माझी आउट्सोर्स करता येण्यासारखी कामं

Submitted by shrikkk on 5 November, 2009 - 09:13

घटना-१

लहानपणी (१ ली पर्यत) रात्री सु सु ला जायचे असेल तर मोठ्या कुणाला तरी सांगुन जायचे असा दंडकच
होता.
त्या वेळी पप्पा गमतीने म्हणत - "जरा माझी पण करून ये .....मला उठायचा कंटाळा आलाय रे..."

घटना-२
बीस साल बाद......नोकरीला लागल्यावर .............

माझा बॉस लंच ब्रेक मधे मला म्हणाला....."यार ये खाना क्यु खाना पडता है?"
त्या दिवशी तो खूप बिझी होता आणि जेवायला पण वेळ नव्हता बिचार्‍याकडे.............
कुणी तरी त्याला जेवण करून (बनवून नाही हं....) दिलं असतं तर ? ....

मला स्वतःला सुद्घा देवपुजेचा आणि व्यायामाचा भारी कंटाळा ............
सोचता हुं कोइ और ये काम करके दे दे......

तुमच्या कडे आहे का अशी Wishlist......?

नसेल तर तयार करुया....न जाणे उद्या काही शोध / चमत्कार झाला तर ....किंवा एखादा जिनी भेटला तर .... यादी तयार असलेली बरी?

नाही का ?

नम्र विनंती -

आणि हो...हा धागा आउट्सोर्स / ऑफशोर्.....किंवा INDIA / AMERICA वैगेरे या विषया कडे वळू नका देउ....प्लीज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खोड्या करायला माझी तशी काही हरकत नसते (अगदी ईनामेईतबारे)..... पण नंतर धपाटे खाण्यासाठी (म्हणजे निस्तरण्यासाठी) टेन्डर नोटीस कधीच काढ्लीय, ....सध्या तरी दोन्ही विभागाचे काम आम्हीच सांभाळतोय......

माझ्या बहिणीने खुप टामटूम करून जिम जॉईन केला. व्यवस्थित वर्षभराचे पैसे वगैरे भरले. काही दिवस नियमित गेलीही. मग अळंटळं चालू झालं.... आणि मग बंदच झालं. जे बहुतेकांचं होतं तेच!

पण मग कोणी खोचून विचारलं तर न डगमगता सांगायची की जिम मध्ये जायला बाई ठेवली आहे.......

मला ऑफिस मधे काम नाहीच आहे....... Happy
त्या मुळे माझा टाइमपास चे आउट सोर्सिंग कराय्चे आहे................

केस विंचरायचा कंटाळा येतो, आधी आई न कंटाळता विंचरून द्यायची, न खेचताण करता......., जर्रा खेचले गेले तर तिच्यावर डाफरता ही यायचे....आता मात्र Sad

स्वयंपाकाची खूप आवड आहे, पण खाऊन झाल्यावर मागचे आवरायचा जाम कंटाळा कम आळस आहे..... मात्र हे काम मी हक्काच्या माणसाकडं आउट्सोर्स करते Proud

केस विंचरायचा कंटाळा येतो, आधी आई न कंटाळता विंचरून द्यायची, न खेचताण करता......., जर्रा खेचले गेले तर तिच्यावर डाफरता ही यायचे....आता मात्र>>>>>>>>>>>>> हे काम प्रेमळ नवरा ही करुन देईल.......... दुसरे काम........????????? ते ही तोच करुन देइल की नाही सांगता येनार नाही........... Happy

BEFIKEER >>> माझ्या क्रमशःचि काळजी घ्या रे कुणीतरी >>>>हे होणे शक्य नाही........जेणो काम तेणो थाय अस म्हणतात ते उगाच नाही......तुमच्या सारख लिहीण सगळ्यान्ना जमणार नाही देवा!!!

शनि व रवि.. दुपारी निवांत जेवायला बसल्यावर मुलींना शी होते तेव्हा हे काम आउटसोर्स करावस वाटत. ( आणि नवरा खुशाल त्याच त्याच बातम्या बघत असतो आणि त्याहुन कहर म्हणजे दोघींनाहि होते)

पहाटे उठुन मॉर्नींग वॉकला मला पळत जायच आहे ... >>> तुमच्यात मॉर्नीगवॉकला पहाटे पळात जातात Uhoh आम्ही वॉकत ( चालत ) जातो.. आणि पळणार असु तर त्याला जॉगींग म्हणतो Light 1