लिम्बीच शेत आणि बन्धार्‍याच पाणी

Submitted by limbutimbu on 25 June, 2008 - 07:15

इथल्या माझ्याच बर्‍याच पोस्टी मीच उडवल्या होत्या २००९ मधे!
एक विचार असा की इत्क्या मोठ्या विश्वातील मोहोरीच्या दाण्यायेवढ्या पृथ्वीवर वावरत असलेल्या अब्जावधी जीवान्मधिल एक अमिबासमान मी, त्याने काय इकडुन तिकडे हलवले, केले तर त्यात विशेष ते काय? तरी पण..... रहावत नाही ना सान्गितल्याशिवाय, तर..;
मे २०१२ मधे आधीच ठरविल्याप्रमाणे मी लिम्बीच्या जमिनीवर जन्गलाशेजारी तम्बुवजा झोपडी उभारुन लिम्बीसहित आठ दिवस राहिलो अन जे काय केले त्याचे निवडक फोटो पुढे देत आहे.

१ हा इथे असा तम्बु उभारला होता
Photo0424.jpg

२ हे असे पावसाचे पाणी साठविण्याकरता सिमेण्टच्या रिकाम्या पोत्यात माती भरुन शेततळे करायचे काम सुरू केले.
Photo0434.jpg

३ शेवटच्या दिवशी म्हणजे १३ च्या रविवारी, लिम्बी अन थोरली काम करताना
Photo0446.jpg

४ दरम्यान, पेरणीची जागा "तरवं" ते भाजण्याचे हे काम
Photo0436.jpg

५ पोत्यात भरण्याकरता माती/मुरुम खणुन काढताना लिम्ब्या
vlcsnap-128434.jpg

६ आणि हे अंतिम दृष्य स्वरुप शेततळ्याचे
vlcsnap-44789.jpg

आकार साधारणतः १६' x १६' x ७.५'
दर घनफुटास २७.३०० लिटर पाणी म्हणजे, यात ५२,४१६ लिटर पाणी मावेल.
यामधे अजुन प्लॅस्टिक कागद अंथरायचा आहे. Happy
येत्या दोनएक वर्षात अशीच एकापुढे एक अशी चार पाच तळी तयार करता आली तर दीडदोन लाख लिटर पाणी सहज साठू शकेल, त्यामुळे शेतीची तसेच जवळील जन्गलातील वन्यप्राण्यान्ची पाण्याची सोय होईल.
एकुण ४५० रिकामी पोती वापरली, प्रत्येक पोत्यात ३ घमेली माती/मुरुम म्हणजे १३५० घमेली माती भरली, म्हणजेच तितकेवेळा ते घमेले पायावर नळगीच्या हाडावर आपटत्/घासत होते, शेवटी त्याला पोते बान्धावे लागले.
प्रत्येक पोते माती भरताना, भरल्यावर बाजुला ठेवणे, स्टेपल करणे, पुन्हा उचलुन जागेवर आणणे व भितीवर नीट रचणे असे किमान पाच वेळा हाताळले जायचे.
पोत्यान्च्या दोन ओळिन्च्या मधे भरलेले डबराचा घनफुटाचा हिशोब अजुन केला नाहीये.
सोमवार ७ मे ते रविवार १३ मे इतके दिवस सलग काम केले.
शेवटच्या दिवशी मुलिन्ची मदत झाली तर मधल्या दिड दिवसात कामावरील एका बाईची मदत झाली.
प्यायच्या पाण्याचि सोय अंदाजे पाऊण किलोमीटर अंतरावरील विहीरीवरुन डोक्यावरुन हण्डेकळशीतुन पाणी वाहून आणुन करावी लागत होती.
सकाळ सन्ध्याकाळ एकेक कळशीभर पाणी प्यायले जात होते.
सकाळी साडेसहा/सात ते बारा आणि दुपारी ३ ते ५/६ वाजेस्तोवर काम करता यायचे.
दरम्यान एका दिवशी शुटिन्ग करत असता, पायाखालील फासेपारध्यान्नी सशाकरता लावलेल्या फाशातील टोकदार काडी पायात घुसल्याने झालेल्या जखमेमुळे धनुर्वाताचे इंजेक्शन घेण्याकरता दुसर्‍या गावी जावे लागल्याने अर्धा दिवस वाया गेला.
पण एकुणात काम छान, भरपुर मनपसंद झाले.
अतिशय प्रतिकुल परिस्थितीवर मात करत करत, अर्थात लिम्बीच्या सहाय्याशिवाय असे काम होणे अशक्यच.

