कोण जाणे त्याला,पाऊस का आवडतो?
थेंब पडू लागले, की दाराआड दडतो
होडी करत नाही, की बांधत नाही किल्ला
सरीत भिजणं सोडा, तो सोडत नाही मला
टक लावून बघत राहतो ऊंच करून टाच
अंगणात जेंव्हा सुरू होतो थेंबांचा नाच
अशात पाऊस थांबला की जोरात ओरडतो
का येत नाही पुन्हा म्हणून रड रडतो
पहिली फिट आली तेंव्हा डॉक्टर बोलला होता
हळूहळू समज येईल जसा होईल मोठा
डॉक्टर कुठे देव असतो म्हणतो तसं व्हायला
दिवस्,महिने,वर्ष गेली गुण नाही आला
कधी वाटतं उद्या नक्की 'बाबा' म्हणेल मला
पुस्तक हवं, गाडी हवी, त्रास देईल चांगला
अजून तरी तसा उद्या आला नाही
रोज नवा प्रश्न्न घेऊन दिवस उभा राही
कसं समजवावं त्याला मोठ्ठं कोडं पडतं
त्याच्या पावसासाठी मग अख्खं घर रडतं
कुशीत घेऊन त्याला मग मीच अंगणात येतो
आभाळ भरल्या डोळ्यांनी पावसाला बोलावतो
"येरे येरे पावसा तुला देतो पैसा
येरे येरे पावसा तुला देतो पैसा "
--शाम
फारच टचिंग........आत
फारच टचिंग........आत भिडणारी.....
छान...! भारी... म्हणेन, देईन
छान...! भारी...
म्हणेन, देईन च्या ऐवजी म्हणेल, देईल असं हवं ना..
नि:शब्द !
नि:शब्द !
ओह... भिडली फार!
ओह... भिडली फार!
शशांक, मुक्ता, विशाल आणि
शशांक, मुक्ता, विशाल आणि आर्या....खूप खूप आभार!!!!!!!!
मुक्ता बदल केलाय...धन्यवाद!
हृदयस्पर्शी आशय
हृदयस्पर्शी आशय
ह्म्म्म्म.. ! चांगली म्हणवत
ह्म्म्म्म.. !
चांगली म्हणवत नाही.. वेरी टचिंग..
उल्हास, निवडुंग्...खूप खूप
उल्हास, निवडुंग्...खूप खूप आभारी आहे!!!!
>>कसं समजवावं त्याला मोठ्ठं
>>कसं समजवावं त्याला मोठ्ठं कोडं पडतं
त्याच्या पावसासाठी मग अख्खं घर रडतं
आशयघन..
सुंदर आहे... काही लिहवत नाही
सुंदर आहे... काही लिहवत नाही पुढे
योग आणि हर्षल आभार!!!!!!
योग आणि हर्षल आभार!!!!!!
खरंच टचिंग
खरंच टचिंग
सुंदरच..फारच आवडली
सुंदरच..फारच आवडली
फारच ... खोलवर गेली... कोरली
फारच ... खोलवर गेली... कोरली गेली..
छान
छान
नि:शब्द झालो फक्त डोल्यांच्या
नि:शब्द झालो
फक्त डोल्यांच्या कडा पाणावल्या.
भरत, स्मितू, अज्ञात, जोतिराम,
भरत, स्मितू, अज्ञात, जोतिराम, आणि दक्षिणा....खूप खूप आभार!
मस्त आवडली !
मस्त आवडली !
साध्या शब्दांतील सुंदर
साध्या शब्दांतील सुंदर आविष्कार.
काळजाला हलवून जाणारी कविता...
>>कसं समजवावं त्याला मोठ्ठं
>>कसं समजवावं त्याला मोठ्ठं कोडं पडतं
त्याच्या पावसासाठी मग अख्खं घर रडतं
नि:शब्द.. काय लिहावे सुचतच नाहिये..
(No subject)