नि:संशय

Submitted by अज्ञात on 2 May, 2011 - 04:34

नि:संशय.........
खरं तर,
ती होती; म्हणून कविता जन्माला आली...........

तिच्या अस्तित्वाने ओढ निर्माण झाली
आणि अप्राप्यातून ईर्षा.......................

सुदैव........... !!
मुळातील सत्विकतेच्या अंशामुळे दंभाचा दंश झाला नाही
म्हणून भिनलेल्या अस्मितेचा विध्वंसही झाला नाही....................

सहयोगाने तृप्तीच्या संकल्पनांचा शब्द झाला आणि
तुंबलेल्या दबावाचा प्रवाह.....................

आता,
स्वप्नामधला निसर्ग
अंकुरलेल्या भावभावनांना कवटाळून
वास्तवापलिकडे;
एकांतात; तरंगू लागला, रमू लागला, खेळवू लागला.............

मग काय,
मीच आभाळ नी मीच आकाश.............
नजर पोहोचेल तिथपर्यंत सर्वभौम माझंच सम्राज्य................!!

नि:संकोच; निराकारातून साकारत गेल्या वृत्ती.........
संस्कृतीत बद्ध झाली प्रकृती....
निकराची झुंज आणि तिच्या प्रवासाची सुप्त व्यथा अनावृत झाली प्रत्यक्षात
आणि आकाराला आली कवितेची अबलखशी आकृती........

आभार तिचे
आणि नियतीच्या नकाराचेही......
कारण
त्यातूनच ती माझ्याशी
खरी एकरूप एकात्म तदात्म्य पावली.......
नकळत........
अस्पर्श..........
आजन्म........
अभंग.........
चिरंजीव.................

................अज्ञात

गुलमोहर: 

अज्ञात मित्रा !
प्रचंड विस्कळीत रचना ! त्यामुळे अगम्य ! खरंतर अगम्य काव्यातही एक प्रकारची मजा अनुभवता येते ! पण ईथे त्याचा अभाव आहे ! एकुणात काय, नाही आवडली ! Uhoh

पण ईथे त्याचा अभाव आहे >> काही कविता ह्या सादर केल्यावर जास्त भिडतात, शब्दांचे उतार चढाव, योग्य त्या ओळीला योग्य तो टोन अशा बर्‍याच गोष्टींमुळे कविता खुलते किंवा खुलत नाही...

आणि नियतीच्या नकाराचेही......
करण
त्यातूनच ती माझ्याशी
खरी एकरूप एकात्म तदात्म्य पावली.......
नकळत........
अभंग.........
आजन्म........
चिरंजीव.................

क्या बात है....

तुला पाहताच मला कविता सुचली
पण तुझा एक नकार मला कवी करुन गेला... काय विचार मांडलात..वेडं आहे..!!!

मस्त...कविता, शब्दांची निवड आवडली.

प्रवासाची सुप्त व्यथा अनावृत्त झाली>>
'जर तुम्हाला प्रवासाची व्यथा आजवर आवृत (झाकली गेलेली) होती आणि ती व्यथा उघडी झाली'
असा अर्थ अपेक्षित असेल तर मात्र अनावृत असं लिहा.
(त दोनदा नको, ते चुकीचं आहे. अनावृत्त म्हणजे आवृत्तच्या विरुद्ध= Non-cyclic)

सहयोगाने तृप्तीच्या संकल्पनांचा शब्द झाला आणि
तुंबलेल्या दबावाचा प्रवाह.....................

नि:संकोच; निराकारातून साकारत गेल्या वृत्ती.........
संस्कृतीत बद्ध झाली प्रकृती....
निकराची झुंज आणि तिच्या प्रवासाची सुप्त व्यथा अनावृत झाली प्रत्यक्षात
आणि आकाराला आली कवितेची अबलखशी आकृती........ >>>>>>>>> भन्नाट कल्पना अज्ञात !

बाकी सत्याशी सहमत ! Happy

अबलख शब्द छान.तिचे आभार आम्हालाही मानायला हवेत्,तिच्यामूळे आम्हाला सुंदर रचना वाचायला मिळल्या.

