Submitted by सत्यजित on 19 April, 2011 - 09:47
किती सवय असतेना आपल्याला
नाती जोडत जाण्याची
एका ओळीत चार ठिपके दिसले
की त्यात रेघ पाहण्याची
ठिपक्यांची रांगोळी, ठिपक्यांची चित्र
न जोडलेले ठिपके, किती विचित्र ?
कधी वाटतं, पुसाव्यात सगळ्या रेषा
पुन्हा करावेत ठिपके स्वतंत्र
पण स्वतंत्र ठिपक्यांमध्ये रंग भरता येत नाहीत,
असं मला उगा वाटतं
हातात घट्ट धरलेले हात आणि
ठिपके जोडण्याचा पुन्हा हट्ट
ओळीतले बगळे, ढगांचे आकार
असंबंधातुन होतं काहीसं साकार
एक अनामिक ओढ, एक वेडी उर्मी
जोडत जावे ठिपके पुन्हा एक आकार
खरचं का, ठिपक्यांच्या रांगोळी
सोपी असते म्हणुन शिकवलीस ?
की रंगाची आणि नात्यांची समज
अलगद होती रुजवलीस ?...
अलगद होती रुजवलीस ?...
-सत्यजित.
गुलमोहर:
शेअर करा
खरचं का, ठिपक्यांच्या
खरचं का, ठिपक्यांच्या रांगोळी
सोपी असते म्हणुन शिकवलीस?
की रंगाची आणि नात्यांची समज
अलगद होती रुजवलीस?...>>> सुंदर कल्पना आहे!!! आवडली, सत्यजित
किती सवय असतेना आपल्या नाती
किती सवय असतेना आपल्या
नाती जोडत जाण्याची
एका ओळीत चार ठिपके दिसले
की त्यात रेघ पाहण्याची
पण स्वतंत्र ठिपक्यांमध्ये रंग भरता
येत नाहीत, असं मला उगा वाटतं
खरचं का, ठिपक्यांच्या रांगोळी
सोपी असते म्हणुन शिकवलीस?
की रंगाची आणि नात्यांची समज
अलगद होती रुजवलीस?...
सुंदर !!!
खरच सुंदर जमली आहे.
खरच सुंदर जमली आहे.
सुरेख!
सुरेख!
मस्त!
मस्त!
छान..!
छान..!
अप्रतिम
अप्रतिम
खूप मोठ्ठी आणि महत्वाची गोष्ट
खूप मोठ्ठी आणि महत्वाची गोष्ट सहजगत्या सांगून गेलास नेहमीप्रमाणे..
अप्रतिम कविता.. प्रचंड आवडली..
माझा आवडत्या १०त....पुलेशु!!
खुप सहज, सुंदर !!आवडली..
खुप सहज, सुंदर !!आवडली..
पण स्वतंत्र ठिपक्यांमध्ये रंग
पण स्वतंत्र ठिपक्यांमध्ये रंग भरता
येत नाहीत, असं मला उगा वाटतं
हातात घट्ट धरलेले हात आणि
ठिपके जोडण्याचा पुन्हा हट्ट >>
खुपच सुरेख...
मनापासुन आवड्ली!!!
पण स्वतंत्र ठिपक्यांमध्ये रंग
पण स्वतंत्र ठिपक्यांमध्ये रंग भरता
येत नाहीत, असं मला उगा वाटतं
हातात घट्ट धरलेले हात आणि
ठिपके जोडण्याचा पुन्हा हट्ट >>> अगदी खरे... खुपच छान आहे ही कविता
ओळीतले बगळे, ढगांचे
ओळीतले बगळे, ढगांचे आकार
असंबंधातुन होतं काहीसं साकार
एक अनामिक ओढ, एक वेडी उर्मी..
सुरेख..आवडली!
सुन्दर कविता सत्या....खूपच
सुन्दर कविता सत्या....खूपच भन्नाट आहे ही
सत्या पून्हा एकदा सही कविता.
सत्या पून्हा एकदा सही कविता.
व्वाह!!! एकदम भिडली खूप
व्वाह!!! एकदम भिडली
खूप सुंदर 
वा ! सही !
वा ! सही !
अप्रतिम! निवडक १०त! आयुष्यभर
अप्रतिम! निवडक १०त!
आयुष्यभर रांगोळी काढताना, पहाताना हे आणि हेच नातं आठवत राहील!!!!!!!!!!!!
आयुष्यभर रांगोळी काढताना,
आयुष्यभर रांगोळी काढताना, पहाताना हे आणि हेच नातं आठवत राहील!!!!!!!!!!!!
अगदी, काल बायकोला वाचून दाखवली ही कविता तेव्हा तिचीही अगदी हीच प्रतिक्रिया होती
फार सुंदर प्रतिक्रीया,
फार सुंदर प्रतिक्रीया, प्रतिक्रीयां बद्दल आभार मानण्याचा आधिकार तसा माझ्या कडे नाही, तो पुर्णतः त्या कवितेचा आहे मी फक्त एक माध्यम कवितेला तुमच्या पर्यंत पोहचवण्याच.
तरीही सर्वांचे धन्यवाद!!!
खल्लास, जाम आवडलीये
खल्लास, जाम आवडलीये