इतिहास बदलण्यासाठी आधी स्वतः इतिहास घडवावा लागतो

Submitted by sancheet on 29 March, 2011 - 03:02

पुण्यात दादोजींवर जो काही अन्याय मराठी माणसाने केलाय त्यावर जितक बोलावं/लिहावं तितक कमीचय.
ज्या शिवबामुळे आपण आज अभिमानाने या मातीत राहू शकतो, ज्या शिवबा ने महाराष्ट्रातच नाही तर आक्ख्या हिंदुस्थानात असलेल्या हिंदूंची आणि त्यातल्या १८ पगड जातींची आपल्या जीवाशी खेळून रक्षा केली,आपल्याला हक्काचा राज्य मिळावं, आपला स्वतःचा असा एक स्वराज्य असावं असा उदात्त हेतू घेऊन कशाचीही परवा न करता ज्याने अक्खा सह्याद्री काबीज केला आणि आपल्याला हे राज्य दिलं..... त्याच शिवबा चा अपमान त्याच्याच मातीत व्हावा?
शिवबाला ज्यांनी घडवला त्यात दादोजींचा स्थान आढळ आहे हे आपल्या सगळ्यांना मान्य आहेच.....तसाच कॉंग्रेस वाल्यांनाही आहे (शिकले असाल तर अठवा इतिहासात हेच लिहिलंय आणि तेच खरय)
मग आता हा वाद का उठावा? जी गोष्ट आढळ आहे जी गोष्ट म्हणजे आपला मराठी माणसाची अस्मिता आहे त्या गोष्टीवर एकमताने विरोध व्हायला हवा होता ती गोष्ट इथे एक मताने मान्य झाली.......ज्यांना स्वतःला हाय कमांड शिवाय दुसरा गुरु नाही ते लोक शिवबा आणि त्याच्या गुरु बद्दल दुसरा काय विचार करू शकतील?
पुणे.....हेच का ते पुणे जिथे संस्कृती टिकून आहे असे ढीन्डोरे पिटवले जातात?तुम्ही संकृती तर सोडाच स्वतःचा इतिहास शोधू शकला नाहीत आणि शोधला तरीही तो टिकाऊ शकला नाहीत.....
मराठी माणसाने आपापसातच लढावे आणि मारावे या गोष्टीवर शिक्का मोर्तब झालंय या कृत्याने.
आपणच आपल्या घराची अब्रू वेशीवर टांगावी तशी सगळ्या महापालिका सदस्यांनी पालिकेची आणि पुण्याची आणि अर्थातच महाराष्ट्राची अब्रू वेशीवर टांगली. ज्या मातीने तुम्हाला जन्म दिला, जिथे तुम्ही मोठे झालात,ज्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवलात त्याच शिवबाच्या पुतळ्याची विटंबना झाली म्हणून प्रसंगी जीव ओवाळायला तयार होतात त्याच शिवबाच्या गुरु वर आरोप केला कोणी.... आपणच ना? आणि तो आरोप सिद्ध पण आपणच केला....ज्यांच्यामुळे आपल्याला हात मिळालेत त्यांच्या विरुद्ध कट रचून त्याची अंमल बाजावनिहि त्याच हातांनी केली....आज शिवाबच काय पण प्रत्येक मराठी माणूस जो अजूनही मनातून मावळा आहे तो धाय मोकलून रडला असेल......