गुरुजी : काय प्रचंड जमलीय ही कविता...अथपासुन इतिपर्यंत.... आपलं शब्दलाघव तर आहेच पण आशय - फॉर्म अन एक्स्प्रेशन हे एकुणातच प्रचंड झालय...या कवितेन जो मझा दिलाय तो शब्दाच्या पलीकडचा आहे... जियो !!!!

शेर्लोक,
आपल्या मताचा आदर करून सांगू इच्छितो की सत्यजीतच्या मतात तथ्य आहे. Happy
सत्यजीत,
कधीकधी आलेल्या प्रतिसादातून आपलीच कविता आपल्याला अधिक कळते. तसं कांहिसं झालंय तुझ्या प्रतिसादानं. Happy
चैतन्य,
आपली सुचना मान्य. बदल केलाय. Happy
विशाल,
मनःपूर्वक आभार !! ही कल्पना नव्हे; अनुभूती .......!!!!!!! Happy ?????/..........!!!!!!!!
सहेली,
आपल्याला आमच्या रचना सुंदर वाटतात यापेक्षा आनंद तो कुठला ?? आभार... Happy
गिरीश,
आपल्या प्रतिसादाने चार चंद्र मिळाल्याचा आनंद झालाय. अजून काय सांगू ? ... मन:पूर्वक Happy

पुन्हा एकदा सर्वांचे आभार......

................अज्ञात

अरे भारी!!
शब्दनिवडीने चोख काम केलंय!! त्यामुळे सुरूवातीला सलग अर्थ नाही लागला तरी शब्द योग्य तिथेच घेऊन जात आहेत...

शुभेच्छा! Happy

ही कल्पना नव्हे; अनुभूती .......!!!!!!!>>>>>

असं असेल तर तुमच्याबद्दल मत्सर वाटणार्‍यात माझा नंबर पहिला असेल..... Wink

आनंदयात्री
शब्दनिवडीने चोख काम केलंय!! त्यामुळे सुरूवातीला सलग अर्थ नाही लागला तरी शब्द योग्य तिथेच घेऊन जात आहेत...

आसा अभिप्राय प्रथमच !! शब्द आणि शब्दसारथी दोघेही आपले उपकृत ......... Happy

विशाल,
असं असेल तर तुमच्याबद्दल मत्सर वाटणार्‍यात माझा नंबर पहिला असेल तुझा कसला लेका पहिला नंबर ... पहिला तिचाच .....!!!! तुझा, दुसरा ठीक आहे ... Happy

पहिल्या अक्षरापासून ते शेवटच्या टिंबापर्यंत सगळीच्या सगळी आवडली... नितांत सुंदर कविता!!!
कवितेबद्दलच्या वाचकांच्या चाकोरीबद्ध अपेक्षांना धक्के देत त्या अपेक्षांनाच evolve करणं हे अशा काही कवितांनाच जमू शकतं!
अज्ञात, अभिनंदन हा शब्द तोकडा आहे, तुम्हाला एक कडकडून मिठी या कवितेसाठी!! Happy

झाडा,
कवितेबद्दलच्या वाचकांच्या चाकोरीबद्ध अपेक्षांना धक्के देत त्या अपेक्षांनाच evolve करणं हे अशा काही कवितांनाच जमू शकतं!
फारच दुर्मिळ आणि अमूल्य प्रतिसाद आहे हा माझ्यासाठी. तोही सर्वसाधारण चाकोरीबाहेरचाच म्हणून अजून विशेष !! Happy

अज्ञात, अभिनंदन हा शब्द तोकडा आहे, तुम्हाला एक कडकडून मिठी या कवितेसाठी!! स्मित

तुझ्या मिठीत मी बेहोश आहे. अजून काय सांगू ?? .................................

तुझ्या ह्या प्रतिसादामुळे आनंदातिरेकात बधीर झालो आहे................................

सुदैव........... !!
मुळातील सत्विकतेच्या अंशामुळे दंभाचा दंश झाला नाही
म्हणून भिनलेल्या अस्मितेचा विध्वंसही झाला नाही....................

पुन्हा एकदा या ओळी टंकाव्या वाटल्या, एवढे कबूल करतो ! अप्रतिम .