तुझ्याविना..

Submitted by के अंजली on 15 May, 2011 - 05:26

कालचाच चंद्र आहे कालच्याच वेली
कालचेच चांदणे रात्रीच्या पखाली

कालचा उसासतो फुलांमधून वारा
कालच्या बरसती ढगांमधून धारा

कालच्या सुरावटीत कालचेच राग
कालच्या भरातल्या कणा कणास जाग

कालचीच मीही आहे कालचेच सारे
तुझ्याविना सख्या पुन्हा बहरेन का रे??

गुलमोहर: 

Happy !

अवल Happy