मराठीच्या नावाने जे मराठे इथे निवडून येण्यासाठी नाचतात, त्यांना हे पातक करताना लाज सुद्धा वाटू नये....होय हे पातक आहे....हे पुण्य कर्म असतं तर दिवसा लक्ख उजेडात झालं असत.
ज्या माणसाने शत्रूला कसं तलवारीने कापावं हे मावळ्यांना शिकवलं त्यांच्या पुतळ्यालाच कापून काढलं गेल.आणि ते पण पोलिसांच्या मदतीने....हे म्हणजे आजच्या मावळ्यांनी आमच्याच पितरांच्या गुरूंना कापून काढावा असं झाल. राजकारण आणि राजकारणी दोघेही किती गालीच्च्छ आहेत याची प्रचीती दिलीत तुम्ही.
कोण कुठला तो जेम्स लेन, त्याने पुस्तकात काही लिहिलं म्हणून आपण त्याच्या पुस्तकावर बंदी आणली...तो तर बाहेरचाच तो लिहिणारच त्याला तसा लिहिताना काहीच वाटणार नाही....पण हेच आपण एखाद्या पुस्तकात त्यांच्या बाबतीत लिहिलं तर ते मानतील? कधीच नाही.....गानिमाने तर आपली नितीमत्ता विकलेलीच आहे पण हे पातक करताना आमची नितीमत्ता कुठे गेली होती?शेण खायला? आणि अशा माणसांवर का बंदी नाही घातली जात मग? यांना राजकारणच काय या मातीत राहण्याचाही अधिकार नसावा.
शेण सुद्धा पवित्र्य आहे आपल्याला ते हि खायची खरं तर ज्यांची लायकी नाही अशा नेत्यांनी एकमताने हे मान्य केलं आणि आमच्या अस्मितेचाच मुडदा पाडला.
कॉंग्रेस या पक्षालाच मुळात पहिल्यापासून मराठी माणूस आणि त्याच्या निगडीत गोष्टी खुपत आल्यात.....त्यांच्या करावी गांधीन पेक्षा कोणीच मोठा नाहीये...म्हणूनच तर आम्हाला इतिहास शिकवला गेलं तो यांनी लिहिलेला, घडलेला नाही.इतिहास मिटवता येत नाही आणि तो शिकवणे अपरिहार्य असल्यामुळे त्यांनी शिवाजी राज्यांचा इतिहास तरी ठेवलाय अभ्यासक्रमात त्या बद्दल आपणच त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा सत्कार केला पाहिजे.अशीच अवस्था राहिली तर हे लोक तो इतिहास आपल्या पर्यंत येउच देणार नाहीत.आणि त्यांना तेच करायचंय.... त्यांचं पक्ष किती श्रेष्ठ आहे आणि त्यांचे लोक किती श्रेष्ठ आहेत हेच त्यांना दाखवायचंय, पण त्यांना हे कळलंय की कितीही बोंब ठोकली तरीही आपण मोठे नाही होऊ शकत, मग यावर शक्कल काय तर दुसर्यांना लहान करा....जे कशीच होऊ शकत नाही.कोणाला लहान केल्याने तसा होत नसतं कॉंग्रेस ला तसं वाटतं कारण ते स्वतःच लहान आहेत बुद्धीने आणि लायकीने.पण त्यांच्या हुशारीला मानायला हवं कलमाडींना ते पोटाशी घालतायत आणि त्यांचा विसर पडावा म्हणून नवीन काहीतरी उकळून काढतायत, या प्रकरणामुळे ते वृत्तपत्रातून गायब झालेत तसेच या प्रकार्नातूनही होतील.

