राजगड-तोरणा

Submitted by डेविल on 23 May, 2011 - 06:59

माझे हे मायबोलीवरील प्रथमच लिखाण आहे, सांभाळून घ्यावे. लिखाणाचा वेग नसल्याने एवढे टंकायला मला ४ दिवस लागले.
ह्या लिखाणावर कदाचित दुसऱ्या माबोकारांचा प्रभाव जाणवेल. कोणाचे शब्द उचलेगिरी केले असल्यास माफ करा.
हा ट्रेक मी आणी माझ्या मित्राने २४-२५-२६ जानेवारी २००९ ला केला होता.

मागच्या वेळी राहून गेलेला राजगड - तोरणा ट्रेक यावेळी पूर्ण करायचा या इराद्याने भिडू जमवू लागलो. मागच्या वेळेच्या सर्व सोबत्यांना विचारून झाले होते, १ खोप्या( श्वेताल खोपकर) सोडला तर बाकी प्रत्येकाचे काही ना काही काम होते, त्यामुळे शेवटी मोजणी दोघांवरच संपली. Show Must Go On च्या धर्तीवर दोघेच जाऊ असे ठरले.

जायच्या आदल्या दिवशी खोप्याच्या डोक्यात किडा वळवळला कि आपण night ट्रेक करुया. मला पण काही हरकत नव्हती , त्यामुळे राजगड रात्री चढायचे नक्की केले. खोप्याच्या मते आम्ही ट्रेन ने पुण्याला जावून तिथून स्वारगेटहून सुटणारी स्वारगेट - वेल्हे बस पकडूया, पण मला ट्रेन - PMT - बस - जीप प्रवासाचा कंटाळा वाटला. माझ्या मते मुंबई सातारा बस ने नसरापूर फाट्याला उतरून तिथून जीप घ्यावी. शेवटी खोप्याच्या डोक्यात मी माझी कल्पना उतरवण्यात यशस्वी झालो.

२४ ला दुपारपर्यंत दादर मध्ये उंडगलो. दुपारी ४ ची बस पकडली, साधारण ७:30 च्या दरम्यान नसरापूर ला पोहोचू असा अंदाज होता. पण मुंबई च्या ट्राफिक मधून बाहेर पडायला ६:३० झाले , जरा मोकळा श्वास घेतो तो परत पनवेलला परत चक्का-जाम . गाडी मेगा हायवे लागेपर्यंत ८:३० झालेले. वाटले आज काही रात्री ट्रेक चालू करता येणार नाही. नसरापुरला पोहोचे पर्यंत ११:३० झाले होते. एखादी तरी जीप असावी अशी प्रार्थना मी करत होतो पण आशा फोल ठरली. एकही वाहन नव्हते तिथे.

महाराजांचे नाव घेऊन आणि खोप्या च्या शिव्या ऐकत चालायला सुरवात केली. जिथपर्यंत जाऊ शकू तिथपर्यंत जाऊया आणि काही आसरा मिळाला तर मुक्काम करुया असे ठरले. १० मिनिटे चाललो नवतो तोवर मागून बाईक चा आवाज येवू लागला. त्याच्या कडे आम्ही लिफ्ट मागितली. हा पुण्याचा ग्रुप होता जो तोरणाला चालला होता. मग काय ट्रिपल सीट बसून प्रवास चालू केला. त्यांनी आम्हाला मार्गासनीला(?) सोडले. तिथे १ ओमनी वाल्याला गुंजवणेला सोडायला तयार केले (यासाठी २०० रु घेतले त्याने) . १२:३० ला गुंजवणेला पोहचलो. पोहोचल्या बरोबर तेथील दृश्य बघून सुखद धक्का बसला. पायथ्याला शिवप्रतिस्थान (मला नक्की नाव आठवत नाही आहे) आणि गाववाल्यांच्या मदतीने प्रत्येकाची तपासणी चालू होती. सिगारेट आणि दारू जप्त करत होते. इमानदारी मध्ये विचारल्या बरोबर जे काढून देत होते त्यांना सोडत होते. पण दारूवाल्यांना उठाबश्या काढायची शिक्श्या होती, आणि जे नाही बोलून ज्यांच्याकडे सापडली त्यांची धुलाई होत होती.

