प्रिय मायबोलीकर,
मैत्र जिवांचे या आपल्या संस्थेच्या नोंदणीचे काम पुर्ण झाले आहे. कार्यकारी मंडळ सात जणांचे असून मायबोलीवरील दोन सन्मानणीय सदस्याना स्विकृत सदस्य म्हणून घेण्याविषयी बोलणी सुरू आहेत.
दि. ०३/०५/२०११ ला सातारा धर्मादाय कार्यालयातून नोंदणी क्रमांक आपल्या हाती मिळेल. परंतू, उपाध्यक्षांशी व इतरांशी झालेल्या चर्चेनुसार त्याआधी आपली कामाची योजना तयार करणे सोयीचे होईल जेणेकरून नोंदणीचे पत्र मिळताच शुभारंभाच्या कार्यक्रमापासूनच कामाची सुरूवात करता येईल.
आपल्या सर्वांच्या उपस्थीती व मदतीशिवाय या संस्थेस लोकसेवा करण्याची ताकद मिळणे केवळ अशक्य आहे. हे बीज आपल्याच परिवारातल्या काही सदस्यांनी पेरले आहे त्याची जोपासना करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य मानुन कृपया पहिल्या सर्वसाधारण सभेला अगत्य येणेचे करावे ही कळाकळीची विनंती आहे.
पहिली सर्वसाधारण सभा :
शक्यतो एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात संस्थेची पहीली सर्वसाधारण सभा घेतली जाईल. या सभेत संस्थेची कार्यपध्दती, नियमावली, कार्यकारी मंडळ, कार्यक्षेत्र, कामांचे स्वरूप, विभागवार प्रतिनीधींची नियुक्ती, आर्थिक नियोजन व निधी संकलनाचे अवाहन, वार्षिक व आजीव सदस्य नोंदणी इ. गोष्टी स्पष्ट करण्यात येतील.
या पहिल्या सर्वसाधारण सभेतच संस्थेची वाटचाल निश्चीत होईल. या सभेला मायबोलीचा सदस्य असणारा कोणीही उपस्थीत राहू शकतो. काम करण्याची, तन, बुध्दी, धन आणि मनाने मायबोलीकरांच्या या प्रयत्नाला समर्थ करण्याची ज्यांची इच्छा आहे त्या प्रत्येकाने उपस्थीत रहावे ही विनंती आहे.
आपण आपल्या संस्थेसाठी यापैकी काय करू शकता?
* इमेल वरून लोकांच्या शंकांचे निरसन करणे. (डॉक्टर/ एचआयव्हीशी निगडीत कामाचा अभ्यास, अनुभव असणारे)
* फोनवरून मार्गदर्शन करणे.(डॉक्टर/एचआयव्हीशी निगडीत कामाचा अभ्यास, अनुभव असणारे)
* विविध शासकीय योजनांची माहिती असणारे व नवीन माहिती सहज संकलीत करू शकणारे लोक.
* प्रत्यक्ष स्वतःच्या घरी किंवा ऑफिसमधे किंवा लोकांच्या घरी जाऊन मार्गदर्शन करणे.
* महिन्यातला ठराविक कालावधी प्रत्यक्ष समाजशिक्षणाचे काम करण्याची तयारी असणे.
* निधी संकलन करणे.
* विभागवार राजकीय प्रतिनिधींशी जवळीक असणारे.
* कायदेविषयक मार्गदर्शन करू शकणारे (वकील, पोलिस)
* वेगवेगळ्या विवाह संस्थांची माहिती व संपर्क असणारे लोक.
* आपल्या घरी मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याची इच्छा असणारे तज्ञ.
मायबोली मैत्रजिवांचे सांस्कृतिक विभाग.
लेखक, कवी, शाहीर, नाट्यलेखक.
कलाकार- पथनाट्य, लघुनाटीका, व्याख्यान, एकपात्री, कथाकथन करण्याची इच्छा असणारे.
माहितीपुस्तिका लेखन करणे.
*मायबोलीवरील प्रौढ/अनुभवी (४०+) सदस्यांनी कौंसेलर म्हणून काम करावे ही अपेक्षा आहे.
*सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद इ. इ. इ. जिल्हावार प्रतिनिधित्वा साठी त्या त्या विभागातील मायबोलीकरांनी संपर्क साधावा.
:: कार्यकारी मंडळाने घेतलेल्या निर्णयांना व तयार केलेल्या नियमावलीला अनुसरूनच सर्व कामे होतील.:
महत्वाची सुचना : कायदेशीर दृष्ट्या सभासदत्व घेऊन संस्थेचे ओळखपत्र असणार्या सभासदासच प्रत्यक्ष काम करता येते.
सभेस येण्याची व काम करण्याची, मदत करण्याची इच्छा असणार्या मायबोलीकरांनी आपली इच्छा maitrajivanche.ngo@gmail.com येथे कळविल्यानंतर सभेचे ठिकाण पुणे की मुंबई, दिवस व वेळ ठरेल. प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.
- मैत्र जिवांचे सामाजिक संस्था. मायबोली.
मायबोली मैत्रजिवांचे
मायबोली मैत्रजिवांचे सांस्कृतिक विभाग.>>> यात सहभागी व्हायला तयार आहे.
अत्यंत उत्तम उपक्रम व प्रामाणिक शुभेच्छा!
-'बेफिकीर'!
मी आहेच!!
मी आहेच!!
मी आहे.
मी आहे.
धन्यवाद! सर्वांनी वर दिलेल्या
धन्यवाद!
सर्वांनी वर दिलेल्या मेल आयडीवर संपर्क आणि आपले शहर कळवा.
