पर्‍या खरोखर असतात का ?

Submitted by Saee_Sathe on 26 April, 2011 - 03:06

पर्‍या खरोखर असतात का ?
विचार करते रोज असा मी
पर्‍या खरोखर असतात का ?
चांगल्या, वाईट, काळ्या, गोर्‍या
रडतात किंवा हसतात का ?

सुंदर निर्मळ मन त्यांचे
दृढ कधी होते का ?
चांगली कामे करतात पण
कधी वाईट मनात येते का ?

आई आई सांग ना मला
पाहीली आहेस का गं परी ?
दिसते कशी ? बोलते कशी ?
सांग जरा तु मला तरी

चमचमणारा मुकुट तिच्या
डोक्यावरती असतो का ?
केसांवरचा रातकिडा
शांत कधी बसतो का ?

- मृण्मयी शैलेंद्र साठे

गुलमोहर: 

Thanks

केसांवरचा रातकिडा
शांत कधी बसतो का ?
<< चांगली लिहलीयेस पण शेवटच्या ओळी खटकल्या
केसातला रातकिडा ही कल्पना नाही पटत

<<माबोवर पण एक "पर्‍या" आहे..... तो खरोखरचा आहे......>>> तो सईसाठी नवीन नाहीये. आणि तिच्यासाठी तो पर्‍याकाका आहे. काय सई?