साधारण १९९७ सालापासून मी एक्सेल वापरायला लागलो. पहिल्यांदा विंडोज फ़ार
त्रास द्यायचे, आणि मला लोटस १२३ ची फ़ार आठवण यायची. माझ्या कंपनीने
मला लोटस चे, विंडोज व्हर्जन आणून दिले होते, पण दरम्यानच्या काळात
एक्सेल ची सवय व्हायला लागली होती.
त्या काळात मी एका फ़्रेंच कंपनीत नोकरीला होतो. आमचे सगळे प्रोग्रॅम्स
फ़्रेंच मधेच असायचे. त्यामूळे एक्सेल चे मेनू, ड्रॉप डाऊन बॉक्सेस, सगळे
फ़्रेंच भाषेत असायचे, आणि मला ते अंदाजानेच वाचावे लागायचे. माझा भर
असायचा तो, आयकॉन्स वर. ती चित्रभाषा मात्र, माझ्या पचनी पडायची.
कॉलेजमधे असताना प्राथमिक प्रोग्रॅमिंग शिकलो होतो (त्यावेळी त्याला कोड
वगैरे म्हणत नसत.) सी.ए. च्या अभ्यासात, सिस्टीम अनालिसिस पण शिकलो
होतो. सी.ए. एंन्ट्रन्स च्या वेळी, प्यूअर लॉजिक शिकून झाले होते.
पुढेही हौसेखातर मी, अनेक सॉफ़्टवेअर तसेच हार्डवेअर कोर्स केले. पण प्रत्यक्ष
कोड लिहिण्याची संधी कधी मिळाली नाहि.
ती हौस मी एक्सेल मधे अश्या काही वर्कशीट्स करुन भागवतो. कामाच्या
निमित्ताने, मला बॅंकाना अशी पत्रे नियमित लिहावी लागतात. सेक्रेटरीला
सांगितले तर ती वर्ड उघडून, झटापट करत बसते. क्षुल्लकश्या चुकीसाठी
परत परत टाईप करावे लागते. वर्ड मधे बेरजा, वजाबाक्या करण्याची
पण फ़ारशी सोय नाही.तसेच टॅब, अलाईन मधे खूपच वेळ जातो.
तर सोबत ही वर्कशीट आहे. मी वापरलेले लॉजिक अगदी प्राथमिक आणि
बाळबोध असायची(च) शक्यता जास्त आहे, पण काम निभावते.
यातल्या दुसऱ्या वर्कशीटमधे म्हणजेच, डेटाशीट मधे डेटा भरायचा आहे, आणि
पहिल्या वर्कशीटमधे लेटर आहे.
डेटाशीटमधल्या रेकॉर्डचा अनुक्रमांक, पहिल्या वर्कशीटमधल्या सेल इ१ मधे टाकला
कि लेटर तयार होते.
डेटावर काही प्राथमिक बंधने आहेत, जसे कि यू.एस.डी. ची रक्कम १००,०००/-
पेक्षा कमी असावी आणि रुपयातील किंमत, १,००,००,०००/- पेक्षा कमी असावी.
भारतीय पद्धतीने, म्हणजे दशसहस्त्र, दशलक्ष पद्धतीने संख्या लिहायचाही प्रयत्न
केला आहे. (मी वापरलेल्या एक्सेलच्या व्हर्जनमधे अशी सोय नाही. टॅली मधे
तशी सोय आहे.)
या पत्राचा मसूदा जो आहे, तो परदेशातील आर्थिक व्यवहाराशी सबंधित असल्याने
भारतात वापरल्या जाण्याऱ्या मसूद्याशी सुसंगत नसणार. तेव्हा त्या मसुद्याकडे
दुर्लक्ष करावे.
तर कुणाला हा फॉर्म फेरफार करुन वापरायचा असेल, तर खुशाल वापरा. यातले
लॉजिक वापरुन काही, इतर वर्कशीट्स तयार करायच्या असतील, तर अवश्य करा.
(आणि मला कळवा.)
पण जे व्यावसायिक प्रोग्रॅमर्स आहेत, त्यांनी यात काहि सुधारणा सूचवायच्या
असतील, तर अवश्य सूचवा. (मी यात कुठलाही पासवर्ड वापरलेला नाही,
ओपन सोर्स आहे. सगळे सेल फ़ॉर्म्युले ओपन आहेत.)
ओह, जर रो नंबर आवश्यक नसेल तर
ओह, जर रो नंबर आवश्यक नसेल तर मग तू माझे टेम्लेट वापरु शकतोस.
आहे तसेच वापरायचे झाले तर २ स्टेप प्रोसेस होईल.
कोल ए: फिक्स्ड लिस्ट
कोल बी: बाहेरची लिस्ट पेस्ट करणे
मॅक्रो रन केल्यावर रिझल्ट्च्या पहिल्या कोलम मध्ये, ए मध्ये असलेल्या पण बी मध्ये नसलेल्या सर्व्ह्र्स ची लिस्ट मिळेल.
