जणू प्रस्ताव ठेवावा विचाराधीन एखादा

Submitted by बेफ़िकीर on 15 April, 2011 - 08:18

कितीही चांगला वागून ठरतो हीन एखादा
तरीही मानतो आनंद याचा दीन एखादा

मला स्वीकारले नाही तरी अभ्यासतो मृत्यू
जणू प्रस्ताव ठेवावा विचाराधीन एखादा

कुणी निष्पाप आरोपी, कुणी बेमान फिर्यादी
कसे समजेल की आहे गुन्हा संगीन एखादा

तुझी चर्चा निघाली की मनाला शांतता मिळते
इथे भेटेल का कोणी तुझा शौकीन एखादा

कसा आणायचा कोणी जमाना कालचा आता
पुरावा लागला हाती जरी प्राचीन एखादा

नव्या रस्त्याकडेला मी कसासा थांबलो आहे
जणू वाडा उरावा पेशवेकालीन एखादा

गुलमोहर: 

कवितेत का?

म्हणजे कविता आहेच पण गझलही आहे की!!

वृत्त आहे, लय आहे, प्रभावी समारोप आहे....मग???????

कसा आणायचा कोणी जमाना कालचा आता
पुरावा लागला हाती जरी प्राचीन एखादा>>> अप्रतिम!!

आरं वा!! कादंबरीकार गझला बी लिवत्यात म्हणायचं...

पर ते कणखर आणि दागदर सांगत्यात ते आयका गडे...हितं कवितेत नगं...हिला तकडं हालवा!!

कुणी निष्पाप आरोपी, कुणी बेमान फिर्यादी
कसे समजेल की आहे गुन्हा संगीन एखादा

तुझी चर्चा निघाली की मनाला शांतता मिळते
इथे भेटेल का कोणी तुझा शौकीन एखादा

कसा आणायचा कोणी जमाना कालचा आता
पुरावा लागला हाती जरी प्राचीन एखादा

नव्या रस्त्याकडेला मी कसासा थांबलो आहे
जणू वाडा असावा पेशवेकालीन एखादा

चारही शेर भन्नाट झालेत.. पिकलेले हापूस आंबेच !!
गझल आवडली

कसा आणायचा कोणी जमाना कालचा आता
पुरावा लागला हाती जरी प्राचीन एखादा
..... छान
------------------------------------------------------
एक शंका/भाबडा प्रश्न
इथे बेनाम असे हवे आहे का ?

सर्वांचे आभार!

उल्हासराव,

बेमान = बेईमान!

सुरेश भटांचा एक शेर उदाहरणार्थ लिहितो.

मठोमठी मंबाजींना कीर्तने करू द्या
विठू काय बेमानांना पावणार आहे

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

एकूण एक द्विपदी आवडली.
मस्तच.
पहिली आणि दुसरी तर अप्रतिमच.

बेफिकीरजी,
खालील शेर अनुक्रमे (चढत्या भांजणीने) आवडले:
"तुझी चर्चा निघाली की मनाला शांतता मिळते
इथे भेटेल का कोणी तुझा शौकीन एखादा
मला स्वीकारले नाही तरी अभ्यासतो मृत्यू
जणू प्रस्ताव ठेवावा विचाराधीन एखादा
कसा आणायचा कोणी जमाना कालचा आता
पुरावा लागला हाती जरी प्राचीन एखादा"

बाकीचे शेर तांत्रिक दृष्ट्या बिनचूक, अन्यथा काव्यदृष्ट्या ठीक. ह्या दृष्टीने पाहता - माझ्यामते - ही कवितेपेक्षा गझल म्हणून अधिक उत्तम ठरते.
"बेमान" वरचा आक्षेप तुम्ही परतवला आहेच, तरी सांगतो: भाषा गरजेनुसार अधिकाराने वाकविण्याची अनुमती कवीला असते/ किंवा प्राप्त होऊ शकते - जसे पोचलेले शास्त्रीय संगीतकार एखाद्या रागातील वर्ज्य स्वर देखील योग्य ठिकाणी वापरून त्या रागाचे सौंदर्य अधिक खुलवतात, तेव्हा त्याला "आर्ष (=ऋषिंचा/ ऋषिंपासून आलेला) स्वर" म्हणतात, तसे. तुमचे आतापर्यंत वाचलेले लिखाण पाहता हा अधिकार तुम्हाला खचितच प्राप्त झालाय!