राष्ट्रवादी हे नावच तुम्हाला शोभत नाही, जो पक्ष राष्ट्रवादी आहे तो राष्ट्र ज्या माणसाने घडवलं त्यांच्या विरुद्ध कस काय असे कट करू शकतो? हाच प्रश्नय आमच्या डोक्यात....तो मराठ्यांचा इतिहास आणि हा मराठ्यांचा इतिहास तिथे अभिमान होता इथे आहे तो फ़क़्त अपमान, स्वतः मोठा होण्यासाठी प्रसंगी आपली अब्रूही विकायला कमी करणार नाहीत तुम्ही हे सिद्ध केलात...तुमच्या बद्दल बोलायला तसाही वेळ नाहीये पण पातक करताना तुम्हीही होता म्हणून बोलवा लागतंय.

आघाडी ने केवळ संभाजी ब्रिगेड चं मन सांभाळण्यासाठी आणि राजकारण करण्यासाठी असं काही करावा हि गोष्टच पचत नाही....संभाजी राज्यांनाही सहन होणार नाही हे. अरे तुम्हाला स्वतःलाच काही इतिहास नाही तुम्ही काय आमचा इतिहास बदलणार? संभाजी ब्रिगेड म्हणजे राजकारणाच्या

काही लोक जे स्वतःला मावळे मानतात किंवा म्हणवतात ते वाचवायला समोर गेले पण काय झाल,त्यांना कैदेत ठेऊन करायचं तेच केलं गेलं.....नशीब आमच बलवत्तर म्हणून आमच्याच मातीत बाळासाहेब जन्माला आलेत, ते नसते तर कदाचित आजचे सैनिक पण या कटात सामील झाले असते.आदळ आपट करून आणि हूडधूस घालून काही होत नाही.....सैनिकांनी मग ते कोणत्याही सेनेचे असोत या निर्णया विरुद्ध जो काही आवाज उठवला तो स्वागतार्ह आहे पण केलेलं नुकसान चूकच होत. खुर्च्या मोडून काही होत नसत, शेवटी काय झालं तुम्ही ना पुतळा वाचू शकलात ना तुमचं स्वतःचं कार्यालय.......आणि आता तुम्ही नैतिक जबाबदारी घेऊन पैसे देतो म्हणताय ते हि साफ चुकीचं आहे.यामुळे तुमची प्रतिमा मराठी माणसात अजून खालावतीये. मागच्या निवडणुकीत झालेला पराभव पण याच गोष्टींमुळे होता. नुकसान करणे आणि मग भरपाई देणे असं पायंडा पडला तर कोणीही उद्या काहीही करेल आणि नैतिक जबाबदारी घेऊन भरपाई देईल.....नुकसान हे निंदनीय होत आणि कायम राहील.उद्या शतृ देशाने काही केल आणि म्हणाले की आम्ही याची नैतिक जबाबदारी घेतो आणि भरपाई देतो तर आपण ते मान्य करू का?

दादोजीन्बद्दल कोणी काहीही लिहील आणि कोणी कितीही बोललं तरीही त्यांचं इतिहास आणि ते या बद्दल कोणाच्याच मनात किंतु येणार नाही..त्यांचं स्थान अज्जिबात हलणार नाही ते गुरु होते आणि त्याच नात्याने ते पूजले जातील.शिवबाच्या इतिहासाचा प्रत्येक क्षण म्हणजे आमच्या काळजवरचा शिलालेख आणि प्रत्येक मावला म्हणजे आमचा देव आहे त्याबद्दल ज्यांनी ज्यांनी आक्षेप घेतलाय, ज्यांनी ज्यांनी त्यांचं आमच्या मनातल स्थान हलवण्याचा प्रयत्न केलाय....किंवा त्यांच्या अस्तित्वाला धक्का लावलाय त्यांना जनता सोडणार नाही हे निश्चित.
लोकांनो आतातरी जागे व्हा, आपल्या अस्मितेला हात घातलाय यांना दाखून द्या अशा लोकांना शिवबाच्या या पवित्र भूमीत जागा नाही.....
त्यांचा पुतळा काढला म्हणून असं समजू नका की आम्ही ते मान्य केलंय, आम्ही शांत आहोत इतकंच पण शांत सुद्धा खूप दिवस नाहीत राहणार..... आम्ही पुरुषार्थ दाखवतो षंढपणा नाही.

