शिल्लक

Submitted by rutuved on 1 May, 2011 - 10:52

आजवर तळहातावर
खेळवलेत बरेच शब्द..शिलकीतले..

नि त्यांच्याच बरोबर असेच काही खेळ...

ओझरतानाचे बहर,
सुरावटीतले कहर,
माझघरातली पेटी,
उंबर्‍या वरची दाटी,
डोंगरभर पहाट,
द-यांचे काठ,
मोग-याचा गंध,
ता-यांचा संग,
चंद्राचा थाट,
नि वातीचा विझता थयथयाट..

सांडून गेल्यावर
सांजेला वाटत असतील तसे..
स्फुरलं काय..नी उरलं काय...
याचे हिशोब आज किती क्षुल्लक वाटले!

तरीच...
तळ्हाताच्या रेघांना
आजकाल फक्त शिल्लकीचेच हिशोब कळतात म्हणे!

ऋतुवेद

गुलमोहर: 

awesooooooooooooooome dear Happy

सगळे अर्थ लागलेत की नाहीत वगैरे प्रश्न पडलेच नाहीत इथे... थेट पोचली... बास्स!!! Happy

क्या बात है पूजा ... जियो !
भन्नाट उतरलीय कविता... मला मांडणी फारफार आवडली अन एक्स्प्रेशन त्याहुनही आवडलं !!!
अन नचिकेतनी म्हटल्याप्रमाणे थेट हात घालतेय...
लिखते रहो भाई.... Happy

धनेष नंबियार : आभार..
between तो smiley कसा टाकायचा ते शिकवाल का??

गिरीश जि..Thanks...pleasured to have your reply कौतुकाचा! Happy

चिमुरी, फुल्या : धन्यवाद, प्रतिक्रियांनी प्रोत्साह्न देत रहा!

छाया देसाई: धन्यवाद Happy

ते image मी गुगल वर सर्च करुन घेतलेले आहे....

मजकूरात image किंवा link द्या. येथे image वर टिचकी मारुन आपण जतन (Save) केलेले इमेज अपलोड करु शकतो......