सही बेफि!

'एखादा' वरुन वैभव जोशीची गझल आठवली. नेमके शब्द आठवत नाहीयेत, पण अशी काहीशी होती:

असा अचानक मनात येतो विचार एखादा,
पुढ्यात यावा जसा जुना सावकार एखादा

कधीतरी सूर्य बंड करणार बघ आता
फुकट किती राबणारना कामगार एखादा

नभास बिलगून एवढेही रडू नकोस वेड्या
चूकून जाईल हूंदका आरपार एखादा.

मला स्वीकारले नाही तरी अभ्यासतो मृत्यू
जणू प्रस्ताव ठेवावा विचाराधीन एखादा

तुझी चर्चा निघाली की मनाला शांतता मिळते
इथे भेटेल का कोणी तुझा शौकीन एखादा

कसा आणायचा कोणी जमाना कालचा आता
पुरावा लागला हाती जरी प्राचीन एखादा

नव्या रस्त्याकडेला मी कसासा थांबलो आहे
जणू वाडा उरावा पेशवेकालीन एखादा

सगळे शेर अफाट!

सुपर्ब गझल.

तुझी चर्चा निघाली की मनाला शांतता मिळते
इथे भेटेल का कोणी तुझा शौकीन एखादा

नव्या रस्त्याकडेला मी कसासा थांबलो आहे
जणू वाडा उरावा पेशवेकालीन एखादा

व्वा. हे दोन शेर फार आवडले.

>>मला स्वीकारले नाही तरी अभ्यासतो मृत्यू
जणू प्रस्ताव ठेवावा विचाराधीन एखादा>>>>
कमालीचे खयाल.धन्यवाद .

>>तुझी चर्चा निघाली की मनाला शांतता मिळते
इथे भेटेल का कोणी तुझा शौकीन एखादा >>
हेही खासच.'शबभर रहा चर्चा तेरा..'

मृत्यू, जुना जमाना, पेशवेकालीन वाडा.... हे शेर आवडलेत.
मृत्यूचा तर एकदम जमेश आणि आवडेश Happy

>>मला स्वीकारले नाही तरी अभ्यासतो मृत्यू
जणू प्रस्ताव ठेवावा विचाराधीन एखादा
skipped a heartbeat..

तुझी चर्चा निघाली की मनाला शांतता मिळते
इथे भेटेल का कोणी तुझा शौकीन एखादा

व्वा!

मराठी गझलेला अनेक वैविध्यपूर्ण जमीनीही देण्याचे श्रेय आजच्या पिढीत बर्‍याच अंशी 'बेफिकीर' ह्यांच्याकडे जाते असे म्हणावेसे वाटत आहे.

कसला बहुपेढी शेर आहे हा , सकाळपासून त्यावरच विचार करतेय.

विदिपांशी १०१ % सहमत. फक्त जमिन नाही बेहतरीन नाजूक खयालही जे मराठी सारख्या रांगड्या भाषेत असे बेमालूमपणे रुजवतात बेफिजी जसे महाराष्ट्रात सफरचंदाची बाग कसावी नि काश्मिरात हुर्डापार्टीचा सोहळा व्हावा Happy

मनःपुर्वक धन्यवाद बेफिजी तुमच्या गझल वाचून आम्हा लोकांना थातूर-मातूर का होईना पण काहीतरी लिहीण्याच स्फुरण चढत .

-सुप्रिया.