आमचा बॉस आणि आम्ही

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

आमचा बॉस आणि आम्ही, एकत्र राबतो. बॉस राबवतो. आम्ही 'राब'तो. आम्हाला कधीतरी ऑफीसला जायला उशीर होतो. नेमका तेंव्हाच, आमचा बॉस लवकर आलेला असतो. आम्हाला पाहून आमचा बॉस एकवार आमच्याकडे बघतो आणि एक वेळ घड्याळाकडे. आमच्या मनात विचार येतो ' घड्याळाच्या जागी आमच्या बॉसलाच लटकवावा' , पण... चेहेर्‍यावर 'आपल्याच घड्याळाचे काटे मोडल्याचा' भाव आणावा लागतो.

आमचा बॉस विचारतो, "उशीर का झाला?"
आम्ही सांगतो, " ट्रेन लेट"
"मग तूमच्या बरोबरचे देशपांडे वेळेवर कसे?"
" ट्रेन पकडायला लेट. " आम्ही उत्तरात थोडासा बदल करतो.

आमचा बॉस आमच्या हजेरी बूकात एक फूली मारतो. आम्ही बॉसला मनातल्या मनात ३ ते ४ 'फूल्या' वहातो. आमचा बॉस म्हणतो आता आसन ग्रहण करा आणि कामाचा अभिषेक सोडा. आम्ही नम्रतेचा भाव आणून 'तस' करतो.

आमचा बॉस कधी म्हणतो, "आपल्याला मिळून टार्गेट पूर्ण करायचय. हेड ऑफीस कडून रीमाइंडर आलय." आम्हाला कळून चूकत आम्हाला आता मान मोडेपर्यंत काम करायचय आणि आमचा बॉस बायकोसाठी (स्वतःच्या) साड्या आणि गजरे आणणारै.

आम्ही कधीतरी फोनवर मित्रांशी (व अगदी चूकून मैत्रीणींशी) बोलत असतो. अगदी त्याचवेळी आमचा बॉस समोर प्रकट होतो आणि आमच्याकडे (खूळ्यासारखा) बघत रहातो. आम्हाला वाटत फोनच्या वायरीचा हार बॉसच्या गळ्यात घालावा. पण पेलत नाही. आम्ही मनातल्या मनात बॉसला आणि प्रत्यक्षात फोनला आदळतो आणि भक्ती भावाने बॉस कडे बघतो. बॉस म्हणतो "आज डोक दूखतय म्हणून लवकर घरी जाणारै. आमच्या दोन मीटींगा तूम्हालाच करायच्यात. हे त्याचे तपशील." आमच न दूखणार डोक दूखायच थांबत. आणि मित्राबरोबर नूकताच ठरवलेला पिक्चर चा प्रोग्राम आम्ही 'क्रोसिन' च्या गोळीबरोबर गिळून टाकतो.

आमचा बॉस कधीतरी काम केल्यासारख करतो. पण सवय नसली की थोड्याफार चूका ह्या व्हायच्याच. आम्ही समोर बसलेले असतो. बॉस अचानक समोरचा फोन उचलतो, १२-१५ बटण दाबतो आणि आमच्याकडे बघून विचारतो ह्यात '+' च बटण का नाहीये. आमच्या चेहेर्‍यावर आलेली गडगडाटी हास्याची गाडी आम्ही अगदी दोन्ही हात जोर लावून मागे ढकलून देतो आणि नेहेमीचीच 'बंद पडलेली' साळसूदपणाची गाडी आणून चेहेर्‍यावर उभी करतो. एवढ्या वेळात बॉसला आपली चूक (की धांदरट पणा) कळतो आणि तो आमच्याकडे बघून हसतो आम्हीही घाबरत घाबरत हसल्यासारख करतो. आज आम्हाला चहा बरोबर तोंडी लावायला बिस्कीटांची गरज नसते.

