वधु

Submitted by sanky on 12 May, 2011 - 06:37

wedding.JPG

80% handwork and 20%photoshop work....

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अरे किती वेळा पोस्ट केलिस..............

एलिअन वधु आहे का..............??????? बेफिकिर यांच्या कादंबरी मधली १६९९............??????????????
Happy

नमा

actually हा illustration चा प्रकार आहे.. म्हणुन ती थोडी एलिअन वधु वाटते आहे...

आणि मीच हैराण झालोय इतके वेळा पोस्ट कशी झाली... आता सांगा delete कसे करु बाकीचे..

वा, या चित्रातून अनेक आशय प्रतीत होतायत. अगदी पारंपारीक भारतीय मनोवृत्तीला अपेक्षीत वधु यात दाखवली आहे. :
१. वधुची बाह्याकृती कशी काटेकोर सरळ रेषांतून काढली आहे. यावरून भारतीय वधु अशीच ठोकळेबाज, परंपरांत बसणारी हवी हे सुचित केलं आहे.
२. वधुचं अंग अनेक बारीक रेषांनी नटवलं आहे. ते वैवाहिक जीवनातील ताणतणावांचं प्रतिक आहे. शिवाय अधिक विचार केला तर असंही लक्षात येईल की, हे नातं आता ती म्हातारी होईपर्यंत टिकणार आहे (निदान तशी अपेक्षा आहे) त्यामुळे त्या म्हातारपणाच्या सुरकुत्या आहेत.
३. वधुने चेहेर्‍यावर शिरस्त्राण सदृश मुखवटा घातला आहे. यात दोन गर्भित अर्थ आहेत. एक म्हणजे आता तिला आपल्या खर्‍या भावना लपवून मुखवट्याच्या चेहेर्‍याने वावरायचय. दुसरं म्हणजे, दोन पातळ्यांवर लढायचय. एक बाह्य पातळी (म्हणजे घरतल्यांबरोबरची अ‍ॅडजस्ट्मेंट) आणि एक अंतर्गत लढाई (आपलीच आपल्याशी).
४. वधुच्या आणि वराच्या भोवतालचा ऑरा. हे एक प्रतिक आहे. ते दोघेही आता एकाच बंधनात बांधले गेले आहेत त्याचे. आणखी विचार केला तर जाणवतं की, हे आगीचंही प्रतिक असू शकतं. म्हणजे कदाचित तिचा हुंडाबळी जाऊ शकतो ... आणि अशावेळी ती आपल्या जोडीदाराकडे मदतीचा हात मागतेय पण तो हात तिच्या हातातून सोडवू पाहतोय.
५. शिवाय तिच्या वराचा केवळ हातच दाखवला आहे. म्हणजे वर कसाही असो, वधुमात्र कशी नियमात बसणारी हवी. त्याचं व्यक्तीमत्व केवळ एक पुरुषी हात दाखवून ठळक केलं आहे.

*********************************************

वरील पोस्ट फार सिरीयसली घेऊ नये. नाहीतर सनातन स्त्री-पुरुष वाद सुरू व्हायला वेळ लागणार नाही. Happy Light 1