Submitted by सांजसंध्या on 23 May, 2011 - 23:57
ही पोर ( कविता) रूसली म्हणून खरडलेय काहीतरी ..
कुठूनी उतार नाही
कुठूनी चढाव नाही
रूसली ही पोर तिच्या
भावनांना वाव नाही
तोच तोच दिवस रोज
विसाव्याची बात नाही
गंधाळिल्या मोग-याची
पुन्हा तशी रात नाही
साचलेल्या पाण्याला या
कुठूनी प्रवाह नाही
रूसली ही पोर तिच्या
भावनांना वाव नाही
उन्हाने जो गेला पारा
आरशाला भाव नाही
आठवांची सांज होई
आसवांचा ठाव नाही
खुलले ना शेर अता
गझलेला दाद नाही
हरविले शब्द तिचे
तिची तिला याद नाही
याद नाही दाद नाही
कवितेला नांव नाही
रूसली ही पोर तिच्या
भावनांना वाव नाही
- संध्या
३ ऑक्टोबर २०१०
गुलमोहर:
शेअर करा
उन्हाने जो गेला पारा आरशाला
उन्हाने जो गेला पारा
आरशाला भाव नाही
आठवांची सांज होई
आसवांचा ठाव नाही
:मूवामो:
:मूवामो:
उन्हाने जो गेला पारा आरशाला
उन्हाने जो गेला पारा
आरशाला भाव नाही
आठवांची सांज होई
आसवांचा ठाव नाही>>>>>>... जियो
खुलले ना शेर माझे गझलेला दाद
खुलले ना शेर माझे
गझलेला दाद नाही
अप्रतिम... :स्मितः
अप्रतिम... :स्मितः
अरे....................आता ही
अरे....................आता ही रुसली का...............
मागच्या कवितेत ती उदास होती......आता रुसली...?...... म्हणुन म्हणालो होतो भेट म्हणुन.............. 
“साचलेल्या पाण्याला
“साचलेल्या पाण्याला या.....
..........
भावनांना वाव नाही”
... छान
तिसर्या कडव्यात ’माझे’ हा शब्द कसा काय आला हे मात्र कळलं नाही.
सर्वांचे आभार उकाका ...थँक्स.
सर्वांचे आभार
उकाका ...थँक्स. लक्षात आणून दिलत ते. सुधारली चूक
उदय वन.. काय चाल्लय काय ऑ ?
उदय वन..
काय चाल्लय काय ऑ ? इतकं बारीक लक्ष ?? ऑ
ऑ ऑ ऑ ???
ते चित्र किती सुंदर आणि
ते चित्र किती सुंदर आणि त्याला साजेशी कविता किती गोड! मस्तच गं सांजसंध्या
क्या बात है...रिदम प्रचंड
क्या बात है...रिदम प्रचंड आवडला.. कविताही खुप आवडली !
मात्र....
रूसली ही पोर तिच्या
भावनांना वाव नाही...... यातली दुसरी ओळ जरा खटकलीय्...ओव्हरऑल मुडशी जरा वेगळी वाटली पण ते माझ परसेप्शन आहे ...
शुभेच्छा !
सानी.. थँक्स
सानी.. थँक्स गं
गिरीशदा...थँक्स अ लॉट
अप्रतिम ! आवडलीच..
अप्रतिम !
आवडलीच..
वाह ! लई भारी ! तुमच्या अनेक
वाह ! लई भारी !
तुमच्या अनेक कवितांमध्ये तुम्ही बहुतेक रुसलेल्या दिसलात का ?
ते चित्र भारी आहे... कोणी
ते चित्र भारी आहे... कोणी काढलंय??
कवितेमधले मला फार कळत नाही... वाचतो आणि आनंद घेतो.. उगाच ही चांगली ती वाईट असे निरीक्षण मला नोंदवता येत नाही...
चित्र देखण ,पोर सुबक ,कविता
चित्र देखण ,पोर सुबक ,कविता मार्मीक .
(No subject)
प.भ., अनिल ७६ थँक्स ( :मूक
प.भ., अनिल ७६
थँक्स
( :मूक वाचक मोड: चा ठसका जोरात लागलेला दिसतोय इथं
)
एकदम मस्त आहे कविता. आवडली.
एकदम मस्त आहे कविता. आवडली.
ही पोर रूसली ना कि डोळ्यात
ही पोर रूसली ना कि डोळ्यात पाणी आणते. एकदा चक्क कविवर्य भा रा तांबेंवरच रूसली... ते ही वर्षभर !
आणि जेव्हा हासली तेव्हां मधुघट घेऊनच आली.
मनस्वी आहे ही पोर (कविता )
मस्त मस्त मस्त!!
मस्त मस्त मस्त!!