आमचा बॉस जेंव्हा कधी तरी काम करतो, तेंव्हा तो फारच विनोदी दिसतो. बॉसचा बॉस हेड ऑफीस वरून आलेला असतो. तो आमच्या बॉसला उभा आडवा झाडत असतो. तेंव्हा आम्ही हळूच आमचे मेल चेकून घेतो. समस्त मित्रांना फोन उरकून घेतो. दूपारी हॉटेल मध्ये जावून 'पेश्शल' थाळी मागवतो. वर २ रुपये टीप देतो. जमलच तर बाहेर पानाच्या गादीवर जावून ' मसाला पान' खातो आणि बॉसच्या नावाने 'पिंक' मारतो. आम्ही परत येतो तेंव्हा बॉसचा बॉस गेलेला असतो. आमचा बॉस प्राणिसंग्रहालयातल्या (का सर्कशीतल्या) वाघा सारखा केबीन भर फिरत असतो. आम्ही अलगद त्याच्या समोर जावून उभे रहातो. अगदी 'शेळी आणि वाघ' गोष्टीतल्या 'शेळी' सारखे. आमचा बॉस शिव्या देत असतो. मध्ये मध्ये त्याच त्याच शिव्या परत देतो. आम्हाला खूदकन हसूच येत पण आम्ही ते आवरतो.बॉस म्हणतो- ' कोण समजतो कोण स्वतःला?. कधी तरी इथे येऊन काम करून बघा म्हणाव म्हणजे कळेल' (आम्ही आठवायचा प्रयत्न करतो आमच्या बॉस ने शेवटच काम कधी केलय बर?) सकाळी १० ते संध्याकाळी ७ पर्यंत रोज मरत असतो (आम्हाला बॉस ५ च्या पूढे कधी थांबल्याच आठवत नसत). 'आता ह्यापूढे टाईम टू टाईम काम करायच. सन्ध्याकाळी ५ च्या पूढे कोणी थांबायच नाही.' अस म्हणतो. आम्ही लगेच पडत्या फळाची आज्ञा झेलतो. आज घरी जाताना आमच मन अगदी प्रफूल्लीत असत. 'घरच्या बॉस' बरोबर फिरायला जायला मिळणार म्हणून नव्हे, तर 'आमच्या बॉसला' आज कोणीतरी त्याच्या 'आम्ही' पणाची जाणीव करून दिली म्हणून.

****************************************** समाप्त.

विषय: 
प्रकार: 

मस्तच लिहीलस रे!! अगदी धमाल!! आवडल Happy

लिहिल आहेस रे. Happy

मस्त लिहिल आहेस. आणी ते घरच्या बॉस बद्दल काय? ते पण लिही की .
अन्जलि

केदार, मस्त लिहिलं आहेस! बॉसला दाखवलंस का?? :ड

आम्हाला पाहून आमचा बॉस एकवार आमच्याकडे बघतो आणि एक वेळ घड्याळाकडे. आमच्या मनात विचार येतो ' घड्याळाच्या जागी आमच्या बॉसलाच लटकावा' >> हहपुवा!

केदार, दिवसेंदिवस लेखणी छान बहरत चालली आहे. हा लेख मस्तंच झाला आहे एकदम. एकूण विनोदी लेखन तुझ्या स्वभावाला भावतं असं वाटतंय... असंच लिहित रहा...

छान लिहिलंय केदार..
सगळे बॉसेस असेच असतात की काय नकळे.. खडूस आणि स्वतःला शहाणे समजणारे! Happy

केदार छान लिहिले आहेस...

पी एस जी : सर्वच बॉस असे नसतात काही Happy

जावे बॉसच्या वंशा तेव्हा कळे Happy

ह्यावर 'आमचे चेले आणि आम्ही' असे एक लिहायला पाहिजे Happy

http://milindchhatre.blogspot.com

शैला, किल बिल, झकोबा, अन्जू, बडबडी, मन्जू , पूनम वैनी, मिल्या दादा आपले खूप खूप आभार.

'लाकडाला' स्पर्श करून सांगतो की माझ्या सुदैवाने अजून तरी मला 'चांगलाच' बॉस मिळाला.

जर वरील एखादा प्रसंग आपल्या आयुष्यात घडला असेल तर तो निव्वळ योगायोग समजावा.

मिल्या, नेकी और पूछ पूछ.... लग्गेच लिहून टाक बघू. म्हणजे मग psg पण 'जावे चेल्यांच्या वंशा' असं काहीतरी लिहेल.... Wink

पण सवय नसली की थोड्याफार चूका ह्या व्हायच्याच. Happy

केदार, सही झालंय

खुपच मस्त लिहिल आहेस केदार. आत्ता बॉस समोर बसुन वाचताना मजा येतिये. माझ्या बॉस ला मराठी येत नाही म्हणुन बर. असच लिहित रहा.

