स्वगत (वाटा)

Submitted by rutuved on 11 May, 2011 - 10:54

वाटांचे ठाव ठिकाणे कुणी सांगावेत?

माझ्या माझ्या म्हणत,
तुझ्या बरोबर धावलेल्या मला...
आज वाटांचा, नात्यांचा,तुझा-माझा,
असण्याचा नि अनुक्रमे नसण्याचा..... ठाव घेताना उमगले;
चालणं तेवढं आपल्या हातात असतं बघ !

वाटा फुटत जातात,सरत जातात...
काही रस्ते अंताला येतात,
तर काही स्वल्पाविरामाशी घुटमळतात,
नि काही अजस्त्र नागासारखे आयुष्य व्यापून जातात...

'आपण' नक्की कुठे हरवलो, ते अजून तितकंसं उमगलं नाही बघ..
बाकी शोध अजूनही चालूये..

कळावे..

तुझा (?)

[स्वगतं कधीच संपत नाहीत....
चालूच राहतात...
एका प्रश्नचिन्हानिशी दुसरी...नी अशीच पुढे..]

ऋतुवेद

गुलमोहर: 

>> स्वगतं कधीच संपत नाहीत....
चालूच राहतात...
एका प्रश्नचिन्हानिशी दुसरी...नी अशीच पूढे..

मला खरी कविता इथे सापडली!! व्वा!!

स्वगतं कधीच संपत नाहीत....
चालूच राहतात...
एका प्रश्नचिन्हानिशी दुसरी...नी अशीच पुढे..

वा!!! Happy

प्रत्येक ओळ अप्रतिम....

स्वगतं कधीच संपत नाहीत....
चालूच राहतात...
एका प्रश्नचिन्हानिशी दुसरी...नी अशीच पुढे.. >> हे तर खासच....

पुन्हा एकदा....Hats-Off-Dnn.jpg

भारी लिहिलंय..

"आज वाटांचा, नात्यांचा,तुझा-माझा,
असण्याचा नि अनुक्रमे नसण्याचा..... ठाव घेताना उमगले;
चालणं तेवढं आपल्या हातात असतं बघ !"
हे फार आवडलं.. Happy

शुभेच्छा..

zaad | 11 May, 2011 - 20:08
>> स्वगतं कधीच संपत नाहीत....
चालूच राहतात...
एका प्रश्नचिन्हानिशी दुसरी...नी अशीच पूढे..

खरंच आहे नाही???
आधी कविता लिहिली न मग या ओळींनी खरा अर्थ दिला..

मला खरी कविता इथे सापडली!! व्वा!!

मी मुक्ता.. धन्यवाद

विशाल कुलकर्णी | 12 May, 2011 - 09:48
सुरेख ! आवडलीच......

>>>>my pleasure!

आनंदयात्री : Happy

कविता नवरे >> धन्यवाद!

धनेष नंबियार>>
धन्यवाद!...

निवडुंग | 12 May, 2011 - 20:54
भारी लिहिलंय..

"आज वाटांचा, नात्यांचा,तुझा-माझा,
असण्याचा नि अनुक्रमे नसण्याचा..... ठाव घेताना उमगले;
चालणं तेवढं आपल्या हातात असतं बघ !"
हे फार आवडलं..

शुभेच्छा..

कवितेचे ३ भाग focused hote...ek ha, dusara vatancha n 3rd swagat...
apalyala te awadalyacha aananda aahe..
dhanyavad!

ऋतुवेद