आमची तपासणी झाली व गडावर जायचा मार्ग मोकळा झाला. अंधारामध्ये चढायला सुरवात केली. थंडीचे दिवस आणि रात्र यामुळे थकवा फारसा जाणवला नाही. गप्पा मारत, एकमेकांची टर उडवत २:४५ ला चोर दरवाज्यामधून गडावर प्रवेश केला. पद्मावती माचीवर जाऊन बघितले तर तिथे जत्रा होती. सगळ्या जागा फुल झाल्या होत्या. मंदिर आतून बंद होते, बाहेरील मोकळ्या जागेवर तंबू ठोकले होते. एकही जागा शिल्लक नव्हती. दारूकोठाराची जागा भरली होती.

शेवटी सदरेच्या बाजूच्या मोकळ्या जागेवर मुक्काम ठोकला. झोप तर येत नवती मग असाच वेळ काढत होतो, जानेवारी महिना असल्याने थंडी खूप होती. शेकोटीसाठी काही मिळते काय ते शोधायला लागलो. थोडे गवत, वाळक्या काट्या, १ छोटा ओंडका मिळाला, पण जो पेटवता पेटवता आमच्याकडील अर्धे रॉकेल संपले. ४ वाजेपर्यंत ओंडक्याशी झगडलो. शेवटी त्याचा नाद सोडून झोपायची तयारी चालू केली, दुसर्या दिवशी बराच मोठा पल्ला गाठायचा होता. बोचके उपसले तर माझ्या लक्ष्यात आले के पांघरायची चादर विसरलो आहे. आता बोंबला! एवढ्या थंडीत काय करायचे. खोप्या ने मनातल्यामनात मला नक्कीच शिव्या देऊन बोलला असेल काय YZ आहे हा. खोप्याला थोडा मस्का लावून त्याच्या चादरी मध्येच घुसलो. पण थंडी काही झोपायला देत नव्हती. कसाबसा १/१.५ तास झोप झाली असेल, सकाळच्या दवाने मात्र पूर्ण वाट लावली. शेवटी सकाळी ६ च्या आसपास झोपायचा नाद सोडून सूर्योदयाची वाट बघू लागलो.
DSCF6922.jpgDSCF6929.jpgDSCF6935.jpg

शहरातील सूर्योदय आणि गडावरील सूर्योदय यातील फरक शब्दामध्ये सांगण्याची माझी पात्रता नाही आहे. पण हा अनुभव मला खूप आवडतो. एकटक त्या आकाशामध्ये त्या राजाला विराजमान होताना बघणे हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. खोप्या सूर्योदयाचे फोटो काढण्यामध्ये मग्न होता, मीपण जरा फोटोग्राफी करून घेतली. सर्व आवरून बोचके बांधले. आणि संजीवनीमाची कडे प्रयाण केले. मागील वेळी राजगड - तोरणा बेत हुकल्याने मस्त ३ दिवस राजगडवर भटकलो होतो. आताही माझा कमीत कमी बालेकिल्ला तरी बघू हा बेत खोप्या ने हाणून पडला आणि आम्ही ८:३० ला तोरण्याला वाटचाल चालू केली.

DSCF6945.jpgDSCF6950.jpgDSCF6952.jpg
तोरणा (राजगड वरुन)
DSCF6952.jpgDSCF6960.jpgDSCF6966.jpgDSCF6970.jpgDSCF6987.jpg

अंदाजानुसार ३० मिनिटे अळू दरवाजा - ५ तास मधल्या टेकड्या ते बुधला माची - १ तास बुधला माची ते मेंगाई देवी मंदिर. प्लान तर मस्त तयार होता, पण ट्रेक मध्ये कधीही एवढा वेळेबरोबर प्लान चालत नाही. आणी खासकरून जर किल्ले राजगड असेल तर. फोटो काढत, बुरुजावरून देखावा बघत आमची वाटचाल चालू होती. दुहेरी तटबंदीमधील जागेमध्ये उतरत होतो. हो - नाही करत १०:३० च्या आसपास अळू दरवाज्यामधून बाहेर पडलो. रस्ता तर स्पष्ट दिसत होता, फक्त तो कसा पार करायचा ते आमच्यावर होते.

DSCF6974.jpgDSCF6975.jpgDSCF6990.jpg

सुरवातीचा रस्ता थोडासा उतरणीचा होता, तिथे काही विशेष त्रास नव्हता. फक्त एके ठिकाणी जरा घसरण जास्त होती. ४५ ते ५५ मिनिटामध्ये आम्ही डांबरी रस्तावर उतरलो, हीच पाली खिंड. एका बाजूला पाली गाव व दुसर्या बाजूस भुतोंडे गाव आहे. इथे पहिला छोटा ब्रेक घेतला. इथून एक सरळ पायवाट जात होती. पहिल्यांदा सरळ पायवाटेने पुढे गेलो पण नंतर थोडे चालल्यावर लक्षात आले कि वाट बरोबर नाही आहे. परत मागे फिरलो आणी खिंडीमध्ये परत आलो. निरखून बघितल्यावर थोड्या पुढच्या बाजूला एका छोट्या पायवाटेच्या इथे तोरणा चा बाण होता. हाच रस्ता मग आम्ही घेतला.