खु खु खु खु :):)
>>आज आम्हाला चहा बरोबर तोंडी लावयला बिस्कीटांची गरज नसते.
केदारा मस्तच! Happy

अमोल, स्मिता आणि चिनू आपले खूप खूप आभार.

>>>>>
आज घरी जाताना आमच मन अगदी प्रफूल्लीत असत. 'घरच्या बॉस' बरोबर फिरायला जायला मिळणार म्हणून नव्हे, तर 'आमच्या बॉसला' आज कोणीतरी त्याच्या 'आम्ही' पणाची जाणीव करून दिली म्हणून.>>>>>
खासच!! मस्त आहे, आणि अगदी प्रत्येकाच्या मनातले. Happy

धन्स लिम्बूदा , रमणी

केदारा
अरे वा हा खजिना इकडे होता तर .. आज सहज चक्कर टाकली तर हापिसच्या बॉस बद्धल छान वाचायला मिळाले Happy तस ऐकायला रोजच मिळते Happy
पण काहीही म्हण केदारा हापिसच्या बॉसपेक्षा घरचा बॉस लई भारी असतो :):) just kidding :):)

आवडेश!!!!!!!!!!!!

दिसलीस तू...फुलले ॠतू..................

मस्त जमलंय!
असेच लिहित रहा..तुम्हाला शुभेच्छा!
..प्रज्ञा

आयला हे कधीचं लिखाण, मी तर आजच बघितलं Happy

उशीरा ने प्रतिक्रिया देतोय रे Happy

मला तरी अजुन असला बॉस भेटलेला नाहीये Happy
माझे सगळे बॉस देव माणसं होती बहुतेक Happy आणि आत्ताचा तर त्याच्याही वरताण आहे. काही म्हणा त्याला नशीब लागतं Happy

आणखी जरा बॉसची मजा सांगा ना गडे!

विंग कमांडर शशिकांत ओक (नि)
ए-४/ ४०४, गंगा हॅमलेट हौसिंग सोसायटी ,
विमान नगर पुणे. ४११०१४. मो - ०९८८१९ ०१०४९.

आज आलेल्या प्रतिक्रियांमुळे हा लेख 'नवीन लेखन' मध्ये वर लिस्ट झाला आणि त्यामुळे वाचायला मिळाला.... फारच मस्त लिहिलं आहे...खूप आवडलं... Happy

आज आलेल्या प्रतिक्रियांमुळे हा लेख 'नवीन लेखन' मध्ये वर लिस्ट झाला आणि त्यामुळे वाचायला मिळाला >>> अगदी.

केदार, छान लिहिलं आहे Happy

छान! Happy

~~~~~~~~~
दक्षिणा...... Happy
~~~~~~~~~

प्रिया, प्रज्ञा , राजा, कमांडर (मला रमेश भाटकर आठवले एकदम Proud ) , सँटीनो, सींड्रेला , मनस्मी , दक्षीणा, चिन्मय सगळ्यांचे मनापासून आभार .
.
हे माझ अगदी सुरूवाती - सुरूवातीच 'अरबट- चरबट' लेखन आहे त्यामूळे त्यातल्या शुद्दलेकनाच्या चुक्या नेहेमीसारख्या तूम्ही समजून घ्यालच (चुका घेऊ नका) Happy

छानच आहे. फार आवडला. यामुळे मायबोलीची एक त्रुटी लक्षात आली. जुने चांगले लेख, कथा कविता हे एकत्रितपणे कुठे उपलब्ध नाहीत आणि शोधत बसण्याचा उत्साह बर्‍याच लोकांमधे नसतो. नेमस्तकांनी यात लक्ष घालून मागच्या १२ वर्षातील वाचनीय गोष्टी एका पानावर आणून ठेवल्या (लिंक्सच्या स्वरूपात) तर फारच छान होईल.

ह्म्म, चिमण्या छान कल्पना रे Happy
ऍडमिन ला आवडली तर करतील, आपल्याला आवडुन काय उपेग Happy

Pages