विचारपूस साफसफाई २०११

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

पुढच्या शनिवारी (२३ एप्रिल, २०११) सगळ्यांच्या विचारपूशीची साफसफाई करण्यात येईल. तुमच्या विचारपूशीत असलेले १ जानेवारी २०११ अगोदरचे सगळे संदेश काढून टाकले जातील.

यात काही अडचण येणार असेल तर कृपया इथे लिहा. या अगोदरची सफाई २९ मे २०१० ला केली होती.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

आणखीनहि मदत म्हणून मी आजकाल (म्हणजे गेल्या सात आठ दिवसापासून) पूर्वीसारखे लांबलचक उथळ व पांचट लिखाण करणे कमीच केले आहे. हळू हळू स॑वय सुटली की काहीच लिहीणार नाही.

>>>>> Biggrin

आहेत त्या पण तुम्ही डिलीट करणार , आता आम्ही कोणाच्या तोंडाकडे ( विपु कडे) बघावं>>> श्री, दुसर्‍यांच्या विपु वाचायला लागा. विशेषतः admin ची विपु. खुपच इंटरेस्टिंग असते. Happy

मामी Lol

॑अ‍ॅड्मीन, एक प्रश्न होता. हे विपु साफसुफी स्पेसक्रंच मुळे नसावे. १००० लोकांनी, १००० विपु (ज्या की सरासरी १ किलोबाईट पलिकडे असु नये) आठवल्या तर १ जिगाबाईट येवढी जागा लागेल जी की आजकाल, ठोक मध्ये घेतल्यास, साधारण १० सेन्ट्सना मिळेल.

बहुदा हे लोकांच्या विपु हॉपींग मुळे होत असावे (त्या द्वारे सर्वरवर येणारे लोड). हेच कारण आहे का? नसल्यास कोणते?
असल्यास हे प्रोफाईलींग द्वारे ठरवले आहे का? नसल्यास त्यात काही मदत हवी आहे का?

माझ्या मते मायबोलीचा एक महत्वाचा उपयोग (साईड-इफेक्ट म्हणा हवे तर) म्हणजे टी आर पी. आणि त्याकरता विपु सारखे प्रभावी अस्त्र नाही. अचानक कारण न देता विपु साफ करणे म्हणजे Of course there is no reason for it. It is our policy सारखे वाटते .

इतरत्र कुठे ही कारणे व आकडेवारी आधिच उपलब्ध असल्यास क्षमस्व - कृपया कोणीतरी लिंक दाखवावी.

विचारपूशीची साफसफाई ही जागेसाठी ( स्पेसक्रंच) नाही. पण विचारपूशीचीच्या प्रोग्रॅममधे असणारर्‍या काही त्रुटींमुळे आहे. काही हजारांवर (म्हणजे विपूंची संख्या ६ आकड्याजवळ आली की) त्या पाहणे हळू होऊ लागते. त्यावर प्रयत्न चालू आहेत, आणि दुसरा प्रोग्रॅम ही शोधणे चालू आहेत.

धन्यवाद. यात काही मदत करणे मला शक्य होईल. संपर्कातून कळवतो - विपुतून म्हणणार होतो, पण त्याचे काही खरे नाही Happy

सद्य सर्व विपु (ज्याच्या त्याला) ठोक मध्ये ईमेल करता येतील का? निदान ज्यांनाहव्या त्यांना. एक कळ दाबली की एक मोट्ठी (किंवा छोटी) ईमेल व त्यात सर्व विपु.

रच्याकने notify कडुन ज्या ईमेल येतात त्यात कोणी विपु ठेवली आहे हे अंतर्भुत नसते. ते करता येईल?
आणि हो त्या अजयना तशी ईमेल ची सोय आहे हे ही सांगा म्हणजे विपु न वाचल्या जाता पडुन नाही राहणार. दिवे घ्या. Happy

मी हेच लिहायला आलो होतो. सध्या विपु आल्यावर एक ई-पत्र येतेच नाहीतरी ( माझे सदस्यत्व --> संपादन --> "कुणी माझी विचारपूस केल्यास, ई-मेल पत्त्यावर निरोप द्या" हा पर्याय वापरून). पण त्यात फक्त विपुचा मजकूर असतो. त्यासोबत विपुकाराचा आयडी नमूद केला तर विपुंचे वेगळे बॅकप घ्यायची गरज नाही.

Pages