DSCF6995.jpgDSCF6997.jpgDSCF6998.jpg

किती अंतर चाललो होतो ते माहिती नाही. थोड्याच वेळात एक घर लागले. आवाज देऊन, डोकावून बघितले तर तिथे कुणीच नव्हते. थोडे अंतर पुढे गेल्यावर एक मावशी भेटल्या त्यांना पाणी कुठे जवळपास आहे का ते विचारले. अरे एक छोटा किस्सा सांगायचा राहून गेला. खोप्या महाशयांनी जी झोळी आणली होती तिचे बंद खूप बारीक होते, त्यामुळे पाठीला खूप त्रास होत होता. शेवटी त्याच्याकडे १ टोप, २ ताट, चमचे, खिचडीचे सामान, १ लिटर पाणी एवदाच बोझा होता. आम्ही माझ्याकडे फक्त ७ लिटर पाणीच होते. स्वतःचे बाकीचे सामान स्वतःकडेच होते. तर मावशी बोलल्या कि थोडे पुढे गेले तर विहीर आहे. पण आम्ही ती विहीर शोधायच्या भानगडीमध्ये पडलो नाही. गाववाल्यांचे ५ मिनिटाचे अंतर म्हणजे आपले कमीत कमी २० मिनिटाचे असते हा अनुभव अगोदर खूप वेळा घेतला होता.

आमची पायपीट चालूच होती. एक ठिकाणी थोडीशी सावली बघून जेवणाचा बेत केला. लगेच बांधून आणलेले ठेपले, भाजी-चपाती, बाहेर काढली आणी तुटून पडलो.सकाळी काहीही खाल्ले नव्हते आणि परत एवढी पायपीट, खाणे जरा जास्तच झाले. सर्व आवरून पुढे निघायची तयारी केली तर खोप्या बोलला कि त्याला थोडा आराम करायचा आहे. रात्री झोप झाली नव्हती आणी पुढची वाटचाल लक्षात घेता मी पण जास्त ताणले नाही. साहेब २ मिनिटाच्या आत घोरायलापण लागले आणी माझ्या झोपेची वाट लावली. चांगला ३०-४० मिनिटांचा ब्रेक झाला होता खोप्याला उठवले आणी पुढे चालायला सुरवात केली.

DSCF6999.jpg

राजगड वरून निघून आता आम्हाला ४ तास झाले होते तरीही बरेच अंतर बाकी होते. मध्येच एक ठकाणी एक ताकवाला पोरगा भेटला त्याला विचारले जवळपास पाणी कुठे मिळेल कारण आता फक्त ३ लिटर पाणी शिल्लक होते. तो बोलला कि जवळच एक घर आहे ठीथे मिळेल पाणी. आम्ही लगेचच त्या घराकडे निघालो. तिथे गेल्यावर तिथल्या आजीनी ताक आणि पाणी दिले. त्यांना सहज विचारले कि तुम्ही पाणी कुठून भरता? त्या बोलल्या कि टेकडी उतरून खाली जावे लागते तिथून भारतात पाणी. पुदाचा रस्ता नीट विचारून घेतला आणि किती पैसे झाले ते विचारले? त्या बोलल्या तुम्हाला जसे बरे वाटेल तसे द्या. शेवटी त्यांना ५०रु.( ४ ताक आणी ३लिटर पाणी ) देऊन पुढे निघालो. शेवटच्या टप्प्यात सावली बिलकुल नाही. त्यामुळे लवकरात लवकर बुरुजाच्या सावलीत जायचा विचार होता. या टप्प्यामध्ये एक ठिकाणी खोप्या थोडा घसरला पण काही दुखापत नाही झाली. थोडा चढ चढायचा कंटाळा म्हणून दरीच्या बाजूने जाणारी वाट घेतली होती . माती जास्त भुसभुशीत असल्याने पाय घसरला.