* Group name:
* Group name: मैत्र जिवांचे
* Group home page: http://groups.google.com/group/maitra-jivanche
कार्यकारी मंडळाच्या ७ सदस्यांनी वरील ग्रुपचे सदस्यत्व घ्यावे..
कैलासदादा, तिथे अप्लाय केलेय,
कैलासदादा, तिथे अप्लाय केलेय, कृपया नोंद घ्यावी. मी आपल्या या संस्थेसाठी एक स्वतंत्र ब्लॉग तयार करतोय. पुर्ण झाला की कळवेनच.
हबा धन्स रे !!
डॉक, मला अॅक्सेप्ट करा
डॉक,
मला अॅक्सेप्ट करा ग्रुपमधे...अॅप्लाय केले आहे
अरे वा! छान उपक्रम आहे हा!
अरे वा! छान उपक्रम आहे हा! माझ्या शुभेच्छा आणि लवकरच सहभागी पण होते!
डॉक्टर मलाही स्विकारा बरं का!
डॉक्टर मलाही स्विकारा बरं का!
मी पण अॅप्लाय केलय डॉक!
मी पण अॅप्लाय केलय डॉक!
मी पण अॅप्लाय केले आहे, पण
मी पण अॅप्लाय केले आहे, पण चुकुन कैलास ऐवजी विशाल याना लिहिले आहे..
अभिनंदन आणि कौतूकही वाटले. हा
अभिनंदन आणि कौतूकही वाटले. हा उपक्रम उत्तम चालेलच शिवाय इतर क्षेत्रातही कार्यविस्तार होईल, अशी खात्री आहे.
dhanyavaad Dineshda!!!
dhanyavaad Dineshda!!!
पथनाट्य लिहायला घेत आहे.
पथनाट्य लिहायला घेत आहे. बहुधा दुपारपर्यंत पुरे व्हावे.
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
भूषणजी, मैत्र जिवांचे तर्फे
भूषणजी,
मैत्र जिवांचे तर्फे आपले अनेक अनेक आभार!!
साधारण वीस मिनिटांचे व सहा
साधारण वीस मिनिटांचे व सहा पात्रे असलेले पथनाट्य लिहून पूर्ण झालेले आहे व ह बा यांना संपर्कातून पाठवलेले आहे.
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
धन्यवाद बेफिकीरजी!!!
धन्यवाद बेफिकीरजी!!!
धन्यवाद बेफी!!
धन्यवाद बेफी!!
पथनाट्य वाचले, मस्त लिहीलय.
पथनाट्य वाचले, मस्त लिहीलय. आभारी आहे!!!
पथनाट्य वाचले, मस्त लिहीलय.
पथनाट्य वाचले, मस्त लिहीलय. आभारी आहे!!!
>>> आम्हालाही वाचायला मिळेल का ???
की प्रत्यक्षात पहायला मिळेल ??
अध्यक्ष, पथनाट्य आम्हाला
अध्यक्ष,
पथनाट्य आम्हाला पाठवाल काय?
हबा, त्यादिवशी फोनवरही मी
हबा,
त्यादिवशी फोनवरही मी आपल्याला सांगितले होते की माझ्यापेक्षा चांगले पथनाट्य आपण स्वतःच लिहाल.
पण मला संधी दिल्याबद्दल मनापासून आभारी आहे.
तो एक रफ ड्राफ्ट असून त्यात कोणतेही आवश्यक ते बदल करावेत किंवा अधिक चांगले पथनाट्य मिळाल्यास हे काही कालावधीसाठी पेंडिंग ठेवावेत. लोभ असू द्यावात!
-'बेफिकीर'!
गिरीजा व कणखरराव, हा धागा
गिरीजा व कणखरराव,
हा धागा हबांचा असल्यामुळे व उपक्रमही त्यांचाच असल्यामुळे त्यांनाच अधिकार आहे ते ठरवण्याचे की पथनाट्य कोठे प्रकाशित करायचे.
-'बेफिकीर'!
कैलासजी, माझी पण रिक्वेस्ट
कैलासजी, माझी पण रिक्वेस्ट अॅक्सेप्ट करा
भूषणजी, अध्यक्ष हे ह बां नाच
भूषणजी,
अध्यक्ष हे ह बां नाच उद्देशून आहे. ते "मैत्र जीवांचे" चे अध्यक्ष आहेत म्हणून मी तसा शब्दप्रयोग केला. अशा संस्थांमध्ये अध्यक्षांच्या परवानगीशिवाय काहीच करता येत नाही म्हणून पाठवाल काय असे विनंतीपुर्वक विचारले आहे.
धन्यवाद!!
ह. बा... ई-मेल वर प्रतीसाद
ह. बा...
ई-मेल वर प्रतीसाद दिलेला आहे... कृपया विनंती मान्य व्हावी...
आज रात्री सर्व सदस्यांना
आज रात्री सर्व सदस्यांना पथनाट्य मेल करेन. सर्वांनी आपापली मते नोंदवावीत व बदल अपेक्षीत असल्यास बेफिकीरांना सुचवावा.
-हबा
काय झाले पुढे?
काय झाले पुढे?
मस्त उपक्रम.. पण अजूनही मी
मस्त उपक्रम.. पण अजूनही मी निश्चित काय योगदान देऊ शकेन ह्याबाबत संभ्रमावस्थेत आहे. इच्छा मात्र निश्चित आहे..
ह.बा. तुम्ही चांगला उपक्रम
ह.बा.
तुम्ही चांगला उपक्रम सुरु केला आहे:स्मितः
Pages