विसरणे - तरही गजल

Submitted by शायर हटेला on 11 May, 2011 - 01:35

धमक इतुकी तुझ्या वक्षात नाही?
विसरणे ही तुझ्या लक्षात नाही.

..........मजा आहे तुझ्या आनंदण्यातच
..........उतरलेल्या तुझ्या नक्षात नाही

कशाला घाबरावे तू मला जर
तुझी गणतीच मम भक्षात ( भक्ष्यात ) नाही

..........करावी राजनीति धर्मविरहित
..........असे धोरण कुण्या पक्षात नाही

प्रतीभा ही अशी शायर हटेली
कुण्या गंधर्व वा यक्षात नाही

-शायर हटेला

गुलमोहर: 

करावी राजनीति धर्मविरहित
..........असे धोरण कुण्या पक्षात नाही>> व्वा!

धमक इतुकी तुझ्या वक्षात नाही?
विसरणे ही तुझ्या लक्षात नाही.>> मस्त!

मजा आहे तुझ्या आनंदण्यातच
..........उतरलेल्या तुझ्या नक्षात नाही>>:-)

================================

तुझा हा आय डी पाहून वाटे
असा कोणीच प्रत्यक्षात नाही Lol

===========================

बंदिस्त गझल केलीत आपण! काफियांमध्ये बरीच सुट चालणार होती. पण आवडली.

धन्यवाद या सहभागाबद्दल! (राजनी'ती')

'वक्षात धडधडते' इतकेच माहीत होते. आता धमकही असल्या / नसल्याचे समजले. धन्यवाद!

लोभ असावा.

-'बेफिकीर'!

अल शेषन्,अपुन गंपू हटेला का कोई नही,अलबत्ता अन्वर हटेला मेरा सौतेला भाई है.

बेफिकिर,५ में से ३ शेर अच्छे लगे मतलब माशाल्ला अच्छी बनी गजल.

धमक इतुकी तुझ्या वक्षात नाही?
विसरणे ही तुझ्या लक्षात नाही.

छानच...

अजून थोड
आतून कडी पुन्हा लावशील खरी
पण कळेल मी तूझ्या कक्षातच नाही

धमक इतुकी तुझ्या वक्षात नाही?>>>>>>> ?????????????????? Lol

शायर हटेला भाय, बोलेतो एकदम हट्टेली गझल!!!!

अ.लि.के.लि.शु. (अगली लिखापढी के लिये शुभकामनाएं!!!)