_____xXx______

July & August, 2012
तळे तर बनविले, पण पुढे काय? हे तळे "ट्रायल प्याच" म्हणूनच बनविले आहे, खरे तर तिथेच एक विहीर खोदायची आहे व सध्याच्या तळ्याच्या बाजुला दोनएक लाख लिटर पाणी साठविण्याची सोय करायची आहे.
तर यंदाच्या मोसमात, तळ्याकरता वापरलेल्या पोत्यान्वर उन्हाचा परिणाम काय झाला, आत अन्थरायचा कागद कसा अन्थरावा इत्यादी प्रात्यक्षिक करुन झाले.
उन्हाने पोती इतकी कुरचुक झाली की बोट लावले तरी फाटू लागली. शिवाय नाठाळ पोरे/लोक इत्यादीन्नी मारलेले ब्लेडचे काप देखिल प्रश्नचिन्ह उमटवुन गेले.
ऐनवेळेस योग्य प्लॅस्टिकची सोय करु न शकल्याने एक जुना ३०'X४०' आकाराचा भोके पडलेला कागद काही भोके बुजवायचा प्रयत्न करुन कसातरी अन्थरला, व उन्हाने रापलेल्या पोत्यान्ची तळ्याची आतली बाजुतरी सुरक्षित करुन घेतली. भोकामुळे पाणी साठून रहाणार नाही हे निश्चितच होते, पण येणार्‍या पाण्याचा प्रवाह संयमित करण्याचे, व वेळेस जास्तीचे जे काय पाणी साठले असेल ते ऐनवेळेस वापरण्याचे नियोजन होते. ते यशस्वी झाले. आत्ता घेतलेल्या धड्यातुन पुढील वर्षातील कार्यवाहीदेखिल निश्चित झाली आहे. हा अनुभव उपयोगी पडेलच.
४ ते ६ आगस्ट, २०१२ दरम्यान पाणी आत घेऊन, लावणी पूर्ण झाली, त्यावेळचे काही फोटो. लो क्वालिटी मोबाईलवरुन घेतल्याने तितकेसे चान्गले नाहीत पण कल्पना येण्यास पुरेसे आहेत.
Photo0174.jpgPhoto0180.jpgPhoto0182.jpgPhoto0184.jpgPhoto0187.jpgPhoto0189.jpgPhoto0207.jpgPhoto0210.jpgPhoto0185.jpg

गुलमोहर: 

शेती हा सर्वोत्तम व्यवसाय .आपल्याला शुभेच्छा .

>>नीधपा ला येउन दोनच तास झाले अन लगेच तांदळाचा मासला की काय मागतायत
नक्कीच ड्यु.आय. <<

कप्पाळ... आजूबाजूला वाचा की राव!

लिंबुभाव, याहून चांगले उत्पन्न तुम्हाला मिळो! शुभेच्छा!

लिंब्याभाऊ,सॉलीड हेवा वाटतोय हो तुमचा! भाताची शेती पाहून माझ्या पन्हाळ्याची आठवण झाली.
आणी फोटोत काळा ब्लॉक चेहर्‍यावर टाकण्याएवजी वरच्या 'चंद्रा'वर टाकायचा होता!
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

आगाऊ, आगाऊच आहेस.
पण लिंबुदा खरेच हेवा वाटतोय, तुमच्यापेक्षाही तुमच्या सासरेबुवांचा, त्यांच्या आत्मविश्वासाचा, त्यांच्या जिद्दीचा, त्यांच्या कर्तुत्वाचा.
त्यांच्या अफाट मेहेनतीला आणि कर्तुत्वाला शतशः प्रणाम !!! Happy
बाकी तुमच्या रणगाड्याचे पराक्रमही वाचले. आपले पाय कुठे आहेत प्रभु !! Lol
सस्नेह...

