बोगनवेल

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

बोगनवेल काय, सगळ्यानाच माहीत आहे. हो ना ? पण या नावापासुनच मजा आहे. या बोगनवेल या शब्दाचा मागोवा घेतला तर तो चक्क अपभ्रंश आहे हे कळेल. Bougainvillea buttiana हा मूळ शब्द. याचा संदर्भ अर्थातच विदेशी शास्त्रज्ञाच्या नावाशी. तसे हे वाण मूळात ब्राझिल वा पेरू देशातले. आपल्याकडे कधी आले ते सांगता येणार नाही. पण इथे ते चांगलेच रुजलेय एवढे मात्र नक्कि. पाऊस मिळाला तर हिरवे राहील नाहीतर पाने गाळुन बसेल. गुजराथमधील काहि ठिकाणी, जिथे ताजी फुले मिळणे दुरापास्त असते, तिथे बोगनवेलीच्या फुलांचा सहज वापर केला जातो.
मी फुले म्हणतोय खरे, पण खरे तर हि पानेच. ( काहि पानांचीच फुले होतात. नाही हो, ही कविकल्पना नाही, तर शास्त्रीय सत्य आहे. ) पण या झाडाला हे शहाणपण जरा उशीरा सुचले असावे. नीट निरखुन या झाडाच्या पुष्पगुच्छाकडे बघितले असेल तर या तीन पानांच्या कोंदणात साधीशी पांढरी फुले सहज दिसली असतील. आता या फुलाना ना गंध ना मधाची देणगी. रुपही नाही, मग पानानी कंबर कसली आणि रंगात रंगुन घेतले.

रंग कुठले तर ईन, मीन, तीन. गड्द गुलाबी, पांढरा आणि पिवळा. पण या तीन रंगातूनच अफलातून कलाकृती निर्माण होते. हे तिनही रंग एकत्र दिसतात. गोव्यातल्या कला अकादमीच्या कँटीन जवळ आहे, हे झाड.

.kala_a.jpg

यात काही छोटेखानी प्रकारही दिसतात. बोनझाई प्रकारातही हे झाड दिसते.
पण याची जागा मात्र कुंपणापाशीच. अंगच्या काट्यामुळे, चांगले शोभिवंत कुंपण तयार होते. एकदा जोम धरला कि फारश्या देखभालीची गरज नसते. काटछाट केली तर आकारही आटोक्यात राहतो. पण जर दुर्लक्ष केले तर जवळच्या झाडाचा आधार घेत हे झाड त्या झाडाच्याही वर पोहोचते. ( कधी कधी आंब्याचे झाड याच्या भक्ष्यस्थानी पडते आणि राणी रंगाची फुले आलेले आंब्याचे झाड दिसू लागते. )
अबोलीप्रमाणेच या फुलांच्या " पाकळ्यात " पाण्याचे प्रमाण खुपच कमी असते, त्यामूळे सुकल्यावरही रंग टिकुन राह्तो.

gulabi.jpg

त्यामुळे झुडुपाखाली हा सडा असतोच. या झाडाला फळे वगैरे आलेली दिसत नाहीत, सहाजिकच नैसर्गिकरित्या याचे पुनरुत्पादन होत नाही. याची लागवडच करावी लागते. पण एखादी जाडसर फांदी खोचली तर सहज रुजते. याच कारणाने जंगलात हे झुडुप दिसत नाही.
आपल्याकडेच काय पण मूळ स्थानीही याचे अन्य काही उपयोग असल्याचे वाचण्यात आले नाही, बहुतेक नसावेत.
पण ग्रेनेडा, गुआम सारख्या देशांचा तो राष्ट्रीय वृक्ष आहे

pivaLi.jpg

हा खास डॉ. नलिनीने पाठवलेला रोम मधल्या बोगनवेलीचा फोटो.

rome.jpg

विषय: 
प्रकार: 

मी लहानपणी या फुलांना; कारण माहीत नाही पण राणीची फुलं म्हण्त असल्याचे आठवतं! कदाचित राणी कलरचे म्हणून असावं ते Happy
नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा!

हे एकच झाड /वेल रंग भरतांना भर उन्हात गेल्यावर गुलमोहरासोबत दिसले.

मी सिडनीत आल्याआल्या पहिल्याप्रथम बघितलेलं हे ओळखीचं झाड
नवरा सोडल्यास कुणीच ओळखीचं न दिसलेल्या पहिल्या चार दिवसांत हे गडद 'राणी' कलरच्या फुलांनी लवलवतं झाड दिसलं...... कुणीतरी आपल्या मातीच्या ओळखीचं भेटल्यासारखच वाटलं.
अय्या बोगनवेल!
फोटो मस्तच.

झाडांच्या बाबतीत , हे इथे कसं, असा आश्चर्याचा धक्का खुपवेळा बसतो. आणि तो खुपच सुखद असतो.
परवा मुंबईच्या हुतात्मा चौकात एक फुलावर आलेले बकुळीचे झाड बघितले. (सेंट्रल बँकेच्या समोर, हायकोर्टाच्या गल्लीच्या बाजूला ).
या भागात या बकुळाबाई असतील, याची कल्पनाच नव्हती. इतक्या वेळा तिथुन येणे जाणे होते, परवा पायाखाली ताजे फुल दिसले म्हणुन नजर वर गेली, तेव्हाच दिसले.