आई....
आज खूप दिवसांनी तु माझ्या आठवणींत आलीयस...
काय करु गं!
आठवणींच्या पर्सनल साईटवर
लॉग इन व्हायला वेळच नव्हता.
वर्तमानातच बुडबुड्यागत उठणार्या अन
तशाच विरुन जाणार्या सोशल नेटवर्किंगवर होते ना!
तुला हे काहीच माहीत नाही?
तरिही खूप माणसं जोडलीस??
माझ्यासाठी अख्खं आयुष्य
प्राजक्तासारखं वेचलंस म्हणे?
पण मला नाही वेळ मिळत तुझी आठवण काढायला...
घर ऑफिस ह्याचं तंत्र सांभाळताना
माझ्या पिलासाठी सुद्धा वेळ नसतो मला
तर तुला कुठुन देऊ वेळ???
पण आज अशी स्वतःहुन आलीस, बरं वाटलं.
अंधारुन आलंय डोळ्यात.
पाणी सांडुन पसरलेल्या वॉटर कलरच्या
पुसट चित्रागत का गं दिसतेस?
आई, मी जरा झोपते..
उद्या पुन्हा नवं युद्ध. आयुष्याचं.
पुन्हा त्याच त्या गप्पा. निरर्थक.
काय म्हणतेस? तुझ्या मांडीवर डोकं ठेऊन झोपु??
अगं नाही गं, मान दुखते माझी हल्ली.
बरं ठीक आहे. थोपटतेस जरा?
झोपच लागत नाही गं धड........
अगं किती मऊ हात तुझा?
अजून तसाच ऊबदार....
थांब. माझ्याही बाळाला कुशीत घेते.
ती रोज गोष्ट सांग म्हणते,
मी रोजच थकलेली असते.
पण आज तिला सांगेन गोष्ट...
माझ्या आईची गोष्ट....
बघ हं, गोष्ट सांगता सांगता
हळुच माझा डोळा लागेल.
निर्विकार मेंदुमध्ये स्वप्नांचा घोळ माजेल.....
तु नको जाऊस....
तुझ्या कुशीत झोपु दे आज...
तु नको जाऊस, आई, नको ना मला सोडुन जाऊस.........
आई...
Submitted by पल्ली on 18 April, 2011 - 02:41
गुलमोहर:
शेअर करा
....! अशक्य...
....!
अशक्य...
परमोच्च हळवं
परमोच्च हळवं .....................
पल्ले.....
पल्ले.....
अतिशय हळवं... लिखाण..
रडवलंस ना!
रडवलंस ना!
....................... !
....................... !
................... !!! हळवं
................... !!!
हळवं केलंत कवितेनं....
या क्षणांपासून मीही तुझ्या
या क्षणांपासून मीही तुझ्या (?) भेटीला इथेच येणार ! हुर्रे....
पल्ले खरच रडवलस ग !
पल्ले खरच रडवलस ग !
............! आभारी
............! आभारी
पाणी सांडुन पसरलेल्या वॉटर
पाणी सांडुन पसरलेल्या वॉटर कलरच्या
पुसट चित्रागत का गं दिसतेस?
छान
सानिका.. आभारी
सानिका.. आभारी