निसर्ग किमया

Submitted by अज्ञात on 16 May, 2011 - 07:22

ये पहटवारा कुहुक तरंगे वरती
रविकिरणांसह गंधात नाहती लहरी
नवगेंद फुलांचे शिरिष मिरविती शिखरी
तोषवती तरु गुलमोहर तन मन
शहारून या प्रहरी

अंतरी महाली घुमे पारवाबोली
डोळ्यात बंद पापणीतळी स्वप्ने शकुनांची ओली
एकांत रुपेरी माया अवघी न्यारी
ओठांत उमलती शृतिसुमनांच्या
नवपर्णांकित वेली

विरघळे जहर; ऋतु वसंत सण माहेरी
मोकळ्या दिशा आकाशी पाटी कोरी
मोहात कुणी संन्यस्त फिरे माघारी
ही निसर्ग किमया; मय भाळावर
जीवन ह्याची दोरी

घे जगून जगणे उरल्या श्वासांवरती
गगनात भरारी; घाल गवसणी पुरती
माळून चांदणे भर लाटांवर भरती
सोन्याच्या रेशिम नात्यांना
मिरवू दे काठावरती

..........................अज्ञात

गुलमोहर: