झालेल्या जोडगोळ्यांना देऊयात... Proud

धन्यवाद! Happy

Proud
स्वयंपाक येत नाही, या गोष्टीचं फक्त आज थोडंसं (क्षणिक) दु:ख झालं.. झब्बू देता येणार नाही ना म्हणून.. Wink

धन्यवाद बंडुपंत Happy

निवडुंग, तुम्ही डायरेक्ट पुरणपोळीचाच झब्बू द्या... वेळ लागला तरी हरकत नाही...अनुभवाने सगळं शिकतो माणूस! Wink Proud

ही खरे छान कविता आहे. कैच्या कैत का बरे टाकली आहे? प्रामाणिक शब्द, खर्‍या भावना. अजून बाकीच्या वाचल्याच नाहीयेत.

धन्यवाद अश्विनीमामी Happy कविता विभागात हलवते आहे... समान प्रेरणेने लिहिलेल्या बाकीच्या सगळ्या कविता कैच्याकैतच असल्याने मी ही टाकली होती.

सानी ह्या असल्या कवितांच्या लाटेत तू पण आपली "पोळी" भाजून घेतलीस. हे झ्याक झालं. Happy Happy

संसारास वाहीलेली कविता आवडली.

सानी, अप्रतिम पोळी.... अजून वाढ दोन चार...

बाकी बागेश्रीची शैली जमली हो Happy आता ती वाचेल तर आपल्याला "डुप्लिकेट" म्हणेल.

रच्याक, तुझी पोळी माझ्या मुरलेल्या लोणच्याबरोबर खायला चांगली आहे Wink

व्वा१११ पोळी एकदम लुसलुशीत Happy

आता त्याबरोबर शिकरण हादडावे का? की लोणच्या बरोबर खावी? नाहीतर डाव्या बाजुला बरेच काही वाढलच आहे वर्षामायनी तेच खावे Happy

सानुले,
मस्तच गो...

हे तर,
<चवीपुरत्या मीठासारखं
चवीपुरतं भांडण
नात्यातल्या मऊपणासाठी
मायेचं मोहन> वा वा Happy

इथे आख्खं पानच वाढलय गो Wink
http://www.maayboli.com/node/27288

धन्स गो बागेश Happy पानातल्या पदार्थांसोबतच आख्खं पानच खाऊन आलेय... चविष्ट आहे एकदम Happy
राजे, तवा गरम आहे, तुम्ही पण आपली पोळी भाजून घ्याच आता Lol धन्स तुम्हालाही Happy

"खरपूस पोळी वाढू
संस्कारांच्या ताटात
समाधानाला देऊयात
निमंत्रण थाटात"

....छान …. हे अधिक आवडलं.
-------------------------------------------------------------------------------------------------------

फक्त ’देऊयात’ हा शब्द ’देऊया’ असा बदलायला हवा असं वाटतं
काही लोक बोली भाषेत करुयात, बोलूयात, देउयात असं बोलत असले तरी
शुद्धतेचा विचार करू पाहता हे शब्द बरोबर नाहीत असं सांगावसं वाटतं.
करूया, बोलूया, देउया हे शुद्ध आहेत.

Pages