Submitted by Unique Poet on 6 May, 2011 - 07:35
जाणीवांच्या पार आता ध्यान माझे लागू दे !
अंतराच्या आतमध्ये आत्मज्योत पेटू दे !
झोपलेले ज्ञानचक्षू जागू दे,अनिवारू दे !
चेतनेला साथ आता सृजनशक्ती देऊ दे !
भान येथले जगाचे हरवू दे ,ते जाऊ दे !
सत्याला शोधण्याचे वेध फक्त लागू दे !
वासनांचे किल्मीष मनी जे नष्ट सारे होऊ दे !
षडरिपूंना तारतम्याचे ते कुंपण राहू दे !
विचारांच्या पलीकडे अस्तित्व आहे कोणते ?
अस्तित्वहीनतेचे रूप कैसे ते जाणूनी घेऊ दे !
संन्यस्त आणि गृहस्थ फरक कोणता असे !
युध्द आपापल्या जगांशी दोघांचेही सारखे !
सगुण आणि निर्गुणाचा भेद कोणता असे ?
जाणण्या त्या मूळ रूपा जाग मजला येऊ दे !
- समीर पु. नाईक
गुलमोहर:
शेअर करा
उत्तम .
उत्तम .
छान आहे..!
छान आहे..!
अतिशय सुंदर...युनिक !
अतिशय सुंदर...युनिक !
संन्यस्त आणि गृहस्थ फरक कोणता
संन्यस्त आणि गृहस्थ फरक कोणता असे !
युध्द आपापल्या जगांशी दोघांचेही सारखे !
वावा..
पण आपण युनिक आणि बाकीचे??
छाया देसाई , के अंजली
छाया देसाई , के अंजली ,किरण्यके आणि हितचिंतक आपणा सर्वांचे आभार !
@ हितचिंतक मी युनिक आणि बाकीचे एक्सेप्शनल