ठरवलं असतं तर..
माझ्याही देहाला जडले असते शुभ्र पंख,
मी सुद्धा झेपावले असते उंच आकाशी,
परतताना जमिनीवर मी सुद्धा
वेचून आणले असते चंद्र तारे !
जर मी चालायचंच ठरवलं असतं तर..
प्रत्येक बंद दरवाजांना उघडून..
आणि सागरा किनारी लोटून
भेटल्या असत्या हजार वाटा,
आणि शांत स्तब्ध सोनेरी लाटा !
जर मी जपले असते प्रत्येक क्षण,
तर प्रत्येक चंदेरी क्षणांच्या मोत्यांची माळ,
गळा गुफूंनी सजले असते..
आणि स्वतःलाच उजळताना मनभरून पाहीले असते !
पण .. मला आठवतेय ..
माझ्या माईने सांगितलेली गोष्ट,
जिथे एक राजकुमारी रोज
गुलाबपाण्याने स्नान करायची,
फुलपाखरांचे पंख खांद्यावरी अन
स्वर्णफुलांचा गजरा माळून असायची..
मग केव्हातरी..
शुभ्र घोड्यावर बसून राजबिंडा राजकुमार येतो,
हातात हात घेवून दुर घेवून जातो..
तेव्हापासून ती राजकुमारी फक्त आणि फक्त
कथेतून डोळ्यासमोर येते..आणि..
स्वप्नील या नीज सुखांना,
संसाराच्या अडगळीत रोजचेच गुदमरणे होते !
- गोजिरी देशमुख.
शेवटच्या ओळीत वास्तवाचे भान
शेवटच्या ओळीत वास्तवाचे भान आणले
वास्तवाचे भान तर असायलाच हवे
वास्तवाचे भान तर असायलाच हवे ना? धन्यवाद.
वा ! आवडली !
वा ! आवडली !