त्या दिशांना

Submitted by कैश on 13 May, 2011 - 12:14

खरा आरंभ हा कुठून असतो?त्याला अमूक एक जागा,वेळ कधी नसावी असं मला वाटतं.मा.बो.वर वर्षभर आहे.कविता एवढे दिवस करतोय.आज हा...काय म्हणू 'आरंभ'...आता करतो आहे.
------------------------------------------------------------------------------------

न रस्ता सोयीचा आहे, न ही वाट रोजची रे...
बदलेले वारे दिशातुनी ज्या,त्या दिशांना भिंत नाही रे||

धुक्याचे भरजरी आंगण,सडा दारी फुलांचा जरी
कुठे गेलेत सुर्यकिरण,तिडा आहेच अजून करी

ढळला ध्रुव अता जुनासा,परी राहिली दिशा तिच
फेडले उतरले नभ-तरी…सावळ्या मेघांत म्लानशी वीज

चालता हे दूर-दूर, डोळ्यात अनोळखी पूर
येतोच बाजूने सूर, पण वाजती रिते नुपूर

वळण येता झुकतो वळणावरी, आधार कुणाचे घेऊ
ओठी येते हसू,परी सांग,ते नेत्रात कसे नेऊ

सोबती निशाणी वेडी, परी भोवती कुणी नाही
उरते माझीच सोबत पण ही गर्दीही सोडत नाही

अंगणात देई चाहूल,ऋतृऋतूंचे अस्खलित येणे
मी ऋतू सातवा होतो,गातो अनावर गाणे

वादळात रमलो... तीराच्या टोकावरती भिडलो
सोसाया शिकलो जेव्हा,तेव्हा तेव्हा जन्मून आलो

चालतो क्षणाचा बिंदू; रेषांशी जोडत बंध
अनुबंध जाणतो युगायुगांचे... पेलून येथले निर्बंध

-कैश

गुलमोहर: