विचारपूस साफसफाई २०११

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

पुढच्या शनिवारी (२३ एप्रिल, २०११) सगळ्यांच्या विचारपूशीची साफसफाई करण्यात येईल. तुमच्या विचारपूशीत असलेले १ जानेवारी २०११ अगोदरचे सगळे संदेश काढून टाकले जातील.

यात काही अडचण येणार असेल तर कृपया इथे लिहा. या अगोदरची सफाई २९ मे २०१० ला केली होती.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

अ‍ॅडमीन माबोच्या डिस्क स्पेस किंवा सर्व्हर वर लोड कमी करण्यासाठी सभासदाने काय करावे व काय करु नये असे ठळक काही मुद्दे जाहीर करता येतील का? नविन सभासद झाल्यावर वेलकम मेलसोबत ते मुद्दे पाठवता येतील.

एकदा विपू वाचून झाल्यावर (आणि तिचे उत्तर दिल्यावर) ती लगेच काढून टाकली तर प्रश्नच मिटेल. Text Messaging सारखा विपूचा वापर सर्वांनाच फायद्याचा ठरेल...

विचारपूससाठी पण ठराविक संख्या/जागा प्रत्येक खात्याला देता येईल का, "निवडक १०" मध्ये दुवे साठवण्यासाठी जी पद्धत वापरली आहे ती वापरता येईल का? प्रत्येक सदस्याच्या खात्यात ठराविक N विपू साठवता येतील (किंवा XYZ MB quota) तितक्या विपू झाल्या की N+1 वी विपू आली की सगळ्यात जूनी पहिली विपू आपोआप डीलीट होणार. त्यामुळे तुम्हाला मुद्दाम ज्या विपू डीलीट कराव्या लागतात त्या कराव्या लागणार नाहीत.

N विपू साठवता येतील (किंवा XYZ MB quota) << किंवा काहि महिने म्हणजे उदा. जानेवारी सुरू झाला की जुलैच्या आधीच्या विपू आपोआप डिलीट.

मंजूडी त्या सगळ्या रेस्प्यांची १ पीडीएफ तयार झाली की मला मेलमध्ये पाठव. Happy

मला वाटाते विपुसाठी काहीतरी पेज लिमीट पण ठेवावे. समजा हे लिमीट ५ पानांचे ठेवले. सफाई करताना माझ्या विपुत सगळी मिळून ४ पाने असतील तर ती तशीच रहातील. पण जर ७ असतील तर जुनी २ पाने डिलीट केली जातील. असे केल्यास मला ज्या ठराविक विपु जतन करायच्या आहेत त्या करता येतील. Happy

माझे विपु मधील सर्व काही मी माझ्या संगणकात लिहून ठेवले आहे. यापुढेहि तसेच करीन. तेंव्हा अगदी १२ एप्रिल २०११ पर्यंतचे सर्व उडवून दिलेत तरी चालेल.

धन्यवाद.

आणखीनहि मदत म्हणून मी आजकाल (म्हणजे गेल्या सात आठ दिवसापासून) पूर्वीसारखे लांबलचक उथळ व पांचट लिखाण करणे कमीच केले आहे. हळू हळू स॑वय सुटली की काहीच लिहीणार नाही.

शक्य झाल्यास त्या पाककृती इमेल मधेच ठेवण्याऐवजी इथेच मायबोलीवर पाककृती विभागात ठेवल्या तर तुम्हाला कधीही पाहता येतील आणि इतरांनाही त्याचा उपयोग होईल.

विपु ला कुलुप लावुन चावी सभासदाला देण्याची सोय व्हावी.
@मायबोली सारखे मेल बॉक्स च होऊन जाइल.
विषयांतर झक्कीसाहेबांकडुन साभार Happy

शक्य झाल्यास त्या पाककृती इमेल मधेच ठेवण्याऐवजी इथेच मायबोलीवर पाककृती विभागात ठेवल्या तर तुम्हाला कधीही पाहता येतील आणि इतरांनाही त्याचा उपयोग होईल.>> अ‍ॅडमिन १००००००% अनुमोदन.

पूर्वकल्पना दिल्याबद्दल धन्यवाद अ‍ॅडमिन!

> साफसफाई १ आठवडा पुढे ढकलली आहे. २३ ऐवजी १६ एप्रिलला करण्यात येईल.

ही कोणती सापेक्षता?

रूनीला दुजोरा. ण विपु राहु द्याव्या प्रत्येकाच्या. नाहीतर कुणाशी संभाषण झाले होते ते नंतर लक्षात राहणार नाही.

विचारपुस - विचार वाचुन पूसण्यासाठी असतांत. मी या तत्वाचे नित्याने पालन करतो.

काही नियम (६० दिवस किंवा २५ विचारपूसी किंवा ३ पाने) तयार करुन, विचारपूसीची स्वरुप वहाते ठेवता येणार नाही कां?

उदय ला अनुमोदन , विपु वाहती असावी मध्ये स्वच्छ चकचकीत राहील.
पोष्टाची पेटी मोठ्या उत्सुकतेने उघडुन बघावी तसं दररोज विपु उघडुन बघतो पण एकही नवीन विपु नसते , आता आहेत त्या पण तुम्ही डिलीट करणार , आता आम्ही कोणाच्या तोंडाकडे ( विपु कडे) बघावं Sad Proud

Pages