ती लिस्ट पुन्हा कोल बी मध्ये टाकून मॅक्रो रन केल्यावर तुला पाहिजे ती लिस्ट रिझल्ट्च्या पहिल्या कोलम मध्ये मिळेल.
मॅक्रो रन करायच्या आधी रिझल्ट्स आणि कोल बी क्लिअर करुन त्यात नवीन लिस्ट पेस्ट करणे आवश्यक आहे.
तसेच ह्या मॅक्रोला १००० ची कृत्रीम मर्यादा आहे. कारण तो १० वर्षापूर्वी लिहिलेला आहे
म्हणूनच त्यात लिहिलेले "मॅक्रो रन व्ह्यायला ३० सेक लागतील" हे विधानही चुकिचे आहे. आता अर्ध्या सेकंदात तो रन होतो 
तुझ्या बी लिस्टच्या साईज प्रमाणे ती मॅक्रोच्या while loop मधे योग्य ती सुधारणा कर.
छान माहिती मीलाली
छान माहिती मीलाली
दिनेशदा छान माहीती.
दिनेशदा छान माहीती.
अरे हे मस्तच आहे. दिनेशदा
अरे हे मस्तच आहे.
दिनेशदा धन्स 
दिनेश दादा छान माहीती
दिनेश दादा छान माहीती दिली.माझ पण एक्सेल आणि टॅलीवर जास्त काम आहे.
सॉरी हा धागा एक्सेलचा आहे तरी
सॉरी हा धागा एक्सेलचा आहे तरी प्रश्न विचारतेय. अॅक्सेसमध्ये ODBC कनेक्शन वापरुन सायबेसमधून डेटा आणून डिसप्ले करणारा एक ईंटरफेस अचानक एरर देतोय. फॉर्मला स्टोअर्ड प्रॉक जोडली आहे. स्क्रोलिंग करताना ६० रेकॉर्ड्स झाले की #Name? अशी व्हॅल्यु सगळ्या कंट्रोल्समध्ये दिसते. ती कशी घालवायची माहिती आहे का कुणाला ?
हे २००० मध्ये बिल्ट केलेले अॅप्लिकेशन आहे. जुने अॅप्लिकेशन आहे आणि ते शिकण्यात/बदलण्यात फारसे व्हॅल्यु अॅडिशन नसल्याने कॉन्फिग बदलून प्रॉब्लेम सुटला तर बरच आहे.
सिंड्रेला, ओ डि बि सी कनेक्शन
सिंड्रेला, ओ डि बि सी कनेक्शन वापरून मी कधी काम नाही करत पण सहज म्हणून सुचलं. डेटा खूप जास्त नसेल तर सरळ टेक्स्ट किंवा एक्सेल मध्ये एक्सपोर्ट करुन नंतर अॅक्सेस मध्ये इंपोर्ट नाही करता येणार का?
डेट टाईप मिसमॅच मुळेच सहसा हा एरर दिसतो पण ६० पर्यंतचे सगळे रो नीट दिसतायत का?
टेक्स्ट किंवा एक्सेल मधून डेटा इम्पोर्ट केला आणि डेटा टाईप मिसमॅच असेल तर तो इंपोर्टच करणार नाही, थोडक्यात तेच कारण आहे हे नक्की होइल.
बुवा धन्यवाद पण हा वन टाइम
बुवा धन्यवाद पण हा वन टाइम रिपोर्ट वगैरे नाहीये. रोजचे ट्रॅन्झॅक्शन्स ह्यात दिसतात/बदलता येतात. त्यामुळे आहे ते फिक्स करावं लागेल. सपोर्ट टीम हात लावायला तयार नाही. म्हणून आमच्यापर्यंत पोचलय
मी स्टोर्ड प्रो इथे टाक
मी स्टोर्ड प्रो इथे टाक म्हणणार होतो पण ६० रो नंतर त्याच प्रोटोकॉल नी इनवॅलिड डेटा येतोय म्हणजे मुळ डेटा मध्येच लोचा आहे किंवा नवीन असलेला डेटा ह्या प्रो मधून वॅलिडेट होत नाहीये. असो... गुड लक.
डेटामध्ये लोचा नाहीये.
डेटामध्ये लोचा नाहीये. अॅक्सेस डेटा प्रोसेस करताना गंडतय. कारण ६० रेकॉर्डस् नीट दिसतात आणि एरर फक्त स्क्रोल केलं तरच येते.
http://office.microsoft.com/e
http://office.microsoft.com/en-us/excel-help/correct-a-name-error-HP0052...
ही लिंक आहे सधाराण #NAME error का येतात याबद्दल.
असे वाटतेय की सायबेस मधून जो डेटा येतोय त्यामुळे अॅक्सेस चा कुठला तरी फॉर्म्युला गडबड झालेला दिसतोय आणि resulting into #NAME.
