बारात राहाणारे मायबोलीकर गटग करण्यात नेहेमी उत्साही असतात या परंपरेला जागून बाराचाच एक भाग असलेल्या जर्सी सिटीत रहाणार्या माबोकरांनी गुपचुप एक गटग ठरवून ते झटपट साजरे केले हे कळवताना आम्हांस अत्यंत आनंद होत आहे!
खरे तर या गटगचा महावृत्तांत लिहिण्याचे आम्ही मनावर घेतले होते, परंतु, काही अपरिहार्य कारणामुळे पदार्थांचे प्रचि आणि थोडंसंच वर्णन यावर हा वृत्तांत आम्ही आवरता घेत आहोत.
तर, मायबोली सभासद असलेल्या, जर्सी सिटीत रहाणार्या महिला वर्गाचं एक चिमुकलं गटग काही महिन्यांपूर्वी पार पडलं तेव्हाच या गटगची आखणी करायचा बेत पक्का झाला. त्यानुसार, काल रोजी हे गटग करायचे नक्की झाले. सध्या काही काळासाठी येथे आलेले जीएस हेही गटगमधे येऊ शकतात हे समजले आणि वर्षा यांच्या घरी सर्वांनी भेटायचे ठरले.
श्री व सौ महेश-वर्षा आणि त्यांचा मुलगा ओंकार, श्री व सौ अमित-anjali_12 आणि त्यांची मुलगी आभा, श्री जीएस, श्री व सौ. माणूस-बाईमाणूस(सागर-सोनाली) आणि श्री व सौ विश्राम-प्रज्ञा९ असे सगळे जमल्यावर ओळख करून घ्यायचा छोटासा कार्यक्रम पार पडला.
थोड्याफार गप्पा झाल्यावर महिला वर्ग स्वयंपाकघरात जाऊन पदार्थ गरम करण्याच्या तयारीत गुंतला. १५-२० मिनिटे झाल्यावर सर्व खाद्यपदार्थ मेजावर मांडून झाले आणि सर्वांनी त्याचा आस्वाद घेत, गप्पा मारत आपला आनंद व्यक्त केला.
मायबोलीवरचे आवडते बाफ, प्रतिक्रिया, काहीकाही आयडींबद्दल चर्चा, १८ तारखेचे बारा गटग, भारतातले राजकारण, भ्रष्टाचार, नाटक-चित्रपट, नोकरी-व्यवसाय, मुंबई-पुण्यातले कोचिंग क्लासेस, जर्सी सिटीतली खादाडी, जवळपासची भटकायची ठिकाणं इत्यादी अनेक विषयांवर उद्बोधक चर्चा झाली.
रात्रीचे १०:३० झाल्यावर आम्ही गप्पा आवरत्या घेतल्या, उरलेल्या पदार्थांचे वाटप केले आणि आपापल्या घरी निघालो.
इतकं छान गटग आखल्याबद्दल वर्षा आणि महेश यांचे आभार
काल ओंकारसुद्धा आमच्या गटगमधे पूर्णपणे सामील झाला होता. नुकताच तो बोलायला शिकल्यामुळे त्याच्याही अखंड गप्पा चालू होत्या. मागच्या वेळी जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा जरा बुजत असलेला तोच हा ओंकार का असा प्रश्न पडावा इतका छान बोलत होता तो.
आणि आभासुद्धा सगळ्या मावशी-काकांना भेटल्यावर खेळात मग्न होती. मी तिला उचलून घेतल्यावर गोड हसून ओळख दाखवली तिने. ती स्वभावाने जरा शांत आहे (आईवर गेली नसावीच
)
तर असा भेटीचा सोहळा मस्त पार पडला. पुन्हा भेटण्याची इच्छा व्यक्त करून आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. 
हे फोटो..
१. सोनालीने केलेले स्टार्टर - पनीर टिक्का
२. मेन कोर्स - पावभाजी (प्रज्ञा) आणि शाही पनीर बिर्याणी (अंजली_१२)
३. डेझर्ट - जीएस यांनी आणलेले केक्स आणि वर्षाने घरी केलेला ब्राऊनी केक
एकदम टेम्प्टिंग पनीर, भरपूर अमूल बटर घातलेली पावभाजी आणि वरून बटर चोपडून ओव्हनमधे खमंग भाजलेले पाव, प्रत्येक थरात साजूक तूप घातलेली पनीर बिर्याणी, बघताक्षणी खाऊन टाकावेत असे वाटणारे केक्स आणि वर्षाने केलेला अप्रतिम ब्राऊनी केक.....
मझा आ गया! अशी गटगे उत्तरोत्तर होत राहोत!
(वरच्या वृत्तांतातून निसटलेलं लिहायची जबाबदारी कालच्या उपस्थितांपैकी कुणीही घ्यावी.
)
धन्यवाद.
अंजली(कल्लोळकाकू), आता 'तिला'
अंजली(कल्लोळकाकू), आता 'तिला' बाराची अंजली म्हणीन.
तिलाच म्हणत होते भर घाल वगैरे...
प्रज्ञा, मी युवती कॅटेगरीतली
प्रज्ञा,

मी युवती कॅटेगरीतली आहे, हे मी परवाच निक्षून सांगितलेलं आहे
बरं बरं....पुढच्या वेळी नक्की
बरं बरं....पुढच्या वेळी नक्की लक्षात ठेवेन.
बाराची अंजली म्हणून अजुन एक
बाराची अंजली म्हणून अजुन एक सुचलेलं..
अंबारी !!
बापरे माझं बारसं जोरात
बापरे माझं बारसं जोरात चाल्लेलं दिसतंय


बाराची याचा अर्थ दुसराही काही होतो ना?
प्रज्ञा, आठवलं की नक्की लिहिते... आपण एवढी बडबड केलीये की मुद्द्याचं आठवायला पाहिजे
(No subject)
अगं पण आपण पुस्तक-मासिकांची
अगं पण आपण पुस्तक-मासिकांची देवघेव केली ते नाही लिहिलंस
मस्त वृ आणि झकास मेन्यू
मस्त वृ आणि झकास मेन्यू
गुपचूप गटग नाव का ठेवलं ते कळलं वरच्या पोस्टींवरून पण झटपट का? झटपट उरकलतं की काय ?

