झाडपण

Submitted by कमलाकर देसले on 14 June, 2011 - 07:55

तू सावली होऊन
समर्पणाची भाषा
बोलू नको .
माझं अजून
झाडपण
नक्की नाहीये .

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अप्रतिम!

काय लिहीलंत हो????

माझ्यातर्फे भेटाल तेव्हा एक मैत्रीपूर्ण चहा, नाश्ता आणि गप्पा!

-'बेफिकीर'!

बेफिकीरजी , तुमच्या कवित्वाला तर आहेच पण रसिकतेलाही सलाम , आणि निवडुंग तुम्हाला ही धन्यवाद !!
ता.क. : उद्या बुधवारी 15 जूनला सायंकाळी 05वाजून 05 मिनिटांनी सह्याद्रि वाहिनीवर " शर्यत रे अपुली " या कार्यक्रमात माझे कविता वाचन आहे.शक्य झाल्यास पहा , कवितेसह भेटू .