DSCF7000.jpgDSCF7002.jpgDSCF7014.jpgDSCF7019.jpg

थोड्याच वेळात बुधला माचीच्या बुरुजाखाली आलो. इथे परत १ मोठा ब्रेक घेतला कारण वरती चढताना एक rock patch पार करायचा होता. फ्रेश होऊन वरती निघालो. तिथे एक ग्रुप अगोदरच वरती जायचा प्रयन्त करत होता. त्यांच्या मधील काहीना तो patch करायला त्रास होत होता, कारण थोडे जरी घसरले तर मागे दरी होती.(आता या ठिकाणी शिडी लावली आहे असे वाटते यो चे फोटू बघून) खोप्याने कासरा(जनावरांना बांधन्यासाठी वापरायचा दोर) आणला होता तोच मग वरती बांधला. दोराच्या आधाराने ट्राफिक मोकळी होऊ लागली. माझ्यातले किडे गप्प बसायला तयार नव्हते म्हणून दोराचा आधार ना घेता वरती चढलो. सर्व वरती आल्यावर दोर गुंडाळून मेंगाई देवीच्या मंदिराकडे चालू लागलो.

DSCF7023.jpgDSCF7026.jpgDSCF7025.jpg

मंदिराकडे जाताना ३ जणांचा ग्रुप भेटला त्यांनी वाटेतील rockpatch चुकवून पुढे जायचा रस्ता सांगितला. वाटेत लागणाऱ्या ३ टाकी पासून उजवीकडे वळून जायचे. हि वाट तटबंदीवरून दरीच्या कडेने जाणारी वाट होती. आमच्या पुढे २५ जणांचा ग्रुप गेला होतास, त्यामुळे ट्राफिक ने वाया जाणारा वेळ वाचावलन्यासाठी आम्ही तटबंदीवरून निघालो.

DSCF7029.jpgDSCF7036.jpgDSCF7045.jpg

संध्याकाळ झाल्याने वारा जोरदार होता. आणि कडेला वाढलेल्या झाडीमुळे सावकाश सांभाळून जावे लागत होते. लवकरच कोंकण दरवाजा पार करून मंदिराच्या अंगणात आलो.
घड्याळ बघितले तर आम्हाला राजगड वरून निघून आता ७ तास झाले होते. आणी अगोदर काय वेळापत्रक आंम्ही मांडले होते. पटापट फ्रेश होऊन सूर्यास्त बघायला गेलो. जाताना नवीन सेल टाकायचे विसरल्याने आणी परत मंदिरात जाऊन आणण्याचे कंटाळा आल्याने सूर्यास्ताचे फोटो काढता आले नाही.

DSCF7061.jpg

सूर्यास्तानंतर पेट्पुजेची तयारी चालू केली. सर्वप्रथम सूप बनवण्यास घेतले. रेडीटूइट सूप ढोसल्यावर खिचडीची तयारी चालू झाली. जेवण बनवायच्या फांद्यात मी कधी पडत नाही. हे पूर्णपणे खोप्याचे खाते आहे. त्याने मस्तपैकी राजगड स्पेशल खिचडी(मागच्या राजगड फेरीच्या वेळी आम्ही दिलेले नाव) बनवायला घेतली. नेहमीसारखीच खोप्याने खूप चांगली खिचडी बनवली. (हा त्याचा चांगला गुण त्याला खूप त्रास देतो, कारण जेव्हा पण आम्ही सर्व टाळकी त्याच्या घरी जमतो तेव्हा तेव्हा त्याला खिचडी बनवावी लागते) जेवण करून, आवरून दुसऱ्या कोल्हापूरच्या ग्रुप बरोबर गप्पा मारत बसलो. मधेच तोरण्याच्या भुताचा पण विषय निघाला पण त्याकडे कोणीच जास्त लक्ष दिले नाही. ११ वाजता झोपायला परत मंदिरा मध्ये गेलो. दिवसभरच्या थकव्याने झोप लवकरच लागली.
DSCF7070.jpgDSCF7071.jpgDSCF7075.jpgDSCF7076.jpg

सकाळी लवकर जाग आली आणी सूर्योदय बघायला धाव घेतली. बर्यापैकी उजाडल्यावर बघितले तर बाजूच्या मोकळ्या जागेत २६ जानेवारीचा झेंडावंदनाचा कार्यक्रम होणार होता. आम्हीपण आवरून झेंडावंदनाला गेलो. हातात एवढा वेळ नव्हता कि झुंजार माचीवरजाऊन परत येता येईल. त्यामुळे झुंजारमाचीचे दुरूनच दर्शन घेऊन गड उतरायला सुरवात केली. (पुढच्यावेळी तोरण्याला यायला निमित्त आहे ना झुंजारमाचीचे तसेच तोरणा पण बघायचा आहे).