रविवारी रात्री साडेसातच्या
रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास ओळखीच्या आवाजात "भो... भो" असे ऐकू आल्यावर ते हाकेच्या अंतरावरून येत आहे ना याची खात्री करून घेतली, आणि लगेच दोन बिल्डिंगा ओलांडून वर्षाच्या घरी पोहोचलो.
पाव भाजी, बिर्याणी, पनीर टिक्का, गप्पा, हास्यविनोद, ओंकारच्या बिनधास्त बाललीला यात तीन तास कसे गेले ते कळलेच नाही.
यातल्या कुणाला आधी भेटलो नव्हतो वा आधी कुठला संपर्कही नव्हता. माणूस (आणि जुना सायुरी) सोडल्यास इतर आयडी तर माहितही नव्हते. पण असे अजिबात वाटले नाही की पहिल्यांदाच भेटत आहोत. महेशला तर तातडीने मायबोली सदस्यत्व देणे आवश्यक आहे,, इतका तो मायबोलीकरच वाटतो.
बाराच्या येऊ घातलेल्या (ओलेत्या हत्तीला मिठी फेम...) एवेएठीला या सर्वांनी यावे असा मी आग्रह केला आहे. कोणाकोणाला जमते ते बघायचे. झक्की येणार नाहीत याबद्दल मी दु:ख व्यक्त करताच, बाईमाणसाने ते असेच म्हणतात, पण शेवटी येतात असा आशावाद प्रकट केला आहे. तेंव्हा झक्कींनी यायचे जरा मनावर घ्यावेच...
राराबारा म्हणजे काय हेसुद्धा माहित नसलेल्या मला आवर्जुन बोलावल्याबद्दल वर्षाचे, आणि उत्तम पदार्थांबद्दल वर्षा, सोनाली, अंजली आणि प्रज्ञा या माबोकर सुगृहिणींचे मनापासून आभार.
निषेध करणार्या सर्वांचा हार्दिक निषेध आणि कडक पाठिंबा.
प्रज्ञा ,GS मस्त जमलाय
प्रज्ञा ,GS मस्त जमलाय वृत्तांत
बाराकरांचे गटग म्हणजे कसे वाजतगाजत झाले पाहिजे होते ही आम्हाला लागलेली रुखरुख तुम्ही लोकांनी बोलून दाखवलीच.
ठरल्याप्र्माणे संध्याकाळी ७.३० च्या मूहुर्तावर आम्ही वर्षाच्या घरी पोहोचलो. माणसाने GS ना फोन केला तर त्यांनी "आज गटग आहे? " असा पुन:प्रश्न टाकून आम्हालाच कोड्यात पाडले. मग मी वर्षाला कोपर्यात घेवून आजच गटग असल्याची खात्री करुन घेतली. १०-१५ मिनिटांनी प्रज्ञाचा फोन आला तेव्हा "गटग आहे?" ह्याचे शंकानिरसन झाले. तेवढ्या वेळात छोट्या ओंकारने आम्हाला त्याच्या सगळ्या खेळण्यांचे डेमो दाखविले.
अंजली-परिवार आला आणि गटग असल्याचा भास मला जाणवायला लागला.GS येताच खरा गप्पांचा फड रंगायला सुरुवात झाली. रामदेवबाबांचे उपोषण, मुंबापुरीतील सुप्रसिद्ध अग्रवाल क्लासेस, सध्या शिक्षणात चाललेले घोळ, आभाच्या शाळेत होणारा graduation ceremony (ती सध्या KG त आहे असे मला अंजलीकडूनच समझले), उसगावातील driving tickets बद्द्लचे काही माहित नसलेले नियम(हे महेशकडून) अशा नाना विषयांवर गहनीय चर्चा झाली.
तोंडातील बाष्प दवडल्याने पोटातील कावळ्यांनी मग असहकार पुकारला. मोर्चा जेवणाकडे वळवल्यानंतर, "तुमचा आवडिचा बाफ कोणता? आणि का?" असे वर्षाने सगळ्यांना विचारुन कोड्यात टाकले. आपण दिलेले उत्तर चूक की बरोबर ह्याचा मनात विचार करत सगळ्यानी ताट साफ केली (कारण जेवताना कोणी जास्त बोलल्याचे आठवत नाही)
घड्याळाचा काटा पुढे सरकत असल्याने गटग आवरते घेण्याचे ठरविले. खूपच पदार्थ उरल्याची हळहळ प्रज्ञा आणि अंजलीने व्यक्त करताच ती बारातल्या गटगची परंपरा आहे आणि ती चालवली पाहिजेच ह्याचे मी समर्थन करताच वर्षाने झिपलॉक भरायला घेतल्या. वर्षा-अंजलीकडे असलेल्या पुस्तकांची देवाणघेवाण झाली आणि घाईघाईत का होईना पण रुढी-परंपरेला साजेसे झटपट गटग पार पाडले.
वा जीएस, सोनाली शॉर्ट अँड
वा जीएस, सोनाली शॉर्ट अँड स्वीट लिहिलंय
आवडीचा बाफ म्हटल्यावर बहुमत 'विरंगुळा' यालाच मिळाले.
Pages