विशाल.
____________________________________________

कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: !
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: !!

अरे,आगाऊपणा नाही रे,मी ही हळूहळू त्याच 'चंद्रा'च्या वाटेवर आहे Uhoh त्यामुळे तो पटकन डोळ्यात आला.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

मग आता चंद्रदर्शनाचा योग कधी येणार आमचा ? Lol

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: !
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: !!

लिंबूदादा, 'हमर' च्या पुढे बसून सुनील शेटीने 'पोझ' दिली होती, त्याची आठवण आली बघा आता. Proud
बाकी तुमचे चंद्रदर्शन अन तुमच्या जीपचा रंग फार्फार आवडला. कुठे बघायला मिळेल ही जीप?

--
पुढच्या युगांची सर्वच दु:खे; मीही भोगीन म्हणतो,
आजच्या व्यथांना काय करावे; कुणी सांगतच नाही!

लिंबुभौ.. त्या आंबेमोहर ५७ च्या वाणाविषयी विचारायचे कारण म्हणजे लहान असताना नेहमी घरी हाच तांदुळ असायचा... खुप सुंदर दरवळ सुटायचा... चवपण अशी न्यारी असायची.. किती शोधला तरी मिळत नाही आता.. Sad म्हणुन तुम्हाला विचारलं .. बाकी आवर्जुन माहिती दिल्याबद्दल धन्यवाद...

अरे वा! बघता बघता तांदूळ आला पण! कित्ती छान!!

माझ्या त्या प्रसिद्ध "रणगाडा" जीपसहित माझा >> अरे तुझे केसं गेले की काय? Happy

असं शेती बद्दल वाचलं की नोकरी, शहर सोडुन गावात रहावसं वाटतं..अर्थात अशक्यच आहे ते..त्यामुळे आम्ही आपले सणा-वारावर भागवतो..आज पोळा न..घरीच मातीच्या बैलांची पूजा केली. विदर्भात खरोखरच्या बैलांची पूजा करतात..पूरण्-पोळीचा नैवेद्य दाखवतात..बैलांना आज कामाला सुट्टी.. लिम्बुटिम्बु, तुमच्याकडे हा सण असतो का?

<<< साठवणूक क्षमता मोजण्यासाठी किती स्क्वेअरफूट म्हणजे किती लिटर? >>
लिम्बूदा, मागे मत्स्यपालनाच्या तुमच्या बाफवर मी काही लिहीलं होतं. त्याक्षेत्रातल्या काही माहीतीवर आधारीत.

१ क्यू फिट = २८.५ लिटर
१ लि. पाणी = १ किलो वजन
१ क्यू. मीटर = १००० लीटर.

जेव्हढ पाणी जास्त तेव्हढ वजन जास्त, तेव्हढ्या भिंती जाड.

तुमचा कॉन्टॅक्ट नंबर असल्यास द्या. मी ठाण्याला रहातो. माश्यांसाठी हौद / तळी वापरणार्‍या माझ्या मित्रांकडनं आणखीन काही माहीती मिळवता येईल. Happy एकदा तुम्हाला भेटण्याचीही इच्छा आहे (तुम्हाला आवडत असल्यास)

तुमच्या वाटचालीला शुभेच्छा.

लिंबूदा, त्या ठिकाणी मासे, ससे, कुत्रे पालन करता येईल का चा जंतू मला चावलाय. Happy हे उद्योग बर्‍यापैकी फलदायी आहेत. तुमच्या विपू वर कॉन्टॅक्ट डिटेल्स टाकतो. शहरात जन्मून आणि वाढूनपण न माणसाळलेल्यापैकी मी एक आहे.

लिम्बाजीराव , शेततळ्याची शासनाची स्कीम आहे. त्यात काही अनुदान मिळू शकते का ते पहावे लागेल.
हे शेत आहे कोठे. गाव तालुका, जिल्हा? आणि तुमच्या चंद्राचा फोटो कुठे आहे? Happy
काही फोटो एडिट केलेत का?

Pages