कोणत्याही पक्षाने काहीही केलं तरीही शेवटी प्रत्येक सामान्य माणसाचा एकाच म्हणणं आहे
"शिवाजी या नावाला कधी उलटं वाचलं का ? जीवाशी - आयुष्यभर जो जगाच्या कल्याणासाठी आपल्या जीवाशी खेळला तो शिवाजी.. अरे गर्वच नाही तर माज आहे मला मराठी असल्याचा....कोणीही त्यांचा इतिहास बदलू शकत नाही......संभाजी ब्रिगेड तर नाहीच नाही....इतिहास बदलण्यासाठी आधी स्वतः इतिहास घडवावा लागतो"

-- संचित.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप सुंदर आहे लिहिलेलं ... पटलं मन्नापासुन! खुप दिवसात हे विचार घोळत होते मनात.. कसं लिहावं सुचत नव्हतं.. .. तुम्ही मुद्देसुद मांडले आहेत सगळे विचार..!!! खुप शुभेच्छा!!!

संचित,

जाउद्या हो कशाला रागावताय ? राष्ट्रवादी काँग्रेसला इतर पक्षांकडे असलेली मराठा मते विधानसभेच्या निवडणुकी पुर्वी आपल्याकडे ओढायची होती. त्या निमित्ताने त्यांनी जे रान पेटवल त्यात बिचार्‍या दादोजी कोंददेवांचा असा बळी गेला.

इतिहास तज्ञ व लाल महालाच्या शेजारी रहाणारे इतिहास तज्ञ श्री पांडुरंग बलकवडे या ब्राम्हण नसलेल्या व्यक्तीने पुणे महानगरपालिकेने बहुमताने मंजुर केलेल्या दादोजी कोंददेव यांच्या पुतळ्याला हलवावे या ठरावाविरुध्द पुणे कोर्टात याचिका दाखल केल्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसची पंचाईत झाली.

मग रात्रीच्या अंधारात ही कारवाई झाली.

मला पण दादोजी ब्राम्हण होते हे माहित नव्हते. छ. शिवाजी महाराजांचे ते गुरु होते ( श्री बलकवडे यांच्या म्हणण्यानुसार ) म्हणुन आम्हाला ते आताही प्रिय आहेत.केवळ ते ब्राम्हण होते म्हणुन नाही.

ज्यांनी आपल आयुष्या केवळ शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोचावा म्हणुन खर्च केल त्या श्री.बाबासाहेब पुरंदरे यांना या राष्ट्रवादीप्रणीत श्रीमंत ? कोकाटे आदी मंडळींनी गलिच्छ विषेषणांनी बदनाम केल. त्यांचा कसुर इतकाच की ते जन्माने ब्राम्हण होते.

मराठा आरक्षणाविरुध्द संघटीत झालेल्या श्री छ्गन भुजबळ आणि गोपीनाथ मुंढे यांच्या ओबीसी सेनेकडुन मार खाल्यानंतर आमचाच विजय झाला हे दाखवायला ब्राम्हण हे सॉफ्ट टार्गेट बरे असते.

त्यांचा पुतळा काढला म्हणून असं समजू नका की आम्ही ते मान्य केलंय, आम्ही शांत आहोत इतकंच पण शांत सुद्धा खूप दिवस नाहीत राहणार >>> Rofl

>>> राष्ट्रवादी हे नावच तुम्हाला शोभत नाही, जो पक्ष राष्ट्रवादी आहे तो राष्ट्र ज्या माणसाने घडवलं त्यांच्या विरुद्ध कस काय असे कट करू शकतो? हाच प्रश्नय आमच्या डोक्यात....तो मराठ्यांचा इतिहास आणि हा मराठ्यांचा इतिहास तिथे अभिमान होता इथे आहे तो फ़क़्त अपमान, स्वतः मोठा होण्यासाठी प्रसंगी आपली अब्रूही विकायला कमी करणार नाहीत तुम्ही हे सिद्ध केलात...तुमच्या बद्दल बोलायला तसाही वेळ नाहीये पण पातक करताना तुम्हीही होता म्हणून बोलवा लागतंय.<<<<

राष्ट्रवादी ? का पैसेवादी ? का मराठावादी ? पक्षाला नाव देताना किती चुकतात हे..

