Submitted by vaiddya on 19 April, 2011 - 13:56
तुकडे तुकडे
जगायचं ..
जुळवत राहायचं
मिळवत राहायचं
एक अखंड चित्र ..
जे कधीच मिळणार नाही ..
फक्त घुसत जातील
अणकुचीदार कोपरे
एकमेकांचे एकमेकांत
एकमेकांना
घायाळ करत ..
घुसत राहातील आत आत ..
कापत खोलवर !
सगळ्यांनीच जमवत राहायचं
एक समाधान
कोणी ना कोणी आपल्यामुळे
कापलं गेल्याचं,
अजूनही आपण कोणामुळे
घायाळ होत असल्याचं !
अजूनही काहीतरी नातं
असल्याचं एक विचित्र समाधान
जपत राहायचं ह्या जिवंत
घायाळ रक्ताच्या चिखलात
त्याच जखमांच्या बुडाशी !
गुलमोहर:
शेअर करा
सगळ्यांनीच जमवत राहायचं एक
सगळ्यांनीच जमवत राहायचं
एक समाधान
कोणी ना कोणी आपल्यामुळे
कापलं गेल्याचं,>>> क्या बात है| मस्त. आवडली
छान. आवडली. <<< सगळ्यांनीच
छान. आवडली.
<<<
सगळ्यांनीच जमवत राहायचं
एक समाधान
कोणी ना कोणी आपल्यामुळे
कापलं गेल्याचं,
अजूनही आपण कोणामुळे
घायाळ होत असल्याचं !
>>>> - ह्या कवितेत हे सर्वात मस्त.
वा प्रदीप!
वा प्रदीप!
ग्रेट..
ग्रेट..
ह्म्म्म्म
ह्म्म्म्म
छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना
छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना ही कविता आवडलेली पाहून !
मस्त!! कविता आवडली प्रदीप.
मस्त!!
कविता आवडली प्रदीप.