तर....

Submitted by UlhasBhide on 15 May, 2011 - 14:19

तर....

का, कसं ..… कुणास ठाऊक ?
आज आठवणींचं पाखरू
वळचणीतून मोकळ्यावर आलं….
आठवली….
ती नजरानजर,
चोरट्या कटाक्षातले ते भाव….
आठवल्या,
कधी सहज घडलेल्या भेटी
तर कधी, जुळवून आणलेले
भेटींचे योगायोग…..
कधी चुकून झालेला ओझरता स्पर्श….
अजुनही अंगावर शहारा आणणारा…..
"आपकी नजरोंने समझा प्यारके काबिल मुझे...."
..... संमेलनात तू गात असताना
मला मित्रानं मारलेली कोपरखळी,
तुझ्या नजरेने मिश्किलपणे हळूच टिपलेली….
सारं जाणून देखील,
तसेच राहिलो गं ….
अव्यक्त ....
मनातलं गूज
नाही आलं ओठावर
कंठातच शब्द थिजले, अवघडले
हृदयातच रुतून राहिले…..
………….
….आजच्यासारखी शब्दांची साथ
त्यावेळी मिळाली असती तर……
तर........
.... तर आज ही कविता जन्मलीच नसती.

.... उल्हास भिडे (१५-५-२०११)

गुलमोहर: 

अन आठवल्या......
कोर्‍या पाकिटातून सांडलेल्या त्या मोगर्‍याच्या पाकळ्या....! Wink
काकानु, जाने-अनजाने कुछ पुराने जख्मोपें हाथ धर दिया आपने ! Proud

आशय आवडला. उल्हासराव, शहारा या शब्दाबद्दल आपले काय मत आहे? माझ्यामते शहारा व रोमांच यात फरक आहे बहुधा! रोमांच हा आनंदाने तर शहारा भीतीने येतो.

सर्वांना धन्यवाद.
-----------------------------------------
बेफिकीरजी,
मी वि.पू. मध्ये त्याबद्दल स्पष्ट करेन.

उल्हासदा जुन्या आठवणीत बरेच रमायला लागलात.
मस्त प्रकटीकरण. आज आशय खूप आवडल्यामुळे छंदाकडे लक्ष गेलं नाही.