गुंता

Submitted by sanika11 on 5 February, 2009 - 01:53

विचारांचा गोंधळ करावाचं कशाला?
सोडून द्यावे चिंताना
मुक्तपणे,
अगदी तिच्या
गोर्‍या पाठीवर झुलणार्‍या
वेणीच्या शेपटाप्रमाणे.

म्हणजे कसं...
गुंता ही होत नाही
नि
आपल्याला कसं हलकं हलकं वाटत!

गुलमोहर: 

छान

छान

>>>>>> म्हणजे कसं...
गुंता ही होत नाही
नि
आपल्याला कसं हलकं हलकं वाटत!>>>>

हो अगदी खरं हा .

.......... सुन्या आंबोलकर

हसरी,शहाणी कविता!आवडली.

जयन्ता५२

छान!
शरद

सोडून द्यावे चिंताना
मुक्तपणे,

म्हणजे कसं...
गुंता ही होत नाही
नि
आपल्याला कसं हलकं हलकं वाटत!

Happy

किती साध्या सोप्या शब्दांत सांगितलेत...........

विवेकदा, किती गुंते घालता हो? चिंता सोडुन देणं, माझ्यासारख्या सामान्य माणसालातरी शक्य नाही. खरेतर चिंताच मला बळ देते, नवीन मार्ग सुचवते. बाकी तुमची कविता नेहेमीप्रमाणेच सुरेख आणि अंगी बाणवणे कठिण असली तरी मनापासुन पटलेली. Happy

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: !
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: !!

छानच आहे...;)
'अगदी तिच्या
गोर्‍या पाठीवर झुलणार्‍या
वेणीच्या शेपटाप्रमाणे.
'
या ऐवजी
'अगदी तिच्या
ललाटावर उड्णार्‍या
बटां प्रमाणे.
'
असे असते तर realistic वाटले असते...(कारण आज्-काल maximum पोरी bopcut-boycut करतात...:G)

-->-->-->-->-->-->-->-->-->
बुटक्यांच्या या देशात...आम्ही उंच माणसे..

विशाल, तुझे बोलणं बरोबर आहे.पण मी असे म्हणतो, अशी कल्पना सुद्धा मनाला सुखावते. हो ना?

अगदी !!

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: !
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: !!

आणी त्या शेपट्यात मन गुंतलं की नवा गुंता! Happy

प्रतिसादाबद्दल धन्यावाद.
chaoo
सुरेख!