आणखी एक भोंडला

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

(पोलीस कोठडीत असलेले श्री राजु आणि त्यांच्या सहकार्‍यानी नुकताच एक बेमौसमी भोंडल्याचा कार्यक्रम केला. त्यातलेच काही निवडक भोंडले ....)
.

ऐलमा पैलमा एनरॉन देवा माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा
माझी लाज टांगली वेशीच्या दारी शरम बसलीये फाट्यावरी
.
घडव घडव रे 'राजु'कल्या
ताळेबंद घडव रे साजुकला
.
एक डाव वाचव रे ऑडीटरा
देइन तुला सोन्याचा हारा
.
एक राजु आणु बाई दोन राजु आणु
दोन राजु आणु बाई तीन राजु आणु
तीन राजु आणु बाई चाए राजु आणु
चार राजु आणु बाई पाच राजु आणु
रामा लिंगमाचा शेणोठा
डुबवी सत्यम मेटासा
.
फु बाई फु लब्बाडी फुल
ताळेबंदातून नफ्फाच गुल
.
रोखे विकतो भाव गळतो
तेलगु लोफर झोल खेळतो
.
झीम पोरी झीम कप्पाळाच बिंग
बिंग गेल फुटून राजु आला सुटुन
.
(चु भू द्या घ्या )
.
थोडीशी जाहीरात बाजी Proud अगदी नक्कोशी वाटत असली तरीही Wink : गेल्या वर्षीची भोंडल्याची गाणी तुम्हाला खालील दुव्यावर वाचता येतील
http://www.maayboli.com/node/1060

प्रकार: 

मस्त रे! तरी नाच गं घुमा ला तोड नाही Happy

टू मच .. थ्री मच .... लई लई मच मच Rofl

केदारा ..सुटलाहेस अगदी .. मस्तच रे Happy

धन्यवाद अथक आणि डॅफोडील्स Happy

माझ्या कंपनी चं असं गाणं वाचायची अजिबात इच्छा होत नव्हती. पण मनापासुन सांगते की खुप छान झाला आहे हा भोंडला.

अरेरे सुरुची तू सत्यम ची का Sad
प्रतिक्रीये बद्दल आभार Happy

सुरेख भोंडला ....
------------------------------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

अरेरे.. नाही.
अरे वा !
मी सत्यम ची आहे याचा मला पश्चात्ताप नाही , हळहळ नाही आणि दुक्ख ही नाही.
I am proud to be a Satyamite.
तेव्हा तुम्ही सुद्धा माझ्यासाठी हळहळू नका. Happy