>>>राष्ट्रवादी काँग्रेसला इतर पक्षांकडे असलेली मराठा मते विधानसभेच्या निवडणुकी पुर्वी आपल्याकडे ओढायची होती. त्या निमित्ताने त्यांनी जे रान पेटवल त्यात बिचार्‍या दादोजी कोंददेवांचा असा बळी गेला.<<<

गेल्याच महिन्यात माझ्या मुंबई पुणे प्रवासात वरिल ??वादी पक्ष्याच्या हायकमांडच्या सचिवाशी ओळख झाली आणी त्याने खाजगीत मान्यसुद्धा केले की दादोजी कोंददेवांचा असा बळी हा प्रसारमाध्यमे व जनतेचे
लक्ष लवासाकांडावरुन विचलित करण्यासाठी दिलेला आहे.
आणि जेव्हा जेव्हा लवासाकांडा / भ्रष्टाचार आदी आरोपा वरुन हायकमांड व पक्ष अडचणीत येईल त्या त्या वेळी दादोजी कोंददेव /श्री शिवाजी महाराज यांचे नाव घेउन , ब्रिगेड नामक भूंकनार्या आपल्या अनौरस
( बिनडोक) पाल्याला समाजीक सलोखा बिघडवन्याकामी ते लावतील.
जनतेचे लक्ष विचलित करणे हाच उद्देश यामागे असतो.

कृपया नोंद घ्यावी - मि ब्राम्हण आथवा मराठा नाही /कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडीत नाही.

धन्यवाद प्रतिक्रीया दिल्या बद्द्ल.
मी स्वत: ब्राम्हण आथवा मराठा अस काहि मानत नाहि कारण मी मराठी आहे, महाराष्ट्री आहे.
पण सामान्य मानुस कधि राजकारण्यांच्या अशा कटा विरुध्द एकत्र येउन लढा देनार?

संचित लेख मनापासुन लिहीला आहे.. गूड वन..
पण सामान्य मानुस कधि राजकारण्यांच्या अशा कटा विरुध्द एकत्र येउन लढा देनार? >>>>
हे अशक्य आहे कारण सामान्य माणूस ह्याला पळता भुई थोडी होईल अशी हालत करुन ठेवली आहे..
वेळच नाही आहे लोकांकडे आजकाल ह्या बद्दल काही विचार किंवा क्रुत्य करायला.. वाढती महागाई आणी ऊच्च राहणीमान हे स्वप्न आहे जवळ्पास सर्व सामन्य माणसांचे त्यामूळे त्या गोष्टी आधी महत्वाच्या आहेत त्या साठी जितक्या सहज आनी सोप्या मार्गाने पैसा कमवता येईल ते आपण बघतो....
हे सर्व राजकरणी लोकांनी बरोबर ओळखले आहे.. म्हणुन तर आज ६४ वर्ष झाली सो कॉल्ड स्वातंत्र्य मिळवुन पण आजुनही आपल्या निवडणूका जातीभेद, वीज, पाणी आणी रस्ते ह्यावर जिंकल्या जातात.. ह्या पेक्षा लाजिरवानी गोष्ट कोणती नसावी Sad
आणी ह्या सर्व प्रकाराला सामान्य माणुस सुध्द्दा जबाबदार आहेच.. केवळ कोणत्या एका पक्षा कडे किंवा नेत्या कडे बोट दाखवुन मनाचे समाधान होईल.. पण चुक आपली पण आहेच..

त्यांचा पुतळा काढला म्हणून असं समजू नका की आम्ही ते मान्य केलंय, आम्ही शांत आहोत इतकंच पण शांत सुद्धा खूप दिवस नाहीत राहणार..... आम्ही पुरुषार्थ दाखवतो षंढपणा नाही.

इतिहास बदलण्यासाठी आधी स्वतः इतिहास घडवावा लागतो >>> जे घडते त्याने इतिहासच घडतो. दादोजींचा पुतळा बसवला किंवा काढला हा देखील इतिहासच आहे आता!