DSCF7080.jpgDSCF7084.jpgDSCF7090.jpgDSCF7100.jpgDSCF7091.jpgDSCF7095.jpg

उतरताना ठिकठिकाणी रेलिंग लावले आहेत त्यामुळे एवढे थरारक वाटत नाही पण दरी असतेच समोर. २/२.३० तासात खालच्या पठारावर आलो तिथून तर सोपा रस्ता आहे.
DSCF7104.jpgDSCF7118.jpgDSCF7131.jpgDSCF7134.jpg

गावात आल्यावर एक विहीवर फ्रेश झालो आणी काळीपिवळी पकडून नसरापूर फाट्याला आलो. एकही ST बस थांबायला मागत नव्हती. शेवटी कर्नाटक मंडळाची बस थांबली आणी त्यातून परतीचा प्रवास चालू केला.
DSCF7173.jpgDSCF7176.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

...

एकदम मस्त लिखाण आणि फोटोही मस्त. माबोवर स्वागत. तोरण्यावरच्या झेंडावंदनाचे फोटो शेअर केल्याबद्दल धन्यवाद. आणखी लेख नि भरपूर फोटो येउद्यात...!! आणखी एक भटक्या मिळाला.... व्व्व्वा!!!

आणखी एक भटक्या...
अगदी अगदी माझ्या मनात तोच विचार आला...
शेवटून दुसरा फोटो तर लईच खास रे गड्या...
वर्णन आणि प्रचि पण छान

हिम्सकूल- अजून काही फोटो आहेत, ते पन टाकतो.
आशुचँप- तुमच्यापेक्षा कमीच भटकलो आहे. हा फोटो काढण्यासाठी मित्राने मदत केली.
दिनेशदा - हो ते तर आहेच, मागे यो बरोबर तोरणा ते राजगड करायचा होता पण नाही जमले. बाकी भटकंतीचे अनुभव इथे मांडण्यासाठी लेखनाचा वेग वाढवण्याचा प्रयन्त करतो आहे.

इंद्रा - आपला वज्रगड-पुरंदर-सिहगड ट्रेक खूप धमाल होता त्यातील आठवणी मस्त आहेत. मायबोलीची पहिल्यांदा ओळख करून दिल्याबद्दल आभारी आहे.
धन्यवाद जिप्सी

डेविल... मायबोलीवर स्वागत...
सुरुवातच राजगडाने केलीस मित्रा.. सुंदर एकदम.. Happy

आणखी एक भटक्या मिळाला.... व्व्व्वा!!! >> अगदी Happy

डेविल.. मस्तच लिहीले आहेस.. फोटोही छान.. भेट होईलच कधी ना कधी तरी कुठल्या तरी ट्रेकमध्ये Happy

धन्यवाद भटक्या Happy
भेट होईलच कधी ना कधी तरी कुठल्या तरी ट्रेकमध्ये >>> कदाचित ट्रेक-मेटस च्या कोणत्यातरी इवेन्ट मध्ये भेटलोपण असू. परत एकदा भेटू. Wink

डेविल - सुरेख लेख - राजगडाच्या आठवणी जाग्या झ्याल्या..
आणी तुझ्या मित्राचे नावपण सुरेख (खोप्या) सुगरण दिसतोय Happy

डेविल.. छान लिहीले आहेस.. फोटोही छान..भेट होईलच कुठल्या तरी ट्रेकमध्ये_______
आम्हि ह्हा ट्रेक २००९, ३१-१० ते १-११ ला केला होता. तोरणा देउल ते राजगड देऊल ६.३० तासात केले होते. मधेच एका bull ने आमची वाट रोखुन धरल्या मुले वेल फुकत गेला. ३०० फोटो व छान माहिति हि आहे देइन केव्हातरी. आठवणी ताज्या झाल्या.

डेविल... नक्कीच नाही... Happy कारण मी ट्रेक-मेटस काय कुठल्याच संस्थेमधून ट्रेकला जात नाही... Happy

पण मायबोली ट्रेकमध्ये भेटायला आवडेल...

ईनमीन तीन - त्याचे नाव खरे तर श्वेताल खोपकर आहे. पण आम्ही त्याला खोप्या किंवा खवड्या नावानेच बोलावतो. आईने चांगलेच शिकवले आहे, उपाशीतरी मारणार नाही कुठेही. Proud
आनंदयात्री - आपल्या बरोबर भटकायला यायला आवडेल.
भटक्या - अरे मी तुला नाही योबद्दल ला बोलत होतो आणि मला पण मायबोली ट्रेकला यायचे आहे. Happy