मी सुद्धा एक्सेल वर काम करत
मी सुद्धा एक्सेल वर काम करत असतो..... हिशोबाचा पुर्ण प्रोग्रम मी त्या वर बनवला आहे........ स्टॉक अपडेटिंग ..प्रोफिट- लॉस वगैरे ....... क्रेडिट डेबिट वगैरे...........सगळे काम होतात......पण एक प्रोब्लेम फार येतो.....जरा जरी स्पेल मिस्टेक झाली किंवा स्पेस चुकुन दिला तर त्यात त्या ठीकाणी हवे ते जात नाही........सारखे लक्ष द्यावे लागते........ मला अजुन माइक्रो माहितिच नाही....आनी जमले सुध्दा नाही.........
सिंडरेला, हा प्रॉब्लेम एक्सेल
सिंडरेला, हा प्रॉब्लेम एक्सेल मधे एखाद्या फॉर्म्यूलाचे स्पेलिंग चूकले तर येतो. पण समजा हा सोडवता आला तर इथे लिहिणार ना ?
मला एकदा अॅड्रेस मधल्या रेफरन्स नी फार छळले होते (RC Ref.)
सुमीत, नव्या एक्सेलमधे मायक्रो तितक्या यूजर फ्रेंडली नाहीत. पण स्पेलिंग्ज कडे लक्ष द्यावेच लागते. एखादा फॉर्म्यूला टाईप करताना, तशी हेल्प दिसते, पण स्पेलिंग आपल्यालाच टाईप करावे लागते.
मल एक्सेल बर्याच पैकी नालेज
मल एक्सेल बर्याच पैकी नालेज आहे. पन मला एखादा लहान कोर्स करुन मॅक्रोज शिकायचा विचार आहे. कोनी मला सागेल का ??
Ghatkopar cha आसपास असा कोनता class Availbale आहे का??
खुशि, अगदी नावाजलेल्या
खुशि, अगदी नावाजलेल्या क्लासेसचाही (घाटकोपरच्याच ) अनुभव चांगला नाही. प्रत्यक्ष हेल्प वाचून आणि स्वतः प्रयोग करुनच जास्त चांगले ज्ञान मिळते.
@खुशि मी मदत करु शकेन. तुमच
@खुशि
मी मदत करु शकेन. तुमच email मला पाठवुन द्या
प्रज्ञा, धन्यवाद. पण मला
प्रज्ञा, धन्यवाद. पण मला वाटते ही डेटा प्रोसेसिंग एरर आहे. उदा: ६० रेकॉर्डस् कॅश होत असावीत आणि स्क्रोल करत गेलं की ६१वं रेकॉर्ड कॅशमध्ये उपलब्ध नसल्याने एरर येतेय. ODBC चा कॅशिंग ऑप्शन बघते.
वा वा छान धागा एक्सेल माझे पण
वा वा छान धागा
एक्सेल माझे पण आवडते टूल आहे.
Macro मधे खूप काम केले आहे आणि अनेकाना शिकवले पण आहे.
अरे वा, फारच सुंदर. मी लगेच
अरे वा, फारच सुंदर. मी लगेच कन्वर्जन वापरले सुद्धा.
कोणी qpro वापरले आहे का? मी त्यात मॅक्रोज वापरले आहेत. पण मला एक्सेल macros वापरता येत नाहीत. पण आता नक्कीच प्रयत्न करेन.
माझी ऑफिस मध्ये computer केला
माझी ऑफिस मध्ये computer केला format फक्त C dirve तर माझ्या D drive मधल्या महत्वाच्या एक्सेल फाइल गेल्या मि त्या रिकव्हर रीसायकबिन च्या सॉफ्टवेअर ने परत घेतल्यात पण त्या ऑपच होत नाही आहेत.
त्या करपट झाल्या असतीला? प्लिज मला त्या परत घेण्यासाठी काही उपाय असतील तर सांगा. खुप महत्वाची आहे त्या शिट्स. प्लिज
एक्सेलच्या फाइल मेन्यु मध्ये
एक्सेलच्या फाइल मेन्यु मध्ये जाउन, ओपनच्या विंडोमध्ये ड्रॉपडाउन ओपन अँड रिपेअर हे ऑप्शन सिलेक्ट करून बघा.
Excel Conditional Formatting
Excel Conditional Formatting साठी e-bookची लिंक
http://www.exceltip.com/tips/11-incredible-excel-conditional-formatting....
आभार भ्रमर, मला फार उपयोगी
आभार भ्रमर, मला फार उपयोगी पडेल हे.
मला बरीच कामे एक्सेलवरच करतो,
मला बरीच कामे एक्सेलवरच करतो, करावी लागतात. ! अगदी IT Calculation, Form 16, arrears,मला खुप सोपे जाते
एक्सेल वापरुन चेक प्रिंटींग
एक्सेल वापरुन चेक प्रिंटींग साठी एक लिंक मिळाली. मी काही वापरुन पाहिले नाही. पण कुणाला हवे असल्यास पहा.
http://www.instructables.com/id/Cheque-printing-without-special-software...
भ्रमर, मी स्वतः पण एक क्रूड
भ्रमर, मी स्वतः पण एक क्रूड कोड लिहिला होता, चेक रायटींग साठी. हेच लॉजिक वापरुन !
Pages