Submitted by अज्ञात on 15 April, 2011 - 01:38
अंतरी कोष उलगडे पिसत गाभारा
घुसळुन येई वर अमृत शब्दपसारा
शिशिरात चांदणे नीलय मोरपिसारा
मन पिसाट रंगी उधळित सुटला वारा
पायात पाखरे ओढ परी मातीची
मेघात जलाशय दिशा मूढ पवनाची
हे सांभ पहाडा थोपव ग्रह फिरणारा
ने मजसी परतुन पान्हवीत वसुधारा
ओहळेल ओघळ धरा नीर खेळेल
उसवेल गंधमय स्पर्श; स्वर्ग उमलेल
यातना तृणातिल; अंकुर नव; निववेल
भिजतील शिवारे चर अवघा सुखवेल
हे जीवन नाही माझे एकल नाणे
मन पिसे; झरावे दाहि दिशांवर गाणे
मज एक दिलासा ओंजळ भरुनी द्यावा
उद्विग्न उसासा; मज सरणात विझावा
.................अज्ञात
गुलमोहर:
शेअर करा
क्या बात है गुरुजी...यातलीही
क्या बात है गुरुजी...यातलीही लय खुप आवडली ... अन
मज एक दिलासा ओंजळ भरुनी द्यावा
उद्विग्न उसासा; मज सरणात विझावा------------------------ एकदम भारी !!!
धन्य जी
धन्य जी
> हे जीवन नाही माझे एकल
> हे जीवन नाही माझे एकल नाणे
मन पिसे; झरावे दाहि दिशांवर गाणे
मज एक दिलासा ओंजळ भरुनी द्यावा
उद्विग्न उसासा; मज सरणात विझावा
सुंदर!
ओहळेल ओघळ धरा नीर खेळेल उसवेल
ओहळेल ओघळ धरा नीर खेळेल
उसवेल गंधमय स्पर्श; स्वर्ग उमलेल
यातना तृणातिल; अंकुर नव; निववेल
भिजतील शिवारे चर अवघा सुखवेल>>>>>
शब्दांतून स्वर्ग शोधता येतो हे ऐकले होते; पण स्वग निर्मिता येतो हे वरील कविता वाचून कळले. दंडवत!
यातना तृणातिल; अंकुर नव;
यातना तृणातिल; अंकुर नव; निववेल
भिजतील शिवारे चर अवघा सुखवेल
….. हे जास्त आवडलं
(No subject)
सर्वांना मनःपूर्वक
सर्वांना मनःपूर्वक
अज्ञातजी - पायात पाखरे ओढ परी
अज्ञातजी -
पायात पाखरे ओढ परी मातीची
मेघात जलाशय दिशा मूढ पवनाची
हे सांभ पहाडा थोपव ग्रह फिरणारा
ने मजसी परतुन पान्हवीत वसुधारा
निव्वळ सुंदर !!
प्रकाश१११, म्नःपूर्वक
प्रकाश१११,
म्नःपूर्वक
उम्याशी सहमत ! तुमच्या
उम्याशी सहमत ! तुमच्या कवितांना एक मस्त लयबद्धता असते अज्ञातजी !
आभार विशाल
आभार विशाल