Submitted by Kiran.. on 18 April, 2011 - 14:38
पेटवू आम्ही रात्री काळ्या
दिवसा सूर्य गिळायचेय
पुन्हा आम्हाला संधी द्या ना
उरले सुरले लुटायचेय..
घास तोंडचा काढून नेऊ
पाणी देखील वळायचेय
मेले सारे मरू देत हो
मेल्यावरही छळायचेय..
रापून गेली काळी माई
पाण्यावाचून जळायचेय
कोण लटकते झाडावरती
आम्हा काय करायचेय
उघड्या झाल्या आयाबहिणी
बारमधुनी रमायचेय
नाचनाचवू खडी पाखरं
अब्रू विकून निजायचेय
कमरेखालचे डोक्यावरती
नेसून वनी फिरायचेय
पुन्हा एकदा संधी द्या हो
राज्यच सारे विकायचेय
- किरण
गुलमोहर:
शेअर करा
.
.
खूप छान जमलिये.. ह्म्म....
खूप छान जमलिये..
ह्म्म.... :-|
जहाल वास्तव..!
जहाल वास्तव..!
भारी !!!!
भारी !!!!
हे वास्तव आहे ... हेच दुर्दैव
हे वास्तव आहे ... हेच दुर्दैव आपलं.
बरीच वर्षे कविता लिहीलेली(च)
बरीच वर्षे कविता लिहीलेली(च) नाही...काल उगाच आपलं डोक्यात राख घालून कळफलक बडवत गेलो . आवडल्याबद्दल धन्यवाद दोस्तांनो..
hmm आपण काय करू शकतो ?
hmm
आपण काय करू शकतो ?
आज जुन्या कविता पाहताना ही
आज जुन्या कविता पाहताना ही कविता दिसली ...
आपण काय करू शकतो ?>>>>>>आपणच
आपण काय करू शकतो ?>>>>>>आपणच काहीतरी करू शकतो,आता कृष्ण आपल्यालाच बनायच आहे,त्यासाठी "मत"नावाच सुदर्शन चक्र घटनेन आपल्या हाती दिलेल आहे,४०%,५०%वाल मतदान जेव्हा ९०%च्या वर जाईल तेव्हा या चोरांचे धाबे दनानलेले असतिल.
विदारक सत्य मांडलय आपण कविराज.
ह्म्म्म्म
ह्म्म्म्म
भयाण वास्तव उभे केलेत.
भयाण वास्तव उभे केलेत.
उचापतिची हि उचापत आवडली. सत्य
उचापतिची हि उचापत आवडली. सत्य कविता.
आपण काय करू शकतो ? इति सांजसंध्या>>>>असं निराश होऊन कस चालायच ताई!
सागराची सुरुवात एका थेंबापासुन होते, रेनूची सुरुवात एका अनुपासुन होते,रेषेची सुरुवात एका बिंदूपासुन होते,विशालवृक्षाची सुरुवात छोट्या बी पासुन होते.फक्त सुरूवात होण्याची गरज असते. म्हणून प्रत्येकाने आप-आपल्या परिने सुरूवात करायची, चित्र पालट्ल्याशिवाय राहनार नाही. विभाग्रज म्हणतात तसा तोही एक सुरवात करण्याचा मार्ग आहे. कारण आज राजकारणी निवडून येतात ते फक्त दारु आणि मत खरेदी या गोष्टी करून. सुज्ञान माणुस मतदान करत नाही म्हणून यांचे फावते. ज्या दिवसापासून सुजान मंडळी मतदानाची सुट्टी एन्जाय न करता मतदान करतील व इतरांना भल्या बुर्यातील फरक सांगतील,तेव्हा बद्ल नक्किच होईल.
जे हाताने लढु शकत नाहीत त्यानी लेखनीने लढावे.
जे लेखनीने लढू शकत नाहीत त्यांनी हातांनी लढावे.
पण लढावे जरुर!
कारण आज पुन्हा देशाचं स्वातंत्र सुकत चाललयं
त्याला आपल्या पेनातील शाही व धमन्यातील रक्त पाजून हिरवं ठेऊया.
ठेऊया ना?
फार काही सांगून गेलेली कविता
फार काही सांगून गेलेली कविता
छान. तगमग परिणामकारकतेने
छान. तगमग परिणामकारकतेने व्यक्त झाली आहे.
दाहक सत्य सांगणारी कविता !
दाहक सत्य सांगणारी कविता !