Submitted by rutuved on 22 May, 2011 - 21:04
उतरती दुपार,
परक शहर..
रंगबेरंगी पानांची,
स्वच्छंदी पानझड..
अशातच मग...
वाहत्या वा-याबरोबर,
काही पानं तुम्हाला येऊन बिलगतात...
त्या रंगात वाहत जाताना,
अचानक
उराशी बाळगलेली
सारी पानं, नजरेसमोर पसारा घालतात...
नि भरकटत नेतात...
वा-याच्या दिशांच्या पार.......!
उरकुन घेत,
आपण स्वत:शीच हसतो,
एक पान, उचलून वहीत ठेवत...
अव्याहत...
आयुष्याची निसटती पानं
गोंजारत बसतो..
नि परतीच्या वाटेवर,
हलकेच गुणगुणतो...
जिंदगी को ए हमदम...आ गया मुस्कुराना...
ऋतुवेद
गुलमोहर:
शेअर करा
आमास्नी विड्याचं पान ठाऊक,
आमास्नी विड्याचं पान ठाऊक, बाकी चालुद्या.
अचानक उराशी बाळगलेली सारी
अचानक
उराशी बाळगलेली
सारी पानं, नजरेसमोर पसारा घालतात...
नि भरकटत नेतात...
वा-याच्या दिशांच्या पार.......!
रंगबेरंगी पानांची, स्वच्छंदी
रंगबेरंगी पानांची,
स्वच्छंदी पानझड..>>>
आवडलं!
कविता आवडली अमोल
कविता आवडली
अमोल केळकर
-------------------------------------------------------------
मला इथे भेटा
आवडली..
आवडली..
सुरेखच
सुरेखच
फकिरः अहो मग माबो वर काय
फकिरः अहो मग माबो वर काय करताय, ते पानाच्या ठेल्यावर मिळतं!
आनंदयात्री,मृद् गंधा : धन्यवाद!
अमोल केळकर,मुक्ता,विशाल : आभार!
आवडली कविता
आवडली कविता
मस्त... आवडली !
मस्त... आवडली !
धन्यवाद!
धन्यवाद!
आणि निसटलेली पानं