तुम्ही आंबा कसा खाता?

Submitted by मुग्धानंद on 6 May, 2011 - 07:05

उन्हाळा आला की सुट्टीबरोबर चाहुल लागते ती फळांचा राजा "आंब्याची"! तुम्ही आंबा कसा खाता? नुसता चोखुन, रस काढुन, चिरुन, इ.इ. प्रांताप्रांतानुसार आंबा, आमरस करण्याची, खाण्याची पद्धत वेगळी......चला तर मग आपापली पद्धत सांगा, ! प्र.चि. देखिल टाका.
अशाच आशयाचा दुसरा धागा असल्यास सांगा. हा डिलीट करुन टाकेन.
mango 2.jpgmango 1.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही आंबा कसा खाता?>>>>>>>>> जसा असेल तसा खाते मी तर.... मला सगळ्या पद्धतीने आंबे खायला आवडतात....

हापुस असेल तर देठाजवळ छेद देऊन पुर्ण साली काढुन तो दगडी गोळा मटकवायला आवडते. पायरी असेल तर रस काढुन वा चोखुन. गोटीआंबा फक्त चोखुनच. मिल्कशेकमधुन कुठलाही आंबा. आमरस करुन त्यात मस्त साजुक तुप घालुन, फ्रुट सॅलर्डमधे फोडी व रस घालुन, रस करताना आधी ते दगड पातल्यात टाकुन मग साली व कोयींचा समाचार घेऊन मगच रस काढतो. आणखी आठवले की लिहीतो. Happy (लाळ पुसणारा बाहुला)

हापुस कापूनच!
काही 'रायवाळ' मात्र सालीसकट झकास लागतात! Proud
'तोतापुरी' आंब्यापेक्षा कैरीच चांगला वाटतो!

मे महिन्याची सुट्टी. सगळी भावंडं एकत्र जमलेली. सरळ हापूसच्या घरच्या आमराईत घुसून झाडावर चढून पिकलेले, अर्धे पिकलेले, रायवळ मिळेल ते आंबे तोडायचे..... नाहीतर मग घरात माळ्यावर घातलेल्या अढीतून अस्सल मोठ्या साईजचे आंबे उचलायचे. आंबे टॉवेलमधे गुंडाळून सरळ नदीवर धूम ठोकणे. तिथे तोंड रंगवून घेईपर्यंत आंबे खाणे आणि नदीत डुंबणे...... यासारखं सुख नाही.
ईथे विकत घेऊन आंबे खायची वेळ खूप कमी वेळा येते. आंबा विकत घेऊन खायचा हा कंसेप्ट पचत नाही Proud (सवईचा परिणाम म्हणायचा). उशीरा आल्या पेट्या तरी चालेल पण घरचा आंबा तो घरचाच.

तशातही रत्नागिरी हापूसला तोडच नाही......

पायरी पण छान लागतो.

रायवळचे कमीतमकी १२ ते १५ प्रकार माझ्या गावात आहेत, प्रत्येकाची चव निराळी. साखरांबा, तुरट्या, आंबटोरा, खोबर्‍या आंबा (यात गरात दोरे दोरे लागतात, जे दातात हमखास अडकतात) अशी भन्नाट नावं आहेत झाडांना रायवळच्या चवीवरून. घेतला दगड पाडला आंबा.... रंगवलं तोंड..... एकदम झकास....... Wink

ह्म्म्...माझा मॅगोची एक जुनी अ‍ॅड होती त्यात चमचा आंब्याच्या फोडीत घालुन त्याचा गर काढायचा (आईस्क्रीमवाले जशी आईस्क्रीम चमचाने काढुन वाटीत वा कोनात भरतात) त्या पध्दतीने हापुस आंबा खायला भारी वाटतो.

आमरस - पुरी ब्येष्टच. पण त्यातूनही त्या आमरसात थोडं तूप आणि काळी मिरीपावडर घालून खायचं. Happy

मुग्धा,
काय धागा काढलाय!! ( लाळ गाळणारी स्माइली )

वादळाला आंबा खायचाय, अडीच वर्ष झाली मस्त हापूस आंबे खाऊन, इतके खायचेत की थकून जावं आंबे खात खात, मित्रांनाही द्यावेत सोबत खाण्या साठी, तुला , तिला, याला अन त्याला ही!!
कुणी आंबे देता का आंबे....... हापूस आंबे!! ( कुसुमाग्रजांची क्षमा मागून) Happy

आमचा गावरणी, काय अस्सल चव त्याची
दोन्ही हातानी छान पिळुन झाला की अलगद वरची काळा डोळा काढायचा मस्त चाखत बसायचे, मग सालाला माघुन छिद्र करुण पुन्हा माघुन चाखायचे.

हं .........कलिंगड कसे खावे हा धागा काढण्याचं परवाच मनात आलं होतं... परवाच मी एक छोटं कलिंगड आणलं. आणि आधी त्याचे दोन भाग केले आणि एकेका अर्धुकात अगदी मध्यभागी चमचा घालून त्याचे थंड रसाळ आणि रवाळ गोळे काढत गेले. अर्थातच मटकावलेही. आणि हो यात मध्याकडून कडेकडेला असे जावे. आणि मग फक्त तोंडाची विचित्र हालचाल करत(ती करावीच लागते.) शेजारीच ठेवलेल्या कुंड्यात बीया थुंकत गेले. मग त्या अर्धुकात खोल खोल जात राहिले. मधेच चमचा गोल फिरवून गर मटकावायचा, मधेच हातातल्या चमच्याने कलिंगडाच्या तळाशी साठत जाणारा रस प्राशन करायचा. शेवटी कलिंगडाची बाहेरून हिरवी आणि आतून पांढरी अशी वाटी (मोठी) हातात रहाते तेव्हा पोटात एक समाधान साठलेले असते. आणि मनातही!
बरं आता आंबा.....नंतर लिहिते!
करून पहा.

.

मला तर लहान मुलान सारखा......... हात आनि तोन्द माखवुन खायला फार आवदेल. नाकाच्या शेन्द्याला लागलेला रस जिभेने चातुन काद्ने...... Happy कारन तस खान्याचि मजा काहि निरालिच आहे.

आंबा हात चाटुन, तोंड माखुन खाण्यातच खुप मज्जा आहे. Happy हातावरुन कोपरांपर्यंत रस ओघळु न देता मधेच चाटणे, या कसरतीत तोंडाला परस, गर लागणे, तो परत हवर्‍यासारखा चाटुन खाणे यात परमोच्च आनंद आहे.सोफिस्टीकेटेड पद्धतीने आंबा खाल्ला तर खाल्ल्यासारखा वाटतच नाही.. Proud

आम्ही आंब्याच्या फोडी करुन, कधी वर दिल्याप्रमाणे काप करुन,मिक्सरमधुन रस काढुन, तर कधी हातानेच रस काढुन त्यात दुध टकुन.. मग थोडा रस उरवुन तो फ्रीझरमध्ये टाकुन आईस्क्रिम करुन वै वै.

एकदा काकीच्या २५ व्या लग्नाच्या वाढदिवसाला आम्ही दोघा बहिणिंनी मिळुन घरि २ लि दुधाचे वेनीला आईस्क्रिम केले. ते एकदम सिंपल वाटले म्हणुन त्यात घालण्यासाठी आमरस आणि आंब्याच्या फोडी केल्या. केक कापल्यावर काका, काकिला ते सर्व्ह केले. सगळे पुर्ण फंक्शनभर आमच्या करामतीला नावाजत होते आणि आम्हाला एकदम १ चमचाभरच मिळाली. सगळ्या लोकांनी ते संपवुन टाकले.. Sad Sad Sad

धन्स लोक्स, महाराष्ट्रात काही प्रांतात पुरण्पोळि बरोबर आम्रस खातात, तर काही लोक आमरसात पिठिसाखर घालुन खातात.

अरे कसले धागे काढताय.... आणि काय एक एक प्रतिक्रिया. इकडे जीव गेला. Sad

पुन्हा ह्या धाग्यावर येणारच नाही... Proud

आरे. आसे काय? कोणीतरी आमरस पचायला हलका होण्यासाठी त्यात जे काही काही घालतात त्याबद्दल लिहा ना! जसे मिरपुड, मीठ इ.

कोणीतरी आमरस पचायला हलका होण्यासाठी त्यात जे काही काही घालतात त्याबद्दल लिहा ना! जसे मिरपुड, मीठ इ. >>> लाल तिखट घालायच बचकभर , दुसर्‍या दिवशी अगदी हलकं हलकं वाटत Proud

रस करुन , अर्थात कोणी केल्यास ( आपण नाही बुवा).
इतर वेळी फोडी करुन चमचा वापरुन अन्यथा रेषा दातात अडकल्यावर
उगाचच जिभ फार चालवावी लागते.
पण जाउ द्या नां राव , कसाही खा , आमसे हमको मतलब .....
एंजॉय आम सिझन. आने दो.

आंबा खाणे म्हणजे काय लाडु

आंबा खाणे म्हणजे काय लाडु खाण्या सरखे सोप्पे नव्हे, की उचलला नी टाकला तोंडात.
सर्व प्रथम नैसर्गिकरित्या झाडावर पिकुन खाली पडलेला 'आंबा' जंगालात जाउन भल्या पहाटे हुड्कावा लागतो. उंचावरुन पड्ल्यामुळे त्याला एखादी भेग पड्लेली असु शकेते व त्यातुन तो "पिवळा धम्मक सोनेरी लोभस गाभा', त्याचा तो जंगल व्यापुन टाकणारा गोड सुगंध आपल्याला भुरळ घालुन जातो....अहं..अहं..अलगद..अलगद उचलावा लागतो तो 'आंबा' मग, भेगेतुन जेथुन रसाची धार लागली असते तेथुन जिभेचा हल्ला चढवावा. त्यानंतर मग एखादा खुपदिवस भुकेला असलेल्या भुक्कड वाघा समोर हरणीचे पाडस यावे तसा त्या अंब्याचा साल न साल फडशा पाडुन टाकावा. अगदी चाटुन पुसुन कोईवरच्या धाग्यातही पिवळ रंग सुट्ला नाही पाहीजे असा दात लावुन लावुन चोखावा. आणि मग गोड ढेकर देत पुन्हा सोनेरी मोहीम सुरू करावी.

अगदी चाटुन पुसुन कोईवरच्या धाग्यातही पिवळ रंग सुट्ला नाही पाहीजे असा दात लावुन लावुन चोखावा. >> ह्द्द झाली. मानलं बाबा तुमच्या हावरट पणाला.

आम्ही दोघा बहिणिंनी मिळुन घरि २ लि दुधाचे वेनीला आईस्क्रिम केले. ते एकदम सिंपल वाटले म्हणुन त्यात घालण्यासाठी आमरस आणि आंब्याच्या फोडी केल्या.>> काल मला हे आठवले, आंबा खाताना, मग फ्रिज मधुन १ व्हॅनिला चा कप काढला आणि त्यावर आंब्याच्या क्युब्स टाकल्या. मस्त........

मला वाटतं ही पद्धत कुणीच लिहिली नसावी. आब्याला सालीवर मधोमध एक वरचेवर स्लिट द्यावी. पूर्ण गोलाकार. अगदी वरचेवर बरं का! आता दोन्ही हातांचा वापर कररून आंब्याचे डाव्या बाजूचे अर्धुक अलगद मुठीत धरून पुढच्या दिशेने फिरवा.(स्कूटरचा सेकंड गियर टाकतो तसा)आणि उजव्या बाजूचे अर्धुक स्वता:च्या दिशेने फिरवा. स्कूटरचा अ‍ॅक्सलरेटर फिरवतो तसा. या दोन्ही हातांच्या क्रीया एकाच वेळी अगदी अलगद झाल्या पाहिजेत. आता तुमच्या एका हातात थोडासा गर असलेली आंब्याची वाटी असेल आणि दुसर्‍या हातात कोयीसकटची दुसरी वाटी असेल. मग बिन कोयीची वाटी चमच्या ने गर कोरून संपवायची. व कोयीची आपल्याला वाटेल तशी मटकावायची.
अं हं.......नाही जमलं लिहायला. पण याला आईसक्रीम आंबा म्हणतात.
कुणाला माहिती असेल तर नीट लिहा बरं!

इकडे अमेरिकेत कित्येक वर्षांमधे हापुस तर सोडाच पण चांगला, चविष्ट आंबा मिळाला नाही. Sad
पण भारतवारी मधे - उन्हाळ्यात झालीच तर मनसोक्त खातो. मला फोडी करून जास्त आवडतो. कुणी रस करून आयता दिला तर नक्किच आवडतो. Happy

हाय धन्ने!
मानुषी! अगदी अगदी. माझी लहानपणीची आठवण आहे ती.
प्रकाश, हा छोट्टा आंबुकला गोड्डुल्ला आहे अगदी.

Pages