Submitted by -शाम on 10 July, 2011 - 10:46
व्हायचा तरी कसा तुझा विसर
खोल खोल आतवर तुझी नजर
शब्द शब्द गोड वाटतो तुझा
जादुई किती सखे तुझे अधर
दूर आणलेस का असे मला
मोजल्यास चांदण्याच रातभर
वाट वाकडी तरी कशी म्हणू
साळसूद पाहिले इथेच जर
ऐकतोस तू कुठे निमीषभर
जा मना तुला हवे तसेच कर
एक एक वार झेलतो तुझा
रे जगा तुला कशी नसे कदर
सांग ना कसे रमायचे इथे
वाटते सुने तुझ्याविना शहर
..............................................शाम
गुलमोहर:
शेअर करा
का हिशेब मांडला मधेच
का हिशेब मांडला मधेच तू
प्यायलो कधी उधार आजवर....
ऐकतोस तू कुठे मिनीटभर
जा मना तुला हवे तसेच कर.. वा वा.
सांग ना रमायचे कसे इथे
वाटते सुने तुझ्याविना शहर...सुरेख.
चांगली झाली गझल.
दूर आणलेस का असे मला मोजल्यास
दूर आणलेस का असे मला
मोजल्यास चांदण्याच रातभर
वाट वाकडी तरी कशी म्हणू
साळसूद पाहिले इथेच जर
ऐकतोस तू कुठे मिनीटभर
जा मना तुला हवे तसेच कर
या द्विपदी जास्त आवडल्या.
छान गझल.
ऐकतोस तू कुठे मिनीटभर जा मना
ऐकतोस तू कुठे मिनीटभर
जा मना तुला हवे तसेच कर
एक एक वार झेलतो तुझा
रे जगा तुला कशी नसे कदर
सांग ना रमायचे कसे इथे
वाटते सुने तुझ्याविना शहर
सगळी गझल भन्नाट झालिये. हे तीन शेर खास. मिनीटभर शब्द नसता तर आणखी मजा आली असती.
मिनीटभर हा शेर छान आहे
मिनीटभर हा शेर छान आहे
अप्रतिम! संपूर्ण गझलच
अप्रतिम! संपूर्ण गझलच जबर्दस्त झाली आहे.
डॉ.साहेब धन्यवाद ...साती,
डॉ.साहेब धन्यवाद ...साती, प्राजू खूप खूप आभार.
ह. बा. तो मलाही खटकला तुला सुचतोयं दुसरा?
पाटीलसाहेब बाकी काहीच नाही का गझलेत?
बाकी आभार सगळ्यांचे.
मिनीटभर ऐवजी,निमीषभर करता
मिनीटभर ऐवजी,निमीषभर करता येईल.
जा मना तुला हवे तसेच कर >>>
जा मना तुला हवे तसेच कर >>> मस्त
डॉ च्या बदलासकट शेर आवडला...
एक एक वार झेलतो तुझा
रे जगा तुला कशी नसे कदर >>> मस्त
मतल्यातल्या दोन मिसर्यांमध्ये संबंध नीट प्रस्थापित होत नाहीये असे वाटले..
सांग ना रमायचे कसे इथे वाटते
सांग ना रमायचे कसे इथे
वाटते सुने तुझ्याविना शहर>>
छान! यावरून वैभवचा मतला आठवला.
तुझ्याविना हे शहर तुझे जाळपोळ अन लूटमार करते - असा काहिसा
शुभेच्छा!
-'बेफिकीर'!
मिल्या, मित्रा किती प्रामाणिक
मिल्या, मित्रा किती प्रामाणिक रे...बदल कसा वाटला ते सांग.
डॉ. साहेब आपल्या 'त्या' शब्दासाठी अख्खी गझल आपल्याला समर्पित.....
बेफि, खूप आभार!
तुमचा प्रतिसाद, मला नेहमीच गझलकारांची प्रातिनिधीक दाद वाटते.
आभारी आहे!......................................शाम
अप्रतिम खुप आवडली
अप्रतिम खुप आवडली
संपुर्ण रचना अप्रतिम आणि
संपुर्ण रचना अप्रतिम आणि लयीत.. शाम
ऐकतोस तू कुठे निमीषभर
जा मना तुला हवे तसेच कर >> हा शेर तर दिल खेच.
छान..!
छान..!
मस्त .
मस्त .
श्याम मतला चांगला झालाय आता
श्याम मतला चांगला झालाय आता मस्त...
सकारात्मक प्रतिसादाबद्दल आभार...
माऊ, चातक, मुक्ता, छाया, आणि
माऊ,
चातक,
मुक्ता,
छाया,
आणि मिलींद्....खूप आभारी आहे...:)