विपरीत कहाण्या

Submitted by ऋतुजा घाटगे on 4 May, 2011 - 11:41

कुणी म्हणती टिपुर चांदणे पडले होते खडकावरती,
दुग्ध मानुनी तया चाटती हरिणशावके भोळीभाबडी.

कविकल्पना कुणी प्रसवली विसरुनी एक करूण कहाणी,
पीठ भिजवुनी मुलास देई एक दीन अश्रूंची राणी.

मधुघट भरले तुझ्या घरी म्हणुनी वणवण भटकू नको रे,
जीवनातले वीष पिऊनी घट नयनीचे झाले कोरे.

म्हणती फुले आणि मुले ती निष्पाप सगळी एकजात,
दलित आणिक राजसांची असते का कधी एक जात?

कितीक अशाच विपरीत कहाण्या जन्मूनी अजरामर होतात,
कुणी जाणिली ज्वलंत सत्ये जळून अंती खाक होतात !

गुलमोहर: 

एक कटु सत्य - छान मांडलंय्...जssरा अजून फिनीशींग टच अप पाहिजे (वैयक्तिक मत)

कविकल्पना कुणी प्रसवली विसरुनी एक करूण कहाणी,>>>

जबरदस्त!

प्रत्येक ओळ जस्ट जबरदस्त ! मास्टर कविता!

काहीच बोलत नाही मी पुढे आता!

(अवांतर - ओळी मस्तपैकी लयीतही बसल्याच असत्या. आपला तो हेतू नसावा कदाचित! पण श्री. फुल्या म्हणतात तसे शब्दयोजना अप्रतिम!